मागील भागात आपण पाहिले की, खरेदी, थट्टामस्करी मध्ये सोनिया आणि राजेशच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती.सोनिया आणि राजेशचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. आता पाहुया पुढे,
" बाबा येवू का मी."
" राजेशराव या या. कस काय येणं केले इकडे."
" बाबा अवो थोडं काम होते या बाजूला. म्हटले तुम्हांला सगळ्यांना भेटून जावे."
"आम्हांला की सोनियाला भेटायचं जिजू तुम्हांला?" राहूल हसत चिडवत होता.
" साले साहेब खास करुन तुम्हांलाच भेटायला आलो आहे. तुमची मर्जी राखणं महत्वाच आहे. सगळी दुनिया एकिकडे आणि बायकोचा भाऊ एकिकडे असे म्हणतात."
"अग तू इतकी तयार होवून कुठे चालली. की स्पेशल जिजू येणार म्हणून आवरुन बसली का काय."राहूल मस्करी करत बोलत होता.
" बाबा मी आणि सोनिया जरा बाहेर जावून येतो. संध्याकाळ पर्यंत येतो."
" राजेशराव परवानगी काय मागताय. सोनिया आता तुमचीच आहे. या तुम्ही संध्याकाळ पर्यंत जेवायला घरीच या. तुमचा आवडीचा बेत आईला करायला सांगतो."
" आजीच्या हातची शेंगोळी खायला मस्त वाटेल बाबा. चला येतो आता आम्ही."
" बाबा येतो आम्ही."
" सावकाश जा दोघे पण. "
" अवो काय काय घेताय तुम्ही. आधीच मला एवढे गिफ्ट घेतले आहेत. आता हे पैंजण आणि मंगळसूत्राची पण आॅर्डर दिलीत तुम्ही."
" तुझ्या पसंतीचे घ्यायचे होते मला. सोनीराज अस पेंडल खास बनवायला सांगितले आहे मी. आपल्या दोघांचही नाव आयुष्यभर आपली साथ अशीच निभावत राहणार आहे."
" चल आपण पाणीपुरी खावूया आणि शेजारीच असलेला फालुदा सेंटर मधून फालूदा देखील खावूयात."
" अवो घरी जावून आजीच्या हातची शेंगोळी खायची आहे ना? एवढे खाल्ले तर जेवायला भूक नाही लागणार."
" मी हे माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी घेवूया बोलतोय. घरी फालूदा पॅक करुन घेवून जावू."
" बर चला आता उशीर झालाय आपल्याला. नाहीतर घरी ओरडा बसेल आजीचा मला."
" हो चला."
" या खूप उशीर झाला यायला."
" पावसामुळे ट्रॅफिक वाढले होते. एकही गाडी पुढे सरकायचे नाव घेत नव्हती."
" चला पान वाढायला घेते मी."
" आजी काय खमंग वास येतोय शेंगोळीचा. नक्कीच चव देखील अप्रतिम झाली असणार. वाव नुसत्या डोळ्यांनी पाहून मन तृप्त झाले. मागे बाबां बरोबर तुम्ही शेंगोळी पाठवून दिली होती. अगदी तशीच लागते आहे भारी."
" पोटभर खा. अस मनापासून पोट भरुन खाणारे कोणी असेल तर करायला देखील हुरुप येतो नाही का? सोनिया तू पण शिकून घे आता. नात जावयाला शेंगोळी खूपच आवडलेली दिसतात."
" खरच अवो शिकून घ्या. नाहीतर आजीलाच घेवून जावू आपण शेंगोळी खायची इच्छा झाली की."
" चला आता येतो मी. घरी जायला पुन्हा उशीर होईल नाहीतर."
" सावकाश जावा. पोहचल्यावर फोन करा वो सोनिया ताईला." राहूल राजेशला चिडवत होता.
" तुम्हांला पण करतो साले साहेब."
राजेश आणि सोनियाच्या अश्याच गाठी भेटी वरच्या वर होवू लागल्या होत्या. त्यांच्यातले प्रेम हळूवार बहरत चालले होते.
त्या दिवशी देवाला काहीतरी वेगळेच मंजूर होते कदाचित, सोनिया लग्नाचा शालू खरेदी करुन राजेशला भेटायला निघाली होती. तिच्या गाडीला बसचा धक्का बसल्याने ती रस्त्यावर कोसळली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रस्त्यावर च्या लोकांनी दवाखान्यातून अॅब्यूलन्स बोलावून तिला दवाखान्यात अॅडमिट केले होते.
" बाबा सोनिया घरी आहे का? ती आज आम्ही भेटणार होतो. बराच वेळ झाला ती आली नाही अजून. तिचा फोन देखील लागत नाही."
" ती साड्या खरेदीलाच निघाली होती. तिकडून तुम्हांला भेटणार अस सांगत होती. ट्रॅफिक मधे अडकली असेल ती. मी करुन बघतो तिला फोन."
" बर बघा आणि फोन लागला की मला कळवा."
" हॅलो कोण बोलताय तुम्ही."एक गृहस्थ बोलत होता.
" अवो तुम्ही या ताईंच्या कोण बोलताय. या ताईंना घोले हाॅस्पिटल मधे अॅडमीट केले आहे. माफ करा मघाशी हा फोन घेता आला नाही. त्यांना शिफ्ट करत होतो अॅम्बूलन्स मधे."
" काय झालय नेमके सांगाल का मला. मी त्यांचा होणारा नवरा बोलतोय."
" अवो त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. ट्रॅकने त्यांच्या गाडीला धक्का दिला आहे. तो ट्रॅक ड्रायवर तिथून भरधाव वेगाने निघून गेला. पण इथल्या काही लोकांनी ट्रॅकचा नंबर लिहून घेतला आहे.डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. रक्तस्त्राव झाला आहे."
" मला लोकेशन पाठवता का? या भागाची फारशी ओळख नाही मला."
" हो पाठवतो लगेच." गृहस्थ बोलत होता.
" बाबा सोनियाचा अपघात झाला आहे. तिला घोले हाॅस्पिटल मधे अॅडमीट केले आहे. मला आत्ताच एकाचा फोन आला होता. तुम्ही पोहचा दवाखान्यात मी पण दवाखान्याकडे निघालो आहे. काळजी करु नका. आजीला किंवा घरी इतक्यात काहीच सांगू नका. हाॅस्पिटल मधे आल्यानंतर आपण ठरवूयात."
" हो मी पण निघतोय लगेचचं. फार लागल नाही ना तिला."
" तिथे गेल्याशिवाय बाबा काहीच कळणार नाही. तुम्ही या तर मग पाहूया आपण. "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा