सेरेनेडिंग माय हार्ट भाग ८

अपघातामुळे मागील घटनांचा विसर पडला तो धक्का सर्वजण पचवत आहेत.
मागील भागात आपण पाहिले की सोनिया आणि राजेशचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. त्यांच्यामध्ये गोडी गुलाबीचे दिवस सुरु झाले होते. सोनियाचा अपघात झाल्याने राजेश आणि सोनियाचे बाबा चिंतेत आहेत. दवाखान्यात गेल्यावर त्यांना सोनियाची परीस्थिती कळणार होती. आता पाहुया पुढे,

" सोनियाला कुठे ठेवले आहे."

" तुम्ही राजेश का? आपलेच फोनवर बोलणे झाले होते का?"

" हो मी राजेश. ताबडतोब आॅपरेशन करावे लावणारे आहे. तुम्ही या ठिकाणी सही करा पटकन."

" बाबा आले तुम्ही. आत्ताच फाॅर्मवर मी सही केली आहे. अर्जंट आॅपरेशन करावे लागणार होते."

" सही मी केली काय किंवा तुम्ही सारखेच आहे वो. सोनिया तेवढी सुखरुप असायला हवी."

" डाॅक्टर काय झाले आहे नेमके सांगाल का आम्हांला?"

" डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे रक्तस्त्राव खूप झाला आहे. पेशंट शुद्धीवर आल्यावरच कळेल काय ते."

" सोनिया कशी आहेस तू. त्रास नाही ना होत काही तुला."

" कोण तुम्ही? माझे बाबा कुठे आहेत."

" बाबा अवो मला काय झाले मी इथे कशी आले."

" तू राजेशला ओळखले नाही का? "

" नाही. कोण आहेत हे."

राजेश सोनियाच्या उत्तराने रडून खोलीच्या बाहेर निघून गेला होता.

" धीर धरा तुम्ही. पेशंटची मन:स्थिती समजून घ्यायला हवी." डाॅक्टर बोलत होते.

" बाबा सोनिया मला ओळखत नाही."

" तिला काही गोष्टींचा सध्या विसर पडला आहे. त्यांना पण त्यांना कितपत आठवतेय ते पाहायला हवे." डाॅक्टर बोलत होते.

" म्हणजे काय झालय तिला डाॅक्टर? अशी का वागते ती. राजेशचा आणि तिचा साखरपुडा झालाय इतक्यात त्यांच आता पुढच्याच महिन्यात लग्न होणार आहे."

" पेशंटशी जास्त वेळ बोलू नका. त्यांचा आराम होवू द्या. मी काही टेस्ट करतोय त्यावरुन आपल्याला कळेलचं काय ते."

" बरोबर आहे तुमचे डाॅक्टर. बाबा तुम्ही धीर धरा. घरी आपल्याला कळवायला हवे. तुम्ही घरी जा. मी इथे थांबतो."

" काय सांगतो तू? माझ्या एवढ्याश्या लेकराच्या नशिबात आता कुठे आनंदाचे दिवस आले होते. त्यात हे घडावं का?" आजी मोठमोठ्याने बोलत रडत होती.

" आई सोनियाला सांभाळून घ्यायला हवे खरतर. कदाचित तिला काही गोष्टी आठवणार देखील नाही."

" ते काय असते? तू काय बोलतोय मला काही कळत नाही. मला घेवून चल तू तिच्याकडे आता."

" हो आई आत्ता तिला आराम करायला सांगितला आहे. राजेश हाॅस्पिटल मधे आहेत. मी आणि राहूल आधी जावून येतो आत्ता. मी तिथेच थांबतो तू राहूल बरोबर संध्याकाळी ये हाॅस्पिटला."

" बाबा कस ओ घडले असे. आपल्या ताईने कोणाचे काय वाईट केले."

" राहूल हि वेळ धैर्याने सामोरे जाण्याची आहे. मला काय होत असेल हे व्यक्त सुध्दा करता येत नाही."असे म्हणून डोळ्यातले पाणी पुसत बोलत होते.

" बाबा नका काळजी करु. काय नाही होणार आपल्या ताईला. आपण जावूया हाॅस्पिटला चला."

" राजेशराव तुम्ही आता घरी जा. आम्ही आहोत इकडे."

" ठिक आहे बाबा. मी उद्या बाबा आणि आईला बरोबर घेवून येतो."

" ताई कशी आहेस तू."

" मी बरी आहे. मला लवकरात लवकर आपल्या घरी घेवून चल ना. आणि नैना आली का शाळेतून? तुझी परीक्षा आहे ना उद्या?"

" ताई काय बोलते तू असे."

" राहूल जरा इकडे येतोस का? "

" काय झाले बाबा?"

" डाॅक्टर काय म्हणतात बघ ना. आपल्या सोनियाची स्मृती गेली आहे."

" घाबरुन जावू नका हळूहळू तिला कदाचित आठवेल सुद्धा. शांततेत घ्यावे लागेल."

" बाबा नका काळजी करु तुम्ही. डाॅक्टर आम्ही कधी घेवून जावू शकतो ताईला."

" चार- पाच दिवस लागतील त्यांना अंडर आॅब्जरवेशन मधे ठेवावे लागेल."

" कशी आहे सोनिया आता?" राजेशचे आई-वडिल विचारत होते.

" बरी आहे आता. पण तिला विसर पडला आहे. काही घटना तिला आठवत नाहीये. तिला पाच वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतात. जेव्हा राहूल दहावीत आणि नैना बारावीचे शिक्षण घेत होती."

" हे खूपच भयानक आहे सारे. तुम्ही धीर सोडू नका. होईल सगळे व्यवस्थित. आम्ही तुमचा मित्र बनून भेटायला आलो असे सांगतो."

" सोनिया हे बघ तुला भेटायला कोण आले आहे बघ? माझा मित्र आणि त्यांची बायको आणि हा त्यांचा मुलगा राजेश."

" या काका- काकू. तुम्हांला भेटून छान वाटले.कसे आहात तुम्ही."

" सोनिया अनोळखी असून देखील किती आपलेपणाने बोलत आहे. कोण म्हणेल हिला काय आठवत नाहीये."

" मला नाही बघवत अश्या अवस्थेत सोनियाला." राजेश बोलत होता.

इतक्यात धावत-पळत आलेली नैना सोनियाला मिठी मारुन रडायला लागली होती.

" अग रडू नको. मी बरी आहे आता. तू मला भेटायला यायला एक दिवस लावला. कालतर आजी गावावरुन एकटी आली होती मला भेटायला रात्री. तू घरातल्या घरी असून एवढा वेळ लावला का? अभ्यास करत होतीस का? मग बरोबर आहे ग. आधी तुझी परीक्षा नंतर आपल्या राहूलची. तुमच्या दोघांच महत्वाच वर्ष आणि मी इथे दवाखान्यात."

" ताई तू काय म्हणते अशी. मी तर आजच आले ना."

" कुठून?" सोनिया बोलत होती.

" नैना इकडे जरा तू."राहूल बोलत होता.

" काय झालयं ताईला अशी काय बोलते ती."

" तिला पाच वर्षापूर्वीचे आठवत आहे. तू. तू मास्टर करते हे तिला आठवत नाहीये." तू अजून बारावीत आहेस हेच वाटतयं ताईला. तिला आठवायला लागले की, हळूहळू सर्व गोष्टी आठवतील देखील."

क्रमशः

🎭 Series Post

View all