मागील भागत आपण पाहिले की, सोनियाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस चालले होते. अचानक तिचा अपघात घडतो. आणि क्षणात होत्याचे नव्हते होवून बसते. ती वर्तमानापेक्षा पाच वर्षांपैकी मागे गेली आहे. तिला सद्धा घडलेल्या घटना आठवत नाहीत. तिचा झालेला साखरपुडा तिला आठवतच नाही. आता पाहुया पुढे,
"ताई तुला आता छान वाटत असेल ना?तू आराम कर. मी आहे थोडे दिवस.
" म्हणजे कुठे जाणार आहेस तू आता."
" अग परीक्षा जवळ आली आहे ना. मैत्रिणीकडे अभ्यासाला जाणार आहे. तिचे आई-बाबा गावी गेले आहेत ना. तिने तिच्याकडे सोबतीला राहायला बोलवले आहे. बाबा जा बोलतात. पण तू आजारी आहेस तर कशी जावू मी."
" अग जा तू बिनधास्त. आजी सोबत बकुळा मावशी पण आली हे माहितचं नव्हते मला. जा तू मैत्रिणीकडे, मन लावून अभ्यास करा छान."
" राहूल तूझी सायकल चालवून चांगलीच उंची वाढली बर का? किती हाईट वाढली तूझी. हाॅस्पिटल मधेच बोलणार होते तुला मी."
" ताई अग दोरीवरच्या उड्या आणि व्यायमा वाढवलाय जरा म्हणून तुला वाटत असेल."
" बर आता तुम्ही दोघे अभ्यासाला लागा. मी जरा वेळ पडते."
" ताई तुला बर वाटतय ना पण. "
" घरी आले आहे ना आता आपल्या बघ कशी ठणठणीत होते."
बघता बघता सहा महिन्यांचा काळ उलटून गेला होता. सोनिया तिच्या पध्दतीने आयुष्य जगत होती. तिला खर वाटव म्हणून अधून-मधून कारण देत नैना सारखी घरी जात - येत होती. तिची खरतर कसोटीच होती. परंतु बहिणी साठी ती सगळे सहन करत होती. राहूल देखील दहावीचे पुस्तक हातात घेवून अभ्यास करत होता. जाॅब करुन घरी आल्यावर पुन्हा असे वागणे त्याला अवघड जात होते. राजेश देखील अधून-मधून सोनियाला भेटायला घरी येत होता.
घरी अचानक काका-काकू आणि सोनियाचे भावंडे तिला भेटायला आली होती. त्यांना फक्त अपघात झाला इतकचं सांगण्यात आले होते. त्यात केदार म्हणजे काकांचा मुलगा म्हणतो, "ताई तुझा साखरपुडा तर झाला ना मग आता लग्न कधी आहे. लवकर कर आम्हांला सुट्या आहेत तेच. म्हणजे आम्हांला धमाल करता येईल."
" काय बोलतोय तू. मी अजून नोकरी करते. आत्ता कुठे व्यवस्थित घडी बसलीये. लग्न कुठे इतक्यात? आणि साखरपुडा कधी झाला? कोणाचा? "
" हि अशी काय बोलतेय समजतचं नाहीये मला." केदार मनातल्या मनात पुटपुटत होता.
सोनियाला साखरपुडा झालाय हि गोष्टी गेल्या सहा महिन्यात अनेकदा ऐकायला आलेली होती. इतके दिवस तिने दुर्लक्ष केले होते. पण आता मात्र ती खोलात जाण्याचा विचार करत होती.
" बाबा मला वाटत मी तिला आमच्या बाबतीतल्या घटना आठवून देण्याचा प्रयत्न करतो. तिला आठवेल हळूहळू."
" तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न सुरु ठेवा."
" खबरदार जर तू इथून पुढे आमच्याशी काही संबंध ठेवलास तर. " राहूल रागाने बोलत होता.
" अरे तुला काही कळतय का काय बोलतोस तू."
" बाबा आपली ताई यालाच भेटायला निघाली होती. याच्याच मुळे आज आपल्या ताईची हि अवस्था झाली आहे. हाॅस्पिटल मधे फार काही बोलता आले नाही मला. हा आपल्या घरी अनेकदा येवून गेलाय हे देखील मला आत्ताच्या बोलण्यावरुन समजले."
" शांत हो राहूल तू. माझ्यावर का राग धरतो आहेस. झाल्या प्रकारात माझी काय चूक आहे. आयुष्य तर माझं पणाला लागलेलं आहे. मी लग्न करेल तर तिच्याशीच नाहीतर तसाच राहिल."
" हे काय बोलताय राजेशराव तुम्ही."
" तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे." राजेश बाबांना सांगत होता.
" आत्ता बोलशील असे नंतर बोलू नकोस. मी राजेश रावांच्या बाजूने नेहमीच असणार आहे. तू कितीही विरोध केला तरी. त्यांना आपल्या घरात आणि सोनियाला भेटण्यापासून कोण आडवं येतयं तेच पाहायचे आहे मला. त्याची माझ्याशी गाठ असेल."
" बाबा या परक्या माणसासाठी तुम्ही स्वत:च्या मुलाला बोलताय. काय वो झाल का तुमच समाधान आमच्यात वादाची ठिणगी पेटवून निर्धास्त झाला असाल ना तुम्ही."
" राहूल रागवू नका. तुम्हांला देखील माझ्यावर विश्वास बसेल कधी ना कधी."
" बाबा काय चालले आहे तुमचे. आणि राहूल तू विसरु नकोस राजेश आपले जिजू आहेत. हिच गोष्ट आपल्या ताईच्या आयुष्यात नाहीतर जिजूंच्या आयुष्यात घडली असती आणि ताईला तिच्या घरातल्यांनी असा विरोध केला असता तर तुला पटले असते का?" नैना राहूलला समजावून सांगत होती.
" तुमच्या डोळ्यावर याने पट्टी लावली आहे. हि एकदा उघडली ना तेव्हा याचे खरे रुप कळेलच तुम्हांला. माझी ताई जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत मी याच्याबरोबर त्याचे लग्न होवून देणार नाही. तिची संमती असेल तरच लग्न होईल. याबाबत कोणीही जबरदस्ती केलेली मला आवडणार नाही. मग कोणीही असो."
" तू काय बोलतोय याचा अंदाज आहे का तुला. कि उचलली जीभ लावली टाळ्याला. आता तू बाबांच्या विरोधात बोलायला लागला का? "
" बाबांना जर ति-हाइक माणसांवर जास्त विश्वास असेल तर मी तरी काय करणारं."
" बाबा मी आता निघतो. फोनवर आपले बोलणे होईलच."
" बर चालेल." बाबा बोलत होते.
" राहूल तू जरा शांत हो बाळा. अरे ते आपली सोनिया चांगली व्हावी याकरताच प्रयत्न करत आहे. तू चुकीच समजू नको त्यांना."
" बाबा सध्या तरी माझा त्याच्यावर काडीमात्रही विश्वास नाही. जेव्हा मला पटेल तेव्हा मी माझी काही चूक झाली असेल तर कबूल करेल पण आत्ता नाही."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा