सेरेनेडिंग माय हार्ट अंतिम भाग १०

प्रेमाचा एक शेवट असाही.
मागील भागात आपण पाहिले की, सोनियाचा अपघात झाल्याने तिची स्मृति पाच वर्ष मागे गेली होती. तिच्या अपघाताला राजेश सर्वस्वी जबाबदार आहे असे राहूलला वाटत असल्याने राजेश बरोबर वादाची ठिणगी पेटली होती.तर सोनियाचे वडिल आणि नैना मात्र राजेशच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते. आता पाहूया पुढे,

राजेशला सोनिया आपल्या आयुष्यात हवी असते. तो तिला प्रत्येक क्षणाची आठवण करुन देण्यासाठी बाबा आणि नैनाच्या मदतीने प्लॅन आखत होता.

" एवढ्या पाच वर्ष मागे जावून त्या जर सोनियाला तिच्या लग्ना बाबत विचारले तर वेगळे नाही का वाटणार."बाबा काळजीने विचारत होते.

" लगेच लग्नाचा विषय नको काढायला. आधी एकदा मैत्रीचे नाते निर्माण करुया पहिले. सतत सहवास, गाठी भेटितील ते गिफ्ट पुन्हा तिला घेवून दिले तर कदाचित तिला काही आठवते का ते पाहूया."राजेश बोलत होता.

" मला वाटत रिजल्ट डिक्लेअर झाला हे दाखवून आपण एक - दोन महिन्यातच एखाद वर्ष पुढे सरकलेलं दाखवूया. मी मागच्या काही वर्षांची कॅलेंडरची प्रिंट काढून आपल्या नेहमीच्या ठिकाणी कॅलेंडर लावले आहे."

सोनियाला नैना बाहेर फिरायला घेवून आली होती. तिथे राजेश देखील आला होता. त्याने सोनियाला पाणीपुरी खायचा आग्रह केला होता. पण तिला आता पाणीपुरी खायची इच्छाच झाली नव्हती.तिने पाणीपुरीला विरोध दर्शवला होता. साड्यांची खरेदी करायला म्हणून नैना सोनियाला साड्यांच्या दुकानात घेवून गेली होती.राजेश सेम तशीच साडी घेतली होती.साखरपुड्याकरता घेतली होती तशीच तिला काही आठवते का ते पाहण्याचा नैना आणि राजेशचा प्रयत्न फोल ठरला होता. तिने ती साडी आवडली असल्याचे दर्शवले परंतु त्यात तिला काही आठवणीत असल्याचे दिसतच नव्हते.

राजेश पुन्हा काही दिवसांनी सोनियाला भेटण्याचा प्रयत्न करत होता. नव्या उमेदिने तिला काही आठवते का ते पाहत होता. नैना देखील एक वर्षाचे पास झाल्याचे सर्टिफिकेट सोनियाला दाखवून महिन्याभरातच वर्ष पुढे ढकल्याचे दाखवत होती. सोनियाला गोळ्या आणि औषधांनी गुंगी येत होती. नैना आणि राजेश तिचे मन गुंतावे म्हणून तिला बाहेर घेवून जात होते.

सोनियाला डाॅक्टरांकडे चेकिंग करता नेण्यात आले होते. परंतु सोनियाचा मेंदू वास्तविकता स्विकारायला तयार होतच नव्हता. आॅपरेशन नंतर सोनियाची जी अवस्था होती ती त्याच वर्षात होती. तिला कितीही सर्टिफिकेट किंवा कॅलेंडर दाखवले तरी ती तेवढ्यापुरती नाॅरमल झाली की पुन्हा पाच वर्ष मागे जात होती.

" तुम्ही हव तर अमेरिका, बेस्ट डाॅक्टरांना बोलवा पण सोनियाला बर करा." बाबा डाॅक्टरांशी बोलत होते.

" एका डाॅक्टर लकीली भारतात कालच आले आहेत. त्यांना फोनवर मी हि केस सांगितली आहे. ते उद्या येणार आहेत. तुम्ही उद्या एकदा पुन्हा या."

" हो येतो आम्ही उद्या परत. "

" ह्यांच्याकडे बघून असे वाटते की जेव्हा अपघात झाला तेव्हा जबरदस्त मानसिक धक्का आणि मेंदूतील रक्तस्त्राव यामुळे त्यांच्या मेंदूने त्या ज्या अवस्थेत आहेत तश्याच राहतील. जर का त्यांना काही आठवले तर ते तात्पुरते असेल."

हे ऐकून बाबा आणि नैना रडायला लागले होते.राजेशला देखील याबाबत सांगण्यात आले होते.

" बाबा आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. डाॅक्टरांनी कितीही काही सांगू दे. चमत्कार घडायला वेळ लागत नाही. सोनिया तर स्वामी भक्त आहे. ज्यांच्यात अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आहे. स्वामी दाखवतील काही ना काही मार्ग."

" जिजू आता तुमच्या बोलण्याने मला देखील हुरूप आला आहे. मी देखील ताईच्या बाबतीत खचून जाणार नाही."

एक वर्ष उलटून गेले होते.

" राजेशराव तुम्ही आता सोनियाला विसरून जा. अजून किती वर्ष तिच्याकरता थांबणार आहात. तुम्ही तुमच्या संसारला लागा."

" बाबा अस बोलून मला परक करु नका. ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. दुसरे लग्न केले तर आमची कायमची ताटातूट होईल. मित्र म्हणून का होईना सोनिया आणि माझ्या मध्ये मैत्रिचे नाते निर्माण झाले आहे. मी त्या नात्यावरच माझे आयुष्य काढायला तयार आहे."

" जिजू मला माफ करा मी तुम्हांला समजू शकलो नाही." राहूल राजेशकडे पाहून बोलत होता.

" तुझा माझ्यावर विश्वास बसला हेच माझ्याकरता खूप आहे साले साहेब."

" मी तुम्हांला एवढे बोललो तरी तुम्ही मला इतक्या सहज कसे काय माफ केले."

" कोणतेही नात मनापासून स्विकारताना त्या व्यक्तिला आपल म्हणून जपलं की राग आणि द्वेष फिका पडतो. मग कसला राग येणार."

सोनिया आणि राजेश जगा वेगळ्या नात्यात गुंफले गेले होते. सातजन्माची वचन भलेही घेतली नसली तरी मैत्रीच्या पवित्र बंधनात सोनियाने मात्र राजेशला आपलेसं मानले होते.

तिचं लग्न करुन द्यावं तरी कसे. कारण ती स्वत:ला अजूनही लग्नाच्या वयाची समजतचं नव्हती. एका वर्षा पाठोपाठ नैना आणि राहूलचे लग्न मात्र होते. नैना तिच्या नव-या सोबत दुबई ला निघून जाते. राहूल आपल्या बायको सोबत कामा निमित्ताने दुस-या शहरात शिफ्ट होतो. सोनियाला भेटायला राहूल आणि नैना दहावीतला मुलगा आणि बारावीची मुलगी बनूनच भेटायला येत होते. कारण जरा जरी बदलण्याचा प्रयत्न सोनियाच्या आता जीवावर बेतणारा होता.

तीन वर्षानंतर सोनियाला अचानक चक्कर आली होती. तिला ताबडतोब हाॅस्पिटल मधे आणण्यात आले होते. सोनिया आता शेवटचे काही दिवसचं आपल्या सोबत असल्याचे डाॅक्टर सांगतात.

" आपल्या हातात आता किती दिवस शिल्लक आहेत डाॅक्टर? स्पष्ट सांगा."राजेश विचारत होता.

" खरतर एक आठवडा किंवा त्यापेक्षाही कमी दिवस आहेत."

सोनियाला राजेश आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवतो. क्षणभरासाठी का होईना त्याला सोनिया समोर हा विषय तिच्या शेवटच्या का क्षणी काढायचाच होता.

आश्चर्य म्हणजे सोनियाने देखील राजेशला जवळ बोलावून त्याचा हात हातात घेतला होता. डोळ्यांमध्ये तिच्या आसवे जमा झाली होती. ती काही बोलणार इतक्यात सोनियाने शेवटचा श्वास घेतला होता. ती हे जग कायमचे सोडून गेली होती.

" सोनिया अग बोल‌ ना काहीतरी. डाॅक्टर हि बघा ना काहीच बोलत नाही. लवकर इकडे या."

" साॅरी त्या या जगात आता राहिल्या नाहीत."

अस नाही होवू शकत. डाॅक्टर तुम्ही काहीतरी करा ना. असे म्हणतच सोनियाला पाहतच तिच्या बेडजवळ राजेशला अॅटॅक आला होता. त्याने देखील सोनियाकडे पाहत आपले जीवन संपवून टाकले होते.

" काय म्हणावे यांच्या अमर प्रेमाला. मीच ओळखू शकलो नाही. जिजू मला माफ करा." असे रडत राहूल बोलत होता.

" ताई अशी कशी सोडून गेलीस आम्हांला? " नैना देखील रडत होती.

सोनियने आपल्याला स्विकारले हि भावना आनंदाची आणि त्याच क्षणी तिचं जगातून निघून जाणे याचा धसका राजेशने घेतला होता. यातच त्याचा देखील मृत्यू झाला होता.

समाप्त:

🎭 Series Post

View all