सेरेनेडिंग माय हार्ट भाग १

हळूवार उलगडणारी प्रेमकथा.
नैनाला अचानक घरी आलेलं पाहून सोनियाने घट्ट जावून तिला मिठी मारली होती. नैना काॅलेज मधून काही दिवसांची सुट्टी घेवून आपल्या बहिणीला आश्चर्याचा धक्का द्यायला आली होती.

" माझ्या बहिणीचं लग्न जमतयं आणि मी इथे नको का? मुलगा कसा आहे? माझ्या बहिणीला सुखात ठेवेलं की नाही पाहायला नको का मग. "

" बर झाल तू आलीस नैना. मला सांग कोणती साडी घालू यातली. आणि ज्वेलरी घ्यायला आपण दुपारी बाहेर जावून येवूया. ऐनवेळी हे विसरले आणि ते राहिले असे होते बघ."

" ताई, हे घे. कानातले आणि त्यावर मॅचिंग असणारे गळ्यातले."

" हे तर आईचे झुमके आहेत. तुला आवडते म्हणून तू आईची आठवण म्हणून तुझ्याकडे घेवून गेली होतीस ना? "

" तुला पण हे कानातले तेवढेचं आवडतात हे मला माहिती आहे. म्हणूनच मी येताना तुला कार्यक्रमात घालता यावे म्हणून आणले आहेत."

" तुझं माझ्यावर असणार इतकं प्रेम मला आत्ता पर्यंत कसे कळले नाही ग? मी किती तुला ओरडत असते. हे नको करु. शहाण्या सारख वागत जा."

" इतकं पण इमोशनल व्हायला काय झालं तुला? मी फक्त ते कानातले एक दिवसा करता तुला घालण्याची परवानगी देत आहे. नंतर परत मी माझ्या सोबत हाॅस्टेटला गेले की सोबत घेवून जाणार आहे."

" तरीच म्हटलं तू कधी पासून तुला आवडणारी गोष्ट शेअर करायला लागलीस."

" बर चल मी आधी मला लागणारे पुस्तक आताच शोधून ठेवते जी जाताना मला घेवून जायची आहे. निघताना परत घाई होते. आणि जे बरोबर घेवून जायचे आहे. तेच नेमकी विसरुन जाते."

" अग आत्ताच तर आली ना तू. लगेच जाण्याची भाषा करते."

" मी चार दिवसांकरताच आले आहे बर का? काॅलेजच्या सुट्यांना आली अशी काय विचारते मला. तुझ्या चेह-यावरचा आनंद पाहण्याकरता आले मी खासम खास."

" गुणाची बहिण माझी. संध्याकाळी काय बनवायच तुला खायला?"

" तुझ्या हातची पावभाजी मी खूप मिस करते ताई. वेगवेगळ्या हाॅटेल‌ मधे जावून मी ट्राय केलं. पण तुझ्या हातची चव कोणाच्याच हाताला नाही बघ. "

" तू जरा वेळ आराम कर. तुला आवडणारा मक्याचा चिवडा त्या डब्यात भरुन ठेवला आहे. तो‌ खावून घे. मी थोडावेळ बाहेर जावून येते."

" आता काय मला सारखी खायलाच घालणार आहेस का? कमी केलेली तब्येत परत वाढून जाईल अश्याने."

" काही नाही वाढत वजन तुझे. आता नाही खाणार तर कधी खाणार तू. चार दिवस आली आहेस तर मला जे-जे तुला खाऊ घालावे वाटेल, ते-ते मी खाऊ घालणार. तुझे जी काय पथ्य तिकडे हाॅस्टेटला जावून पाळायची."

" हाॅस्टेल मध्ये जी मेस आहे. तिथल्या काकू खूप छान आहेत अग. मी त्यांना कमी तेलातल्या भाज्या आणि भाकरी करायला सांगितले तर माझ्यासाठी कमी तेलात परतलेली भाजी काढून ठेवतात काकू नंतर पुन्हा सगळ्यांकरता तेल टाकून भाजी बनवतात."

" तू जिथे जातेस ना तिथे ऋणानुबंध जोडत असते. हिच तर तुझी खासियत आहे. बर चर जावून येते मी पटकन बाहेर. नाहीतर फक्त गप्पांचीच पावभाजी खायला लागेल तुला."

" लवकर जा आणि घेवून ये भाज्या . आणि हो..... ऐक ना."

" बेकरीतून पाव आणताना क्रिमरोलच पॅकेट आणायचे विसरु नको बर का? "

" तू तर माझं वाक्यं पाठच करुन ठेवलं आहेस का काय?"

" हे बघ ग काय आणले मी तुझ्यासाठी. तुला हा कलर आवडतो ना."

" आता मला कशाला नविन‌ ड्रेस आणला ताई. मी थोडीच पुढे येणार आहे. आपला भाऊ राहूल आणि पप्पा मला एका खोलीत डांबून ठेवणार आहेत."

" बरोबरच आहे मग. असच करतात की. ताईचा पाहण्याचा कार्यक्रम होईपर्यंत तुला काही खोलीच्या बाहेर पडता येणार नाही बर का? आधीच सांगतोय. नंतर परत नखरे चालणार नाही तुझे."

" आजच घरी आली आहे ती राहूल. तू काॅलेज मध्ये होतास तर शांतता होती घरात. जरा शहाण्या भावंडासारखे चार दिवस दोघेजण गुणागोविंद्याने राहिले तर काय बिघडणार आहे का तुमचे. मला जरा काही सुचू द्या दोघे."

" याचं सोड ग तू ताई. तशीही मी त्याला दुर्लक्ष करत आहे. तू आणलेला हा ड्रेस मला खूप आवडला. पण मला तो आता नविन लायरा कट नाही का निघाला तसा घ्यायचा होता. आपण शाॅपिंगला जाणार होतो ना? तेव्हा तो ड्रेस घेणार होते मी."

" तेव्हा पण घे. हा मी आणलेला तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे. नेमकी तू चार दिवसांकरताच आली आहेस बोलते. थांबली असती तर आपण तुझा वाढदिवस इकडे साजरा केला असता."

" चालतय ग ताई. पुढच्या वर्षी जोरात करु माझा वाढदिवस. तेव्हा आमचे जीजू पण असतील हो ना राहूल्या? "

" हा हा हा. हो ग नैने."

" नीट बोल माझ्याशी. ताईन बघ माझ्याकरता गिफ्ट आणलयं. तू काही देणार आहेस का नाही मला गिफ्ट? "


" देणार ना. मी तुला गिफ्ट देणार नाही अस कधी झालय का? मी तुला डायरेक्ट पाच वर्षांनी एक वहिनीच तुला गिफ्ट म्हणून द्यावी असा विचार करतो आहे."

" तोंड बघ आधी आरश्यात. कोण तुझ्याकडे पाहून आपली पोरगी‌ देईल का? "

" झाल का तुमचं सुरु. दारात पाय घरात पाय भांडणाचा सूर ऐकू यायलाचं हवा का? आणि हे काय नैना तू कधी आलीस. मला तर काही सांगितल पण नव्हतं. आणि भांडणा बरोबरच पावभाजीचा सुवास देखील दरवळत आहे बर का?"

क्रमशः

🎭 Series Post

View all