Login

सेरेनेडिंग माय हार्ट भाग ३

पाहायला आल्यानंतर एकमेकांसोबत बोलणे झाल्यानंतर पसंती दर्शवली जाते.
मागील भागात आपण सोनियाला पाहुणे पाहायला येणार म्हणून सोनिया आणि नैना हिने केलेली खरेदी पाहिली होती. पाहुण्यांचे आता आगमन झाल्यावर काय घडणार आहे ते चला पाहुया.,

"राहूल, एवढे पाण्याचे ग्लास माझ्या बरोबर बाहेर घेवून ये." काकू

" मी सगळेच ग्लास बाहेर घेवून जातो. तू इडली आणि सांबरची प्लेट भरायला घे."

" आधी त्यांच्यांत थोडफार बोलणं तर सुरु होवू दे. का लगेच द्यायचे खायला त्यांना."

" हा... हा...‌हा. तू पण काकू कमाल आहेस. जोक मारायची एक संधी कधीच सोडत नाहीस तू."

" मुलीला घेवून या आता." पाहुणे मंडळी बोलत होते.

" हे काय आलीच सोनिया. बस इकडे."बाबा म्हणत होते.

" राजेश आणि सोनियाला काही बोलायचे असेल तर बोलू दे. आमच विचारुन झाले आहे सोनियाला." राजेशच्या घरचे बोलत होते.

" सोनिया आपल्या घराबाहेरची गार्डन राजेशला दाखवून आण. "

" हो. बाबा."

" तुम्हांला एकत्र कुटूंबात राहायला आवडते का? "

" हो आवडते ना. माझ्या मामाचे आणि वडिलांच्या घरी गावी अजूनही एकत्र कुटूंब पद्धतीनेच राहतात सगळे."

" तुझ्या अपेक्षा काय आहेत."

" काहीच नाही खरतर. "

" मुलींच्या खरतर खूप अपेक्षा असतात. घर, नोकरी, गाडी. यापेक्षा काहीच नाहीच का तुमची."

" या गोष्टी लग्ना नंतरही दोघेजण मिळून कमावू शकतील. आत्ताच या गोष्टींचा विचार करणे निरर्थक ठरेल नाही का."

" बरोबर आहे तुमचे."

" मला एक बोलायचे आहे."

" बोला ना."

" माझं शिक्षण आहे तर मला नोकरी करायची इच्छा आहे पुढे."

" नोकरी करायची का नाही. हा शेवटी तुमचा निर्णय असेल पुढे."

"बर."

असे बोलून दोघेही घरात आले होते.

दोघेही आत आल्यावर इडली, सांबर , चटणी, खोब-याची वडी आणि गुलाबजाम वर सर्वांनी यथेच्छ ताव मारला होता.

" सगळे पदार्थ सोनियाने बनवले आहेत बर का."

" सुगरण आहे हो मुलगी. अन्नपूर्णा देवीचा आशिर्वादच आहे साक्षात."

सर्वजण खूश होवून घरातून निघून गेले होते. सोनियाची पसंती मुलाकडच्यांनी तर त्यांच्या बोलण्यातून आधीच दर्शवली होती.

" आता त्या नैनाला खोलीतून बाहेर यायला सांगा. ती खूप उत्सुक असणार जाणून घ्यायला."

" हो बाबा मी आत्ताच जातो आणि नैनाला रुमच्या बाहेर काढतो. पण आपण तिला नेमकं काय घडले सांगयचेचं नाही बर का."

" काय झाल ताई. सगळे एवढे शांत का आहात? कसा वाटला मुलगा बाबा."

" काय सांगू मी. सोनियाला विचार."

" ताई कसा वाटला मुलगा तुला चांगला वाटला का बोलताना."

" विचार करायला हवा. वेळ लागेल निर्णय घ्यायला."

" काका तुम्ही तरी सांगा कोणीच नीट बोलत नाही. राहूल काय सरळ उत्तर देतचं नाही कधी."

" अग पोरगं खूप हुशार आहे. त्याला आणि त्यांच्या घरच्या मंडळीला आपली सोनिया खूप आवडली आहे."

" काकू, तुला थोडं अजून थांबता येत नव्हते का ग. सगळे भिंग फोडून टाकले तू."

" तू काय माझी मजा पाहण्यासाठी सगळ्यांना अशी भूमिका घ्यायला लावली होती का? मला आता कोणाशी बोलायचेचं नाही. तशीही मी उद्या इथून जाणारचं आहे."

" अग थांब, ऐकून घे जरा. थोडीशी गंमत कळत नाही का तुला नैना बेटा. काका - काकू खूप दिवसांनी आले आपल्याकडे. अशी वागणार आहेस का तू आता."

वडिलांचे काहीच न ऐकता नैना तिच्या रुम मध्ये जावून रडत बसलेली होती.

" हे माझ्या लाडोबा. हा घे पेढा. तुझ्या जिंजूनी आणला आहे बघ. तुला सर्वांत आधी मी सांगते आहे बघ. मला मुलगा पसंत आहे. आपला होकार देणे अजून बाकी आहे. तुला सांगितल्याशिवाय मी कसा काय होकार देणार आहे."

" काय? खरं सांगते ताई. मस्तच. आता हि बातमी सगळ्यात आधी मीच सांगणार. माझ्या ताईने तिचा होकार माझ्याजवळ व्यक्त केला आहे."

" अग हो जरा थांब. बाकीच्यांना पण विचार करु दे."

" ताई लग्न तू करणार आहेस ना. मग बाकीच्यांची मत कशाला विचारात घ्यायची आहे तुला."

" अस नाही चालत नैना. लग्न केवळं दोन माणसांचे नसते. दोन कुटूंब एकमेकांना जोडली जातात. त्यामुळे सर्वांचा होकार अपेक्षित आहे."

" बर माझी, माताराणी. चल आता बाहेर जावूया."

" एका मिनिटात लगेच तुझा राग- रुसवा गायब झाला का ग. "

" तुला काय करायचं रे. आणि आता माझा भांडणाचा अजिबात मूड नाहीये. मी अतिशय आनंदाची बातमी आता सांगणार आहे."

" तुला सुट्टी वगैरे वाढवून तर दिली नाही ना अजून."

" नको ते तर्क नको ना लावत बसू राहूल तू."

" तुझ्याकडून आनंदाची बातमी म्हणजे हेच अपेक्षित करु शकतो ना मी."

" अरे ते जावू दे ऐका. ताईने आज आलेल्या मुला बाबत पसंती दर्शवली आहे. तिचा होकार आहे बाबा."

" अग वाटलचं होत मला. सकाळीच पूजा करताना देवाने उजवीकडे फूल पाडून शुभ शकूनच घडवलाच होता बघं."

" चला आता तयारीला. आम्ही आजच निघतो. सगळी काम पटकन उरकून आता लगीन घरीच राहायला यावं लागणार."

" काका - काकू तुम्ही आणि माझी भावंड असल्या शिवाय घर भरल्यासारखं वाटणारचं नाही. आणि लग्नात काय काय करायचं हे मला थोडीचं माहित आहे."

" तू नको काळजी करुस. मी आहे ना. सगळे सांभाळून घेईल. सोबतीला जावा, मामी, मावश्या आहेच की. त्यापण आहेत मदतीला. काही चुकलं तरं सांगतिल त्या पण. "

क्रमशः

🎭 Series Post

View all