सेठ ©®विवेक चंद्रकांत.......कमल हा माझा जूना मित्र. गावाच्याबाहेर एकटाच राहतो.मोठे घर. मुलगा पुण्यात सर्विसला... वहिनी कधीच्याच अनंताच्या प्रवासाला गेलेल्या.
तर सांगण्याचा उद्देश असा की दर दसऱ्याला रात्री तो मला आवर्जून बोलावतो.सोने देऊन एकमेकांना मिठी मारून मग तो त्याने खास या दिवसासाठी ठेवलेली स्कॉच काढतो. सोबत खारवलेले काजू. अगदी लिमिटेड स्कॉचची ती थोडीशी झिंग घेऊन मी निघतो. रात्रीचे दहा साडेदहा वाजलेले असतात. थंड हवा असते... मोटरसायकलवर ती थंड हवा आणि पोटातली स्कॉच एन्जॉय करत मी रस्ता कापतो.. अजूनही त्याच्या बंगल्याकडे फार वस्ती झालेली नाही. रस्ता निर्मनुष्य असतो. नाही म्हणायला गावाच्या वेशीवर एक मिठाई नमकीन चे मोठे दुकान झाले आहे. दसऱ्याची दिवसभरची गर्दी आपटून नोकर लोक आवरा आवर करत असतात. सेठ हिशोब करत बसलेला असतो.त्या दिवशी तो नमकिनचा वास माझ्या नाकात जाताच नकळत माझी गाडी त्या दुकानाकडे वळते.
खरेतर मी सुरुवातीला गेलो तेव्हा नोकर कंटाळलेले होते काम करून. दसऱ्याला तोबा गर्दी असते दुकानात.पण सेठ मात्र लगेच बोलला
"बोला सर काय देऊ?"
"चांगले असेल ते द्या थोडे थोडे."
मग त्याने नोकराला फरसाण, शंकरपाळे, चकली सगळ्यांचा थोडा थोडा नमुना द्यायला लावला. सगळेच पदार्थ अप्रतिम होते. नाही नाही म्हणत मी 500 रुपयाची खरेदी केली.
पैसे देताच मालक बोलला.
"पुन्हा या साहेब. जय श्रीकृष्ण"
मालक लक्षात राहिला. उभा चेहरा, उभा गंध,पायजमा झब्बा आणि शांत चेहरा.
आता दरवर्षीचा नियमच झाला परत जातांना शेठकडून फरसाण घेऊनच घरी जायचा.
मी दसऱ्याला गेलो की सेठ स्वतःच म्हणायचा "या तुमचीच वाट पाहत होतो."
पैसे देताच मालक बोलला.
"पुन्हा या साहेब. जय श्रीकृष्ण"
मालक लक्षात राहिला. उभा चेहरा, उभा गंध,पायजमा झब्बा आणि शांत चेहरा.
आता दरवर्षीचा नियमच झाला परत जातांना शेठकडून फरसाण घेऊनच घरी जायचा.
मी दसऱ्याला गेलो की सेठ स्वतःच म्हणायचा "या तुमचीच वाट पाहत होतो."
पाच सात वर्षे झाली या सगळ्याला.
यंदाच्या दसऱ्याला कमल कडे गेलो. यावेळी माझ्याही घरी कोणी नव्हते. पत्नी मुलीकडे गेलेली दुसऱ्या गावी.गप्पा रंगल्या. 2चे चार पेग कधी झाले समजलेच नाही. मध्ये एकदोनदा उठायचा प्रयत्न केला तर कमलच म्हणाला
"जाशील रे, वहिनी नाही घरी मग जायची कशी घाई करतो?"
घडाळ्याचा काटा साडेअकराच्या पुढे गेला तसा घाईत उठलो. म्हटलं" बाबा उदया ऑफिस आहे. घरी जावच लागेल."
गाडी मेंन रस्त्याला लागली. थोडा स्पीड जास्तच होता. नाका पास केला आणि आठवले नमकीन घेतले नाही यावर्षी. पुढे गेलेली गाडी पुन्हा उलट फिरवली तरी वाटतं होते.... दुकान बंद झाले असेल. इतक्या रात्रीपर्यंत काय उघडे राहील?
पण तरी गाडी दामटली. दुकानाचे एक शटर उघडे होते. हुश्श...
पण तरी गाडी दामटली. दुकानाचे एक शटर उघडे होते. हुश्श...
गाडी लावून दुकानात गेलो. एकच जूना नोकर जांभया देत बसला होता.मला बघून त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव आले.
" या साहेब. तुमचीच वाट बघत होतो. "
" या साहेब. तुमचीच वाट बघत होतो. "
"आणि सेठ गेले घरी?"
"सेठ आलेच नाही दुकानात"
"का रे?"
"कालच सेठानी वारली.."
"कसे काय?"
"अटॅक आला साहेब."
"आणि तरी दुकान उघडले."
"आम्हीच सेठला सांगितला. माल तयार होऊन पडलेला, लोकांच्या मोठया मोठया ऑर्डरी होत्या. आम्ही सगळ्या नोकरांनी मिळून चालवले दुकान. सेठ दरवर्षी आम्हांला बोनस देतो, कपडे देतो,आमच्यासाठी इतकं करतो तर आम्हीही काहीतरी करायला पाहिजे ना? हा घ्या तुमचा माल. फरसाण, चोळफल्ली, शंकरपाळे, चकल्या पॅकच करून ठेवला आहे."
मी पैसे दिले आणि सहजच विचारले.
"आज एवढ्या उशिरापर्यंत कसे काय उघडे दुकान?"
"तुमच्यासाठीच साहेब.नऊ साडेनऊ पर्यंत सगळे नोकर गेले. मी बंद करणार तेवढ्यात सेठचा फोन आला. ते सर दरवर्षी येतात रात्री उशीरा. त्यांना माल दिल्याशिवाय दुकान बंद करू नको. केव्हाची वाट पाहत होतो साहेब तुमची."
माझी दारू खाडकन उतरली. Highway वरचे भले मोठे दुकान. चारपाच नोकर दिमतीला असा असामी आणि मी वर्षाला 500 रुपयाचा माल घेणारा किरकोळ गिर्हाईक. त्याने माझी आठवण ठेवावी. त्यासाठी मध्यरात्री पर्यंत नोकराला थांबवावे. मला एकदम भरून आले. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेईना. डोळे पुसून मी घाईघाईने दुकान बंद करत असलेल्या नोकराकडे गेलो.
"तुमच्या सेठचे नाव काय रे?"
(त्यांचे नावही माहित असू नये याची पहिल्यांदाच खंत वाटली.)
(त्यांचे नावही माहित असू नये याची पहिल्यांदाच खंत वाटली.)
" लालाजी, लालाभाई म्हणतात त्यांना. "
"कुठे राहतात ते."
नोकराने पत्ता सांगितला. तो मी नीट लक्षात ठेवला.
उद्या सकाळी लालाभाई कडे जाऊन त्यांना सांत्वना द्यायची हे माझे पाहिले काम असणार आहे.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.