" तू खरंच येणार आहेस घरी?" सुयशने आश्चर्याने विचारले.
" नको येऊ का?" कनिका हसत म्हणाली.
" तसे नाही.. पण.." सुयश अडखळत होता.
" हे बघ, आता आपल्या लग्नाला घरच्यांची मान्यता आहे. तशीही लग्नानंतर मी त्या घरी येणारच आहे. मग आता का नको?" कनिकाने गंभीरपणे विचारले. यावर सुयशला काहीच बोलायला सुचले नाही. त्या घराची अंहं त्या वाड्याची कनिकाला जणू भुरळ पडली होती. तो ऐसपैस वाडा.. त्याच्या चारही बाजूंनी असलेली फुलझाडे. आतले अंगण.. त्यामध्ये दडलेली ती दुमजली इमारत. कोपर्यात असलेली छोटीशी विहीर. बाजूचा गोठा.. सुयशपेक्षाही जास्त तिचे प्रेम त्या वाड्यावर बसले होते.
सुयश आणि कनिका. एकाच कॉलेजमध्ये शिकताना झालेली ओळख आणि त्यातून फुललेले प्रेम. शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागताच दोघांनीही घरी एकमेकांबद्दल सांगितले होते. दोघांच्याही घरातून विरोध नव्हताच. पण झाले असे होते की सुयशच्या जुळ्या भावाचे यशचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. त्यामुळे साधेपणानेच लग्न व्हावे अशी सुयशच्या आईची इच्छा होती. कनिकाला अर्थातच हे सगळे मान्य होते. यशचे निधन झाले तेव्हा ती तिथे आली होती. त्या परिस्थितीतही तिला जमेल तसा वाडा तिने बघितला होता.. त्याच वाड्याची तिला परत ओढ लागली होती. म्हणूनच ती सुयशच्या मागे लागली होती. त्याचे गावही तसे फार लांब नव्हते. सकाळी लवकर निघाले तरिही रात्रीपर्यंत परत येता येत होते.. तसेही सुयशला आईला भेटायचे होतेच त्यामुळेच त्यानेही आढेवेढे न घेता गावी जायचे कबूल केले. कनिकाच्या घरातून काही अडचण नव्हतीच. दोघेही रविवारी सकाळी बाईकवरून गावी जायला निघाले.
दोघेही घरी आले. कधी नव्हे ते वाड्याचा दरवाजा आज बंद होता. सुयशला आश्चर्य वाटले. कोणी गडीही दिसत नव्हते. त्याला आठवलं, आई सांगत होती ते. यश गेल्यापासून कोणालाच वचक राहिला नाहीये. त्याला स्वतःचाच राग आला. त्याने दरवाजा वाजवला. दरवाजा वहिनीनेच उघडला. त्यांना बघून कनिका घाबरलीच.. विस्कटलेले केस, कशीतरी गुंडाळलेली साडी, डोळ्यात वेदना आणि भकास कपाळ.. तिला ते बघवेना. पहिल्यांदा भेटल्या होत्या तेव्हाची उत्साहाने रसरसलेली वहिनी आणि आता समोरची.. काहीच साम्य दिसत नव्हते.

" बसा, पाणी आणते.. चहा घेणार ना?" वहिनी तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. उत्तराची वाट न बघता त्या स्वयंपाकघरात जायला वळल्या. कनिकाने सुयशकडे बघितले..
" मी आईला बोलावून येतो." सुयश त्या नजरेने विचलित होऊन उठला. पाणी आणायला गेलेल्या वहिनी अजून आल्या नव्हत्या. सुयशही कुठे गेला ते समजत नव्हते. स्वतःशीच काहीतरी ठरवून कनिका स्वयंपाकघरात गेली. वहिनींनी गॅसवर पाणी ठेवले होते. पाणी उकळत होतं. पण त्यांचं लक्ष नव्हते. त्या कुठेतरी भलतीकडेच नजर लावून होत्या.

" वहिनी.." कनिकाने हाक मारली..
" शाप आहे या घराला." वहिनी तिच्याकडे न बघता बोलल्या..
" काय?" कनिका विश्वास न बसून ओरडली..
खरंच असेल या घराला काही शाप? की वहिनींचा समज आहे हा बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका नवीन कथेची सुरुवात.. कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा