मागील भागात आपण पाहिले की कनिकाला एक गुंडाळी मिळते ज्यात त्या शापाची कहाणी लिहिलेली असते. आता बघू पुढे काय होते ते..
" पदर पसरते तुझ्यापुढे.. मागे घे तुझा शाप." कनिकाने पान उलटले. अचानक कथा इथेच संपली होती. कनिका बेचैन झाली. तिने परत परत पाने बघितली. नाही. एवढीच पाने होती. ती उठली. तिने परत ते चित्र खाली उतरवले. त्या कप्प्यात काही दिसते का पाहिले.. नाही.. कागदाचा एक कपटाही दिसत नव्हता. तिला खूप खूप रडायला येत होते. शेवटी वहिनी जे म्हणाल्या ते खरे झाले होते. आता तिच्यासमोर दोनच पर्याय होते नवरा किंवा मूल.. तिचे सुयश वर प्रेम होतेच पण तिला स्वतःचे बाळही हवे होते. कनिकाला काहीच सुचेना. ती सुन्न होत होती. तिची विचार करण्याची शक्तीच जणू कोणीतरी काढून घेतली होती. अचानक तिच्यासमोर पूजाअर्चा करणारी तिची आजी आली. ती सतत कसले ना कसले व्रत करत असायची.
" आजी, सतत कसलं ग तुझं व्रत चालू असते? कधी याचे तर कधी त्याचे.." छोट्या कनिकाने विचारले.
" छकुले, तू मोठी झालीस ना की तुला समजेल. हे व्रत आपली मानसिक शक्ती वाढवतात. आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा सहन करण्याची आपली ताकद आपण वाढवत असतो. आपण कसे अडीअडचणीला गरज पडेल म्हणून काही काही साठवून ठेवतो तसे देवाची उपासना करून आपण आपली मानसिक शक्ती साठवत असतो. मला सांग तुझा गणिताचा पेपर असला की तू गणपती बाप्पाला मस्का मारतेस, बाप्पा येतो का पेपर लिहायला? पण तो मदत करणार आहे या भावनेनेच पेपर सोपा जातो ना, तसेच आहे हे.." छोट्या कनिकाला त्या वेळेस हे समजले नव्हते, पण आता तिला नक्की कळले होते तिला काय करायचे आहे ते. कनिकाने डोळे पुसले आणि पदर खोचला, उमासारखा.. तिने स्वतःशीच निश्चय केला , या वाड्याला शापमुक्त करण्याचा.
स्वतःचे आवरून कनिका खाली आली. मालतीताई आणि मधुरा तिथेच बसल्या होत्या. एक क्षण तिला वाटले, आपल्याला जे समजले आहे ते यांना सांगावे. नको.. त्यांना का उगाच टेन्शन द्यायचे? तिने स्वतःला रोखले.
" आई, माझ्या माहेरी देवीचे एक व्रत करतात. मी ते केले तर चालेल का?"
" तुला वाटते तर नक्की कर. खरेतर देवपूजेचेही तूच बघितलेस तरी चालेल मला."
" सध्या नको.. तुम्हीच ते देवाचे सगळे करा. आम्ही आहोतच मदतीला. हो ना वहिनी?" कनिकाने मधुराला मध्ये ओढले. ती फक्त हसली.
" ते बघा तुम्ही. मी जाते आत. माझी जपाची वेळ झाली." मालतीताई जाताच कनिका मधुराकडे वळली.
" वहिनी, तुम्हाला कोणी सांगितले होते, या घराला शाप आहे म्हणून?" अचानक आलेल्या या प्रश्नाने मधुरा दचकली.
" ते म्हणजे.." तिने घाबरून मालतीताई गेल्या त्या दिशेने पाहिले.
" कोणी काही बोलणार नाही, पटकन सांगा."
" जेव्हा यशचे स्थळ चालून आले, तेव्हा कोणीतरी मामाला सांगितलं होते. मामीला मला घरातून घालवून द्यायची घाई. मला यश आवडला होता. मी ही मग त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. बघ काय झाले आता.." मधुरा कोरड्या नजरेने बघत होती. तिचे सगळे अश्रु जणू सुकले होते.
" मी उगाच विषय काढला. जाऊ दे. चला आपण ते नेहमीचे गर्भसंस्काराचे मंत्र म्हणायला जाऊ." कनिकाने विषय बदलला.. तिला वाटत होते, मधुराची काहीतरी मदत होईल. बहुतेक ही लढाई तिची तिलाच लढायची होती, एकटीने.
कनिकाने तिच्या आईला विचारून देवीच्या व्रताची सगळी माहिती घेतली. एका चांगल्या दिवशी तिने त्या व्रताला सुरूवात केली. सुयश शनिवार, रविवार जाऊन येऊन होताच. तो दर आठवड्याला फेरी मारायचा, कनिका लक्ष ठेवत होती, त्यामुळे गडीसुद्धा मन लावून काम करत होते. दुसरीकडे त्या कागदाचा एखादा तुकडा मिळतो आहे का, हे कनिका शोधत होतीच. ते शेवटचे पान कुठे लपून बसले होते ते त्यालाच ठाऊक.
मधुराचे दिवस भरत आले होते. जवळच्याच दवाखान्यात तिचे नाव नोंदवले होते. एक दिवस तिला कळा यायला सुरुवात झाली. कनिकाने तसे सुयशला कळवले. तो तातडीने घरी यायला निघाला. गड्यांच्या मदतीने मधुराला दवाखान्यात दाखल केले. कनिका आणि मालतीताई आतुरतेने दवाखान्याच्या बाहेर फेऱ्या घालत होत्या. कनिका सुयशचीही वाट बघत होती. एक क्षण तिच्या मनात विचार आला, आपल्या डिलिव्हरीच्या वेळेस सुयशही असाच काळजीत असेल? ती स्वतःशीच हसली. सुयश अजून पोहोचला नाही. हे तिच्या लक्षात आले. तिने परत त्याला फोन लावला. फोन एका अनोळखी व्यक्तीने उचलला.

" सुयश?"
" आपण कोण?"
" मी त्याची बायको बोलते आहे. हा फोन तुमच्याकडे कसा आला?"
" त्यांचा अपघात झाला आहे." ते शब्द ऐकून कनिकाच्या हातातून फोन निसटला. मालतीताईंचे तिच्याकडे लक्ष होतेच. त्या तिच्याजवळ आल्या.
" काय ग, काय झाले?"
" काय ग, काय झाले?"
" सुयशचा.. सुयशचा अपघात झाला आहे." कनिका कसंबसं बोलली.
" तू गरोदर आहेस?" मालतीताईंनी रागाने, काळजीने विचारले.
घराण्याचा शाप कनिकाला ही लागेल? हे घर शापमुक्त होणार की नाहीच? पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा