Login

शब्द झाले मुके 37

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 37

"आई, मानसी इकडे येणार नाही. तिने इथे येण्यास नकार दिला आहे." असे राजन म्हणताच राजनची आई स्तब्ध झाली.

"अरे, मग ती कधी येणार आहे? ती तुझ्यासोबत लग्न करणार आहे ना? लवकरच चांगला मुहूर्त काढून आपण तुमच्या दोघांचे लग्न लावून देऊ. एकदा का तुमच्या दोघांचे लग्न झाले की माझी चिंता मिटली." असे राजनची आई म्हणाली.

"अगं आई, मानसी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. ती माझ्यासोबत लग्न करणार नाही. ती मला इथून पुढे साथ देणार नाही." असे म्हणून राजन शांत झाला.

"अरे, पण का? असे काय झाले आहे की ती पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही! तुमचे दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते ना? मग तिने असे अर्ध्यावर तुला टाकून का दिले! ती तुला साथ द्यायला हवी होती. मी तिला जाऊन समजावून सांगू का? तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी एकदा तिच्याकडे जाऊन येते." असे म्हणून राजनची आणि राजनला समजावून सांगत होती.

"नको आई, त्याने काही होणार नाही. तू तिच्याकडे अजिबात जाऊ नकोस. मी आत्ताच तिथून आलो आहे आणि तिने स्पष्ट माझ्यासोबत येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तू तिकडे अजिबात जाऊ नकोस." राजन म्हणाला.

"अरे, मी सांगितल्यावर ती ऐकेल. तिला माझे म्हणणे पटेल. तू असे काही करू नकोस. ती नक्की तुझ्यासोबत येईल." राजनची आई म्हणाली.

"आई, तू अजिबात तिकडे जायचे नाही. तुझा तिथे अपमान झालेला मला आवडणार नाही. काही गरज नाही तिच्याकडे जाऊन तिला समजवायची. तिचे जर माझ्यावर खरे प्रेम असते तर ती नक्कीच माझ्यासोबत आली असती; पण आता ती येत नाही याचा अर्थ ती माझ्या पैशावर प्रेमच करत होती. तिचे माझ्यावर मनापासून प्रेम नव्हतेच." असे राजन म्हणाला.

खरंतर त्याला मानसी त्याच्यासोबत येत नाही याच्यापेक्षा तो कधीच बाप बनू शकणार नाही याचे खूप वाईट वाटत होते; पण आईला कसे सांगावे हे त्याला समजत नव्हते. तो बोलत होता; पण त्याच्या डोळ्यावर अश्रू ओघळत होते. त्याला मानसीसोबत लग्न करायचे होते; पण तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला होता त्यामुळे त्याने मनाची पूर्ण तयारी केली होती; पण आता तो कधीच बाप बनू शकणार नाही याचा अर्थ त्याला कोणीच जीवन साथीच्या रूपाने मिळणार नाही. त्यात आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे खूप वाईट वाटले होते. तो पूर्णपणे हतबल झाला होता. त्याला समोर सगळा अंधार दिसत होता, हे कोणापुढे तरी मन मोकळे करावे असे त्याला मनापासून वाटत होते; पण समोर कोणीच मन मोकळे करायला नव्हते. आता आईला सारे काही सांगून मनाचा भार हलका करावा असे त्याला वाटत होते; पण आई या धक्क्याने गळून पडेल असे वाटून तो शांत झाला. 'आपले दुःख, आपले संकट आपणच सहन करायला हवे. उगीच आईला कशाला टेन्शन द्यायचे. त्यापेक्षा या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे याचा विचार करायला हवा.' असा विचार करत राजन बसला होता. तो विचार करत असताना त्याच्या डोळ्यावर अश्रू ओघळत होते आणि त्याची आई देखील तिथेच बसली होती. तिला मात्र राजनच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नव्हते.

"बाळा, तू काहीही काळजी करू नकोस. मानसीसारख्या छप्पन मुली तुला मिळतील. आता यातून कसे बाहेर पडायचे याचाच फक्त तू विचार कर. तुझ्यासाठी मुली शोधायचे काम मी करेन." असे म्हणून राजनची आई पुन्हा त्याला समजावत होती.

"आई, यापुढे मी कधीच लग्नाचा विचार करणार नाही आणि पुन्हा कधी कुणासोबत माझे मन जुळेल हे सांगता येणार नाही. तू मुली वगैरे काही पाहू नकोस. मी फक्त कष्ट करून आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेन." राजन म्हणाला.

"अरे बाळा, आयुष्यात जोडीदार असणे खूप गरजेचे आहे. तू असे एकट्याने आयुष्य काढण्याचा विचारही करू नकोस. उद्या माझे काही बरे वाईट झाले आणि स्वरा तिचे लग्न होऊन सासरी निघून गेली तर तुझे पुढे काय? याचाही तू विचार करायला हवा." राजनची आई म्हणाली.

"आई, खरं तर लग्न यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. मला आता कोणावरही बंधन लादायचे नाहीत, कोणासोबतही आयुष्य काढायचे नाही. माझा मी एकटा सर्वसमर्थ आहे." असे राजन कुत्सिकतेने म्हणाला. खरंतर त्याला मनातून खूप वाईट वाटत होते

"अरे बाळा, तू असे का बोलत आहेस? तुझ्या आयुष्यातून मानसी गेली तरी अशा छप्पन मानसी तुझ्या आयुष्यात पुन्हा येतील. हिच्यापेक्षा खूप चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात तुला भेटेल. ती तुला या सगळ्या परिस्थितीमध्ये साथ देईल, तुला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करेल. जी मुलगी तुझ्या इस्टेटीवर किंवा तुझ्या संपत्तीवर प्रेम न करता तुझ्यावर मनापासून प्रेम करेल अशी मुलगी तुला नक्की मिळेल. मी तुझ्यासाठी अशी मुलगी शोधेन जी फक्त तुझ्यावर प्रेम करेल. अशा भरपूर मुली आहेत बाळा. तू तसा काहीही विचार करू नकोस." राजनची आई राजनला सांगत होती.

"अगं आई, तू जसे समजतेस तसे काहीच नाही. खरंतर मला हे लग्न करायचेच नाही. आपली अशी परिस्थिती असताना बाबा, दादा आणि वहिनी आपल्याला सोडून गेले असताना मी कसा काय लग्न करू शकतो? आणि माझे संसार थाटून मी आनंदी कसा राहू शकेन? मला फक्त खूप मोठे व्हायचे आहे. आपले जे काही गेलेले आहे ते पुन्हा परत मिळवायचे आहे. बस! बाकी माझी काहीच इच्छा नाही." असे म्हणून राजन शांत झाला.

"ते तर तुला करायचेच आहे. आपले गेलेले वैभव तुला पुन्हा मिळवून आणायचे आहे. ते तर माझेही स्वप्न आहे; पण ह्या सर्वातून तुझे मन हलके होण्यासाठी, तुझ्यावरचा भार कमी होण्यासाठी, तुझ्या आयुष्यात जीवनसाथीच्या रूपाने एक मुलगी यावी अशी माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा तुला पूर्ण करावीच लागणार आहे. तुला माझ्यासाठी हे लग्न करावे लागणार आहे. तू कितीही नाही म्हटलास तरी आज नाही; पण उद्या का होईना तुला लग्नासाठी तयार व्हावेच लागणार आहे. आज जरी मानसीने तुला नकार दिला असला तरी तिच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीची मुलगी तुझ्यासाठी असणार आहे. आता सगळे काही व्यवस्थित करण्याचा आपण प्रयत्न करू." असे राजनची आई म्हणाली.

"आई, तू इतका त्रास करून घेऊ नकोस. मी आहे, सगळे काही व्यवस्थित करेन. तू फक्त तुझी आणि स्वराची काळजी घे. बाकीचे काही करायचं आहे ते मी करेन." राजन त्याच्या आईला समजावत होता.

"मी माझी आणि स्वराची काळजी तर घेणारच आहे; पण त्यासोबत तुझी देखील काळजी मला लागून राहिली आहे. एकदा का तुझ्या आयुष्यात सोबती आला की मग मला कसली चिंता नाही. मी स्वरा सोबत निवांत राहू शकेन." राजनची आई म्हणाली.

"काय आई, मगासपासून मी तुला पाहतोय. माझ्या लग्नाशिवाय दुसरं काहीच तुला सुचत नाही का? अगं, आता दादा आणि बाबांबद्दल समजले त्याचे सोडून तू माझ्या लग्नाच्या मागे का लागली आहेस? तुला समजत कसं नाही की समजण्याच्या पलीकडे तू बोलत आहेस." राजन रागाच्या भरात आईला वाट्टेल तसे बोलत होता. ते पाहून त्याची आई शांत झाली. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू ओघळत होते. याक्षणी काय बोलावे हेच तिला समजत नव्हते.

"आई, खरंच सॉरी ग. माझं चुकलं. मी तुला असं बोलायला नको होतं; पण सध्या मी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे आणि तू लग्नाबद्दल बोलतेस ते पाहून मला खूप राग आला. मी असे बोलायला नको होतो." राजन म्हणाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all