शब्द झाले मुके 46
मेघनाची बहीण मेघनाला घरभर शोधून आली; पण तिला मेघना कुठेच दिसली नाही. ती धावत पुन्हा बाहेर आली आणि तिने आईला पटकन सांगितले की ती घरात कुठेच नाही हे ऐकून मेघनाच्या आईचे हातपाय गळाले. आता तर काही वेळातच या पोरीचे लग्न आहे आणि आताही गेली कुठे? या विचाराने ती धसकन खालीच बसली. आधीच मेघनाची आई आजारी असायची. तिची अशी अवस्था त्यात हे टेन्शन म्हटल्यावर ती आणखीनच कोलमडून गेली. मेघनाच्या बहिणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आता काय करावे हे तिलाही सूचेना. त्या दोघी टेन्शनमध्ये असतानाच राजनच्या घरून फोन आला.
"हॅलो मेघनाच्या आई, तुमची तयारी झाली आहे का? तुम्ही निघाला आहात का? इथे भटजी आले आहेत. काही वेळातच त्या दोघांचे लग्न होणार आहे. इथली सगळी तयारी झाली आहे." असे राजनची आई फोनवर म्हणाली. तेव्हा मात्र मेघनाच्या आईला काय बोलावे ते समजेना. ती प्रचंड घाबरली होती. तिला काय बोलावे तेच समजेना.
"हो, काही वेळातच आम्ही निघतो." असे बोलून मेघनाची आई शांत झाली.
इतक्यात फोनवर कसलासा गोंधळ ऐकू आला पुन्हा धीटाने मेघनाच्या आईने धाडस करून विचारले, "कसला आवाज होतोय? तिथे काही अडचण आहे का?" मेघनाची आई म्हणाली.
"अहो, घरामध्ये राजन कुठेच दिसत नाहीये. कुठे गेला आहे काय माहित? ऑफिसला तर गेला नसेल ना की काहीतरी महत्त्वाचे काम आले असेल काय माहित? तुम्ही या तोपर्यंत येईल." असे राजनची आई म्हणाली.
"अहो, इथे मेघना देखील घरात कुठेच दिसेना. आम्ही सगळीकडे तिला शोधलं. आत्ताच तर होती; पण इतक्यात कुठे गेली काय माहित. ते दोघे ऑफिसला तर गेले नसतील ना की महत्वाची मिटींग आली असेल? काय झाले असेल? मला तर खूप टेन्शन आले आहे." मेघनाच्या आईने राजनच्या आईला सगळे स्पष्ट सांगितले.
"अरे बापरे! मेघना देखील नाही का? याचा अर्थ ते दोघे एकत्रच असतील. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ताबडतोब इकडे या. आपण मिळून काय तो सोक्षमोक्ष लावूयात. ते दोघे कुठे गेले ते पाहूया. तुम्ही पटकन या." असे राजनच्या आईने सांगताच मेघनाची आई आणि बहीण दोघीही राजनच्या घरी जायला निघाल्या. त्या दोघी जरी राजनच्या घरी जात असल्या तरीही मेघनाच्या आईच्या मनात खूप सारे प्रश्न पडले होते. तिच्या मनातून टेन्शन काही कमी झाले नव्हते. ती प्रचंड घाबरली होती. आज लेकीचे लग्न असताना ती अशी घरात न सांगता गेलीच कशी असा प्रश्न तिच्या मनात घोळत होता; पण तरीही त्या दोघी राजनच्या घरी जायला निघाल्या होत्या. काही वेळातच त्या दोघी राजनच्या घरी आल्या. राजनचे घर आणि मेघनाचे घरचे अंतर फार नसल्याने त्या लगेच तिथे येऊन पोहोचल्या.
त्या दोघी राजनच्या घरात गेल्या. आत गेल्यानंतर पाहतात तर राजनचे घर खूप सुंदर सजवले होते आणि हॉलमध्ये सारे लग्नाचे डेकोरेशन करण्यात आले होते. तिथे भटजी देखील येऊन बसले होते. घरचेच लोक असल्यामुळे सगळेजण हॉलमध्ये जमले होते. सगळे जमले असतानाच वधू आणि वर दोघेही गायब म्हणून तिथे एकच कल्लोळ माजला होता. प्रत्येक जण तणावात होते. त्या दोघांना आता शोधायचे कसे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होता. तरीही राजनच्या आईने ऑफिसमध्ये फोन करून राजन आल्यावर त्याला ताबडतोब माझा फोन द्यायचा असे बजावून ठेवले होते. जेव्हा ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा तिला समजले की राजन ऑफिसमध्ये आला नाही. मग कुठे गेला असेल? पण काही का असेना राजन आणि मेघना दोघेही एकत्रच असतील हा मात्र विश्वास त्यांच्या मनात ठाम होता. त्यांना याची जणू खात्रीच होती; पण तरीही प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक होती की या दोघांना काही झाले तर नसेल ना!
छोटी स्वरा तर आता रडण्याच्या घाईला आली होती. ती खूप घाबरली होती. तिला सर्वजण समजावत होते; पण तरीही ती काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मेघनाच्या आईला प्रचंड भीती वाटत होती, कारण लोक काय म्हणतील हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. आपली लेक लग्नाच्या दिवशीच अशी बाहेर गेली म्हटल्यावर उगीच चर्चेला उधाण येईल असा विचार तिच्या मनात डोकावत होता. तेव्हाच राजनची आई मेघनाच्या आई जवळ आली.
"तुम्ही काही एखादी करू नका. आपली मुलं एकत्रच असतील असा माझा विश्वास आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा." राजनची आई मेघनाच्या आईला समजावत होती.
"अहो, पण लोकं काय म्हणतील? लग्नाच्या दिवशीच पोरगी घरातून पळून गेली असा गैरसमज त्यांचा होणार नाही ना?" मेघनाच्या आईने मनातील शंका बोलून दाखवली.
"छे हो, लोक काय म्हणतील इकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जर लोकांचं बोलणं मनावर घेत बसलात तर जगणं मुश्किल होईल. त्यापेक्षा आपली मुलं व्यवस्थित राहू देत इतकाच तुम्ही विचार करा." राजनची आई म्हणाली.
"हो हो, तुम्ही जे काही बोलत आहात ते अगदी बरोबर आहे. लोकांचा विचार करणं चुकीचं आहे. आपली मुलं व्यवस्थित आहेत की नाहीत इतकाच मी विचार करायला हवा." मेघनाची आई स्वतःचे डोळे पुसून घेत म्हणाली.
"मी त्या दोघांना फोन केलाय; पण कोणीही त्यांचा फोन उचलत नाहीये." राजनची आई थोडीशी चिडूनच म्हणाली.
"काकू, ताईचा फोन घरामध्येच होता त्यामुळे ती उचलू शकली नाही. मी नंतर पाहिला. त्यामध्ये तुमचे भरपूर मिस कॉल होते; पण आम्ही इकडे येत होतो त्यामुळे तुम्हाला पुन्हा फोन लावला नाही." मेघनाची बहिण म्हणाली.
"मग राजनने तरी फोन उचलावा! तोही इतका बेजबाबदार कसा वागू शकतो याचेच मला आश्चर्य वाटते. आता हे दोघे लग्न करणार आहेत म्हटल्यावर जबाबदारीने वागायला नको का?" असा प्रश्न राजनच्या आईने केला.
"हो ना. आमची मेघना जबाबदारीने वागते; पण आता ती फोन विसरून कशी गेली असेल?" हा प्रश्न मेघनाच्या आईला पडला होता. इकडे राजनच्या घरामध्ये सगळेजण टेन्शनमध्ये होते. प्रत्येक जण आपल्या परीने तर्कवितर्क लावत होते.
**********
पण जेव्हा मेघना घर न्याहाळत बाहेर आली तेव्हा तिला राजनचा फोन आला. तुझे आवरून झाले असेल तर बाहेर ये. मी तुम्हा तिघींना आणण्यासाठी गाडी पाठवली आहे, असा राजनचा निरोप आल्यावर मेघनाने तो निरोप आईला सांगण्यासाठी जाऊ लागली. पुन्हा तिला काही आठवले तेव्हा ती बाहेर आली. बाहेर येऊन ती पाहते तर गाडी दारात येऊन उभी होती. गाडीमध्ये कोणी आहे का हे पाहण्यासाठी ती गाडीच्या जवळ गेली इतक्यात तिचा हात कोणीतरी ओढला आणि तिच्या डोळ्याला पट्टी लावली. तिला काही समजेना. ती ओरडू लागली इतक्या तिच्या तोंडावरही रूमाल टाकला गेला आणि ती तशीच धडपडत बसली.
"सोडा, मला सोडा" अशी ती जीवाच्या आकांताने ओरडत होती; पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता. तोंडाला रुमाल बांधल्यामुळे तिचे शब्द बाहेर फुटत नव्हते आणि गाडी पूर्ण पॅक असल्यामुळे तिचा आवाज बाहेरही जात नव्हता. डोळ्याला पट्टी असल्याने ती काही पाहू शकत नव्हती. आजच तिचे लग्न होणार होते आणि त्याच दिवशी तिच्या बाबतीत अशी घटना घडावी याचे तिला आश्चर्य वाटले; पण हे नक्की कोण करत असेल हा प्रश्न तिच्याही मनात पडला. ते जाणून तरी कसे घ्यावे हे तिला समजेना.
एका ठिकाणी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून कोणीतरी उतरले आणि मेघनाला बाहेर ओढले. तिच्या तोंडाचा रुमाल काढला आणि डोळ्यावरील पट्टी देखील काढली तेव्हा मेघनाला खूप आश्चर्य वाटले. ती जोरात ओरडली "तूऽऽ"
ती व्यक्ती नक्की कोण असेल?
ती व्यक्ती नक्की कोण असेल?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा