शब्द झाले मुके 51
मेघना लगेचच ऑफिस जॉईन करणार असे म्हणत होती; पण ती जेव्हा ऑफिस जॉईन करेल तेव्हा स्वराचे आणि राजनच्या आईचे काय असा प्रश्न राजनला पडला होता. कारण मेघना जर घरात असेल तर तिचे स्वराकडे लक्ष राहील; पण जर ती ऑफिसला आली तर स्वराचे कोण करेल? मग हे लग्न करून काय उपयोग हा प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत होता. इकडे स्वरालाही मेघना ऑफिसला जाणार म्हटल्यावर थोडेसे वाईट वाटू लागले. कारण आधी मेघना आई नव्हती तेव्हाही ती एकटीच राहायची तिला करमत नव्हते; पण मेघना जेव्हापासून आली होती तेव्हापासून स्वराचा दिवस कसा जात होता हे तिचे तिलाही समजत नव्हते. आता पुन्हा मेघना ऑफिसला जाणार म्हटल्यावर ती शाळेतून आल्यावर तिला एकटीलाच खेळावे लागणार याची खंत स्वराच्या मनामध्ये लागून राहिली होती, म्हणूनच तिने मेघनाला तसा प्रश्न केला होता. आता या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे ते मेघनाला समजत नव्हते. यातून कसा सुवर्णमध्य काढायचा आहे तिला कळत नव्हते त्यामुळे ती शांत बसली होती.
मेघना लगेचच ऑफिस जॉईन करणार असे म्हणत होती; पण ती जेव्हा ऑफिस जॉईन करेल तेव्हा स्वराचे आणि राजनच्या आईचे काय असा प्रश्न राजनला पडला होता. कारण मेघना जर घरात असेल तर तिचे स्वराकडे लक्ष राहील; पण जर ती ऑफिसला आली तर स्वराचे कोण करेल? मग हे लग्न करून काय उपयोग हा प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत होता. इकडे स्वरालाही मेघना ऑफिसला जाणार म्हटल्यावर थोडेसे वाईट वाटू लागले. कारण आधी मेघना आई नव्हती तेव्हाही ती एकटीच राहायची तिला करमत नव्हते; पण मेघना जेव्हापासून आली होती तेव्हापासून स्वराचा दिवस कसा जात होता हे तिचे तिलाही समजत नव्हते. आता पुन्हा मेघना ऑफिसला जाणार म्हटल्यावर ती शाळेतून आल्यावर तिला एकटीलाच खेळावे लागणार याची खंत स्वराच्या मनामध्ये लागून राहिली होती, म्हणूनच तिने मेघनाला तसा प्रश्न केला होता. आता या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे ते मेघनाला समजत नव्हते. यातून कसा सुवर्णमध्य काढायचा आहे तिला कळत नव्हते त्यामुळे ती शांत बसली होती.
"ठीक आहे, मग राहू दे. तुझे तू ऑफिसला जात जा. मी शाळेतून आल्यावर खेळत जाईन. तसेही तू संध्याकाळी ऑफिसमधून येशीलच ना तेव्हा आपण खेळू. त्यानंतर तर तू माझ्यासोबतच असणार ना. जशी मी शाळेला जाते तशी तू सुद्धा ऑफिसला जात जा. मला काहीच अडचण नाही. मी तुला अडवणार नाही; पण फक्त तू कायम माझ्यासोबत रहा, एवढेच मला हवे आहे." हे असे स्वराचे वाक्य ऐकून राजन आणि मेघनाच्या डोळ्यात पाणी आले. स्वराची आजी तर पदराने हळूच डोळे पुसू लागली. कोणालाच काय बोलावे ते समजेना. सर्वजण शांत बसले. त्या ठिकाणी एक शांततामय वातावरण निर्माण झाले होते.
"नाही बाळा, मी कशाला तुला सोडून जाईन? मी तर नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे. मी तुला अजिबात सोडून जाणार नाही. तू काही काळजी करू नकोस बाळा." असे म्हणून मेघनाने स्वराचा हात हातात घेतला तेव्हा स्वराने स्मितहास्य केले.
"स्वरा, आपण यातून एक सुवर्णमध्य काढायचा का?" राजन हळूच बोलला तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले.
"बाबा, सुवर्णमध्य म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे?" स्वरा प्रश्नार्थक नजरेने राजनकडे पाहतच म्हणाली.
"अगं बाळा, सुवर्णमध्य म्हणजे सगळ्यात सोपे आणि सोयीचे असे, जे सर्वांना योग्य वाटेल." राजन स्वराच्या भाषेत तिला समजावून सांगत होता; पण त्यातले स्वराला काहीच समजेना.
"बाबा, ते राहू दे. तुम्ही काय तो मध्य काढलाय तो सांगा म्हणजे मला समजेल." स्वरा म्हणाली तेव्हा तिथे एकच हशा पिकला.
"हो हो, सांगतो. हे बघ मी काय म्हणतो तुझी ही मेघना आई घरातच बसून काम केली तर. म्हणजे दिवसभरात तिला एक ठराविक काम दिले जाईल. ते ती घरात बसून तिच्या कितीही वेळात अगदी पूर्ण दिवसभरात तिने ते पूर्ण करावे. मग ती मधून तुझ्याशी खेळली काय आणि तुझ्यासोबत अभ्यास केली काय मला तर काहीच प्रॉब्लेम नाही." राजन सहजच बोलला.
"अरे वा! बाबा, तुम्ही तर अगदी सुपर हिरो सारखा बोललात. म्हणजे मेघना आई घरात काम करू शकते! तसे असेल तर मग मज्जाच आहे. हो ना मेघना आई." स्वरा म्हणाली.
"हो चालते की. म्हणजे काय. कारण ऑफिस तर आपलंच आहे मग त्यात आपल्या सोयीनुसार काम केले तर बिघडले कुठे?" राजन म्हणाला तेव्हा स्वरा खुर्चीतून उठली आणि राजनला येऊन बिलगली.
"बाबा, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आता माझी मेघना आई माझ्यासोबतच असणार आहे. ती माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. थँक्यू बाबा." असे स्वरा म्हणाली. मेघनाला सुद्धा हे ऐकून खूप आनंद झाला. आताच तर ती त्या घरामध्ये आली होती आणि इतक्यातच तिला स्वराला सोडून ऑफिस जॉईन करावे लागणार म्हणून तिलाही खूप वाईट वाटत होते; पण राजनच्या या निर्णयाने ती सुद्धा सुखावली होती. राजनच्या आईला तर सगळाच प्रश्न सुटल्यासारखे वाटत होते.
"बरं मेघना, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तर तू उद्या जाण्याची तयारी केली आहेस ना?" राजनची आई मेघनाला म्हणाली.
"आता पुन्हा मेघना आई कुठे निघाली? आता तर ती ऑफिसला जाणार नाही म्हणून बाबा म्हणाले आहेत ना? मग आणि कुठे निघाली?" स्वरात थोडीशी वैतागतच म्हणाली.
"अगं बाळा, मेघना आई ना, उद्या तिच्या आईला भेटून येणार आहे. ती तिच्या आईसोबत दोन दिवस राहून मग पुन्हा इथे आपल्या सोबत राहायला येणार आहे." असे राजनची आई म्हणताच स्वराचा चेहरा पुन्हा उतरला.
"हे काय ग आई, तू तर आत्ताच आली आहेस आणि लगेच आईच्या घरी निघालीस! हे काही बरोबर नाही हा." आता स्वरा चिडक्या सुरात म्हणाली.
"अगं बाळा, मी माझ्या आईला भेटून लगेच येते. मी फार दिवस नाही राहणार तिकडे. मला तर तुला सोडून कुठे करमणार आहे." असे मेघना म्हणाली तेव्हा कुठे स्वरा शांत झाली.
बराच वेळ सगळे वातावरण शांत होते. काही वेळाने स्वराने पुन्हा मेघनाला प्रश्न केला. "मेघना आई, मी तुझ्यासोबत येऊ का उद्या?"
"अगं स्वरा बाळा, उद्या तुझी स्कूल आहे ना? मग स्कूल चुकवून तू कशी जाशील?" राजनची आई म्हणाली.
"अगं आजी, एक दोन दिवसाने काही होणार नाही. मी पुन्हा लगेच मेघना आईला घेऊन येईन ना." स्वरा म्हणाली.
"हो चालेल ना. तसेही तिकडून तू स्कूलला जाऊ शकतेस. तसेही आपण एकाच गावात आहोत ना." मेघना म्हणाली.
"काही गरज नाही जायची. स्वरा, तू इथेच रहा. दोन-चार दिवसांनी काही फरक पडत नाही आणि तसेही याआधी तू एकटीच राहत होतीस ना? मग दोन चार दिवसांनी काय फरक पडतोय." राजन थोडासा रागाचा आव आणत म्हणाला. तेव्हा स्वरा शांत बसली.
"ठीक आहे बाबा, मी जात नाही; पण तुम्ही माझ्यावर रागावू नका." स्वरा हळूच आवाजात म्हणाली.
"अगं बाळा, मी तुला कशाला रागावू; पण असे सारखे मागे मागे जाणे चांगले नव्हे. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत!" राजनने स्वराला समजावले तशी स्वरा शांत झाली.
इकडे मेघनाची मात्र घालमेल होत होती. तिला स्वराला सोडून जाणे नको होते; पण आईसाठी तिकडे जावे तर लागणारच होते. दोन्हीकडे तिचा जीव टांगणीला लागला होता; पण त्यातून कोणता तरी सुवर्णमध्य काढावा या विचारात ती तशीच बसून राहिली होती.
"अगं मेघना, तशीच काय बसली आहेस? जेव ना." राजनची आई मेघनाला म्हणाली तशी मेघनाची तंद्री सुटली.
"हो आई, जेवते." म्हणून मेघनाने जेवायला सुरुवात केली.
"उद्या जाणार म्हणून त्यांचे पोट भरले असेल." राजनने मेघनाला टोमणा मारला, तेव्हा त्याची आई गालातच हसली.
"तू म्हणत असशील तर ती जाणारही नाही." राजनच्या आईने हळूच म्हटले.
"माझा काय संबंध आहे? त्यांना जायचं असेल तर जातील, राहायचं असेल तर राहतील. मी कोणाला अडवत नाही." असे राजन म्हणाला. तेव्हाच कुठेतरी पाणी मुरतंय हे राजनच्या आईला जाणवले. राजनच्या मनामध्ये हळूहळू मेघनाची जागा घर करू लागली आहे हे तिला जाणवले आणि ती मनातच आनंदून गेली.
जेवण आटोपून सर्वजण आपापल्या खोलीत गेले. मेघना आणि राजन देखील गेले. मेघनाने खोलीत पाऊल टाकताच राजनची बडबड सुरू होती; पण तोंडातल्या तोंडातच बोलत होता. मेघनाला पाहून त्याने आवाज वाढवला.
"उद्या जाणं काही गरजेचं होतं का?" मेघनाला आवाज जाईल असे तो बोलला. मेघना मात्र त्याच्याकडेच पाहत उभी राहिली. आता त्याला काय उत्तर द्यावे हा विचार करत ती उभी होती.
"मग मी जाऊ की नको?" असा प्रश्न मेघनाने करताच राजन शांत झाला.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा