Login

शब्द आणि भावना

Feeling
वेळ आली आता अशी
की शब्द गोठले जातात
भावना अल्लड मनाच्या
पापणीतच अडवल्या जातात

असतो जसा नभी चंद्र पुनवेचा
जरी लख्ख सूर्यतिमिर डोकावतात
वाहता झरा शब्दांचा मनात
आता कधीतरीच कागदावर उमटतात

शब्दांशी जरी सोयरीक माझी,
सध्या मी विरहात जगते
शब्दांच्या सागराला कोठे नेहमी
रुसवे फुगवे जाणवतात

ओलावली पापणी म्हणते,
"सरेल लवकर ही घटिका"
अन मनातले भाव सारे
कोर्‍या कागदावर उमटतात
~ऋचा निलिमा