वळणावर सावली

Shadows Is Not Just A Imagination... It Is Speech Of Mind Also.

वळणावर दूर उभी

मी पाहतो माझीच सावली

प्रश्न करावा कुणास .,

मनी चिंतेची शतपावली....


माथ्यावर इवलासा बिंदू

घर्माचा सांगतो का वर्म

भला आपला एकटेपणा 

भला आपलाआपलाच धर्म.


हलते सावली कुणाच्या इशाऱ्यावर

सावलीचीही असते का सावली ?

वळणावर थांबाली कधीची एकटी

तिला भीती नसेल का वाटली..?


सहज हात हाती घेतला सावलीचा

क्षणात मजला ती अशी बिलगली

सरळमार्गी प्रवासी मुळचाच मीही

वळणावर उगाच वरचेवर करतो शतपावली..


©® सदासन