शक्ती -3

Rohan came to know that Sanju was interested in girl ..now they are searching for her .

"पण मग आता काय ?"-आर्या.

"मला असे वाटते ,कि गावातच काहीतरी सापडेल ....त्यासाठी गावात राहूनच शोध घ्यावा लागेल "-अमेय .

"हे बघा ,मला माहित आहे कि ,तुम्हाला हे सोप्पं वाटत  आहे पण ते तेवढास सोप्प नहिये ... संजू गायब झाला.पण फक्त तो एकटाच गायब नाही झाला .ह्याआधी लता नावाची मुलगी हि अशीच गायब झाली .घरच्यांनी खूप शोधला पण सापडली नाही . कोण जाणे काय ते पण त्या जागेजवळ गेलं कि एक अनामिक शक्ती आपल्याला ओढते असं म्हणतात ... बाबू सांगत असतो, तिकडे काहीतरी अघटित होतच असते .तो बंगला  गावाबाहेर असला तरी त्या बंगल्याचं  सावट आहे गावावर ."-रोहन 

"हे बघ असं काही नसत . काही वेळा हे फक्त योगायोग असतात .जेव्हा ती मुलगी गायब झाली तेव्हा कोणी पोलिसांकडे तक्रार नाही का केली ?"-विनोद 

"नाही ,बदनामी नको म्हणून नाही केली तिच्या घरच्यांनी ....पण मला हे कोड सोडवायचं ...कस ते माहित नाही पण सोडवायचं नक्की ."-रोहन 

"हं. आपण सगळे मिळून सोडवू .बघू तरी नक्की काय आहे तिथे ? "-अमेय 

"त्यासाठी आपल्याला  गावाला जावं लागेल .'-सीमा 

"हो ,पण आर्य आणि सीमा तुम्ही येऊ नका ..हे गंभीर आहे ..तुम्हाला काही झाल तर काय करणार आम्ही ..सो, मी ,अमेय आणि विनोद ..आम्ही बघतो काय ते?"-रोहन 

"ये ,आम्हाला काय कमी समजतो का? आणि हो आम्ही हि येणारच ......"-आर्या

"अरे ह्या आल्या तर ह्यांना  बघूनच भूत घाबरून पळून जाईल  ..आपल्याला काही करावं  लागणार नाही ..तुम्ही चला  हं .."-विनोद 

"हे बघा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रश्नच  येत नाही. पण काहीही घडू शकत आणि गावातले लोक पोलिसांची मदत पण घ्यायला तयार  नसतात ..म्हणून मी म्हंटले बाकी काही नाही ."-रोहन .

"हे बघा ,आपण जे करतो ते सोबत करतो ...आणि आमचंही लक्ष नाही लागणार इकडे ...आणि आम्ही जास्त काही नाही पण मस्त गावात राहून निसर्गाचा अनुभव घेऊ ."-सीमा 

"ठरल तर मग , आपण रोहनच्या गावाला जातोय ...घरी काय सांगणार पण ?"-अमेय .

सगळे आत विचार करू लागतात घरी काय सांगायचं आहे  त्याचा...सगळे ठरवतात कि ,सांगायचं रोहनच्या गावाला जातोय सहज रविवारची सुट्टी  म्हणून ....   अमेय घरी येतो आणि आईला सांगतो ,"आई ,ये आई .आम्ही सगळे उद्या रोहनच्या गावाला जातोय ग ."

"काय रे अचानक ?  काय आहे तिकडे "-अमेयची आई .

"काही नाही ग ,सहज सुट्टी आहे म्हणून,येऊ एक दोन दिवसात ."-अमेय 

सगळ्यांनी अशीच कारणे  घरी दिली ,सीमा म्हणाली कि मी आणि आर्य गाव बघायला जात आहोत येऊ लवकरच .आर्य ने हि तेच सांगितले .विनोद काकांकडे राहायला होता त्यामुळे त्याला जास्त काही सांगावं लागला नाही .सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत गावाला पोहचायचं असं ठरवल होत .  सगळे बस स्टॅन्ड  वर जमले आणि बस मध्ये बसले .गावाला पोहचायला ३ तास लागणार होते .

रोहन म्हणाला "हे बघा, माझं गाव लहान आहे .लोक बरंच काहीही बोलत असतात. आपण त्यांच्या भानगडीत पडू नये .तोंडाला तोंड देऊ नका .आर्या, तू जरा शांत राहा तिकडे .असं तस खपवून घेणार नाहीत ते . सरपंचांना उगीच संशय नको .मी सांगणार आहे कि, आपल्याला एका अभ्यासासाठी  इकडे यावं लागलं .आपण सगळे मिळून एक प्रोजेक्ट करतोय असं !"

"ठीक आहे ,बघू आपण ते !"-अमेय 

"मी काय भांडकुदळ वाटते का? मी उगाच काही बोलत नाही ."-आर्या 

बस गावाला पोहचली .स्टॅन्ड वर उतरून सगळे पायी चालू लागले साधारण २ किलोमीटर पायी चालल्यावर त्या गावची वेस  यायची . स्टॅन्डपासून वेशीपर्यंत सुनसान होता रस्ता. सगळे आपले मज्जा मारत चालत होते .आर्या आणि सीमा गावाची हिरवळ बघत चालत होत्या .सगळे रोहनच्या घरी पोहचले . दोन तीन खोल्यांचं घर ते . सगळ्यांनी हात पाय धुतले .आणि आजीने मस्तपैकी चहा दिला बनवून पोरांना .

"आज्जी ,मस्त घर आहे तुमचं .किती गार  वाटतं इथे ."-आर्या 

"हो ना, आज्जी आम्हीपण तुम्हाला कामात मदत करू चालेल ना .तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते ."-सीमा 

"हो हो आजी, ह्यांना चुली फुंकायला सांगा .येत का बघू ..जरा ."-विनोद 

आणि सगळे हसायला लागले .

"अरे पोरांनो ,कामाचं काय आहे त्यात. मी करेन कि सगळं ,तुम्ही फक्त तुमचा अभ्यास करायचा . "-आज्जी 

"ए आज्जी ,संजू चा काही पत्ता लागला का?"-रोहन 

"नाही रे बाबा ,अजून काही  नाही ,पण तू यात पडायचं नाही .ते जाणो अन  त्यांचं काम ....तुम्ही बी पोरांनो तिकडे त्या बंगल्यापाशी जायचं नाही .शापित हाय ते ...संजूच पण त्यामुळंच बर वाईट झालं .."-आज्जी. 

सगळे एकमेकांकडे बघतात ... संध्याकाळचे जेवण आटोपून अमेय ,विनोद ,रोहन गप्पा मारत बसतात .सुरवात कशी करायची हे ते ठरवत असतात .अमेय  म्हणतो चल आपण  संजू च्या घरी जाऊन येऊ . सगळे विचार करतात उद्या जाऊ . तेवढ्यात तिकडून सतीश जात असतो . रोहन त्याला आवाज देतो . सतीश म्हणजे गावातला रोहनच्या बरोबरीचा मुलगा .गावातल्या डॉक्टर कडे कामाला असतो .

"ये सतीश ,काय रे काय चाललंय  ?"-रोहन .

" बरंय सगळं ,अरे तू केव्हा आलास ? बाकी हे कोण सगळे ?"-सतीश .

"अरे हे माझे मित्र आहेत ..अभ्यासासाठी   आलो आहोत इकडे ..तू सांग अजून काय चाललाय गावात  ? संजू च काही कळलं  का रे ?"-रोहन 

"नाही रे ,अजून काही नाही .आणि आता तर कोणी त्याबद्दल बोलत पण नाही . मी सांगू का ?संजू गेला असेल पळून त्या मुलीबरोबर ..."-सतीश .

"कोणत्या मुलीबरोबर ? "-रोहन 

"तुला माहित नाही ?अरे असं कस ?"-सतीश 

"अरे नाही रे बाबा ,सांग तरी कोण होती ती ?"-रोहन 

"आर ,काही महिन्याधी संजू मला त्या मुली बद्दल बोलला होता .त्याच काय झालं एकदा संजूने तिला  नदीकाठी पाहिलं होत  म्हणे .खूप सुंदर होती ती .मग नंतर संजू ने बघितले कि, ती गावाच्या बाहेर असणाऱ्या बंगल्याकडे जातेय ..त्याला आश्चर्य वाटले मग तो तिच्यावर नजर ठेवून होता .अरे बाबूने पण पकडले होते त्याला एकदा तिकडे जाताना."-सतीश .

"हो का ,पुढे काय झालं ?"-विनोद 

"मला काही जास्त माहित नाही .पण संजूच्या घरच्यांना पण कळले होते कि, तो मुलीच्या मागे लागलाय .खूप आरडाओरड झाली घरी. पण एक आहे त्या मुलीला दुसरं कोणी बघितला नाही  . अरे गावात असं पण बोललं जातंय कि ती एक चेटकीण असावी .फक्त म्हणे संजू ला दिसायची .मला तर वाटतंय कि , त्या चेटकिणीने आपली शक्ती वापरून संजूला संपवलंय .."-सतीश . 

एवढा बोलून सतीश निघून जातो .आणि हे मित्र विचार करत असतात .

'म्हणजे हे एक प्रेमप्रकरण आहे तर ...मी आधीच म्हणालो होतो तो पळून गेला असेल ."-विनोद 

"अरे पण मग तिसग्ळ्यांना दिसली असती .ती फक्त संजू लाच दिसली ? "-आर्या

"काय रे रोहन तो बांगला कोणाचा आहे ? आणि त्या घरातील  लोक कुठे असतात ?."-अमेय .

(बंगला कोणाचा आहे ?हे सगळं बंगल्याजवळच का घडत ? ती मुलगी कोण होती ? ह्या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुढचा भाग नक्की वाच .) 

माझी स्टोरी आवडल्यास नक्की कंमेंट करा आणि मला फोल्लोव करायला विसरू नका हा.

🎭 Series Post

View all