शक्ती -5

Seema met with an accident ...Babu is about share past things with all of them ..

 भाग ४ - https://irablogging.com/blog/shakti--4

"तू ,? तू इथे काय करतेस  ?"-रोहन .तेवढ्यात तिथे सीमा आणि आर्या येतात .

"तुम्ही इथे काय करताय ?"-अमेय 

"आम्ही तुम्हालाच बघत होतो ...काय झालं काही कळलं का? "-सीमा .

"नाही ग ,पण कळेल लवकरच ,तुम्ही तर आज्जी सोबत मंदिरात जाणार होतात ना "-विनोद 

"अरे कॉलेज मधून फोन आला होता रमेशचा ....कॉलेज ३ दिवस बंद आहे अजून.ते सांगायला आलो . "-आर्या 

"का?"-रोहन 

"अरे कॉलेज मध्ये संप  सुरु झालाय ...जुनाच  विषय आहे तो ..जाऊ दे "-सीमा 

"चला बरच झालं ,,अजून थोडे दिवस इथे थांबता येईल "-विनोद 

"ए ,ते बघ बाबू येतोय "-अमेय 

सगळे लपतात आणि बघतात बाबू काय करतोय ते ....बाबू च्या हात एक पिशवी असते ..तो लपतछपत जात असतो. बंगल्याच्या अगदी जवळ जातो .जिथे तो उभा असतो तिथून पुढे बंगल्याचं गेट साधारण २०० मीटर अंतरावर असतं.तो पिशवी खाली ठेवतो सामान काढतो .एक नारळ ,लिंबू , काळा दोरा ,बाहुली ,कुंकू ..असं सगळं सामान काढतो .

"ये तो काय करतोय  ?"-आर्या 

"शु .शु, गप्प बस ..तो काहीतरी पूजा करतोय."-विनोद 

"पूजा नाही काळा जादू म्हणतात ह्याला .."-सीमा 

सगळे बघतात काय चाललंय ते .तिन्ही सांज झालेली असते ..  बाबू लिंबू  घेऊन  त्याला काळ्या दोऱ्याने बांधतो मग त्यावर  काली बाहुली ठेवतो आणि मग नारळावर मंत्र टाकत असतो . उदबत्ती जाळतो ,कपूर लावतो नारळावर .गोल गोल चारही बाजूला फिरवतो आणि त्या लिंबासमोर  आणि बाहुली समोर नारळ फोडतो .त्यावर कुंकू वाहतो आणि तिथून निघून जातो .सगळे जण हे सगळं बघतच असतात . ते हि घराकडे परततात .तेवढ्यात घरातून छाया बाहेर पडताना दिसते .

"अरे रोहन कुठे गेला होतास ?"-छाया 

"तुला काय करायचंय ? गेलो होतो गाव बघायला "- रोहन 

" ठीक आहे. नाही सांगायचं तर नको सांगुस जाते मी.. "-छाया .

"कोण रे हि  ?तुझ्यावर भारीच जीव दिसतोय "-आर्या .उगीचच चिडवत होती 

"ए असं काही नाही ग ,इथेच राहते मागच्या गल्लीत . सगळ्या  गावभरच्या चौकश्या असतात तिला ..."-रोहन 

सगळे हसतात आणि आवरून  घेतात .बाहेर येऊन गप्पा टप्प्पा सुरु असतात ,"बाबू नक्कीच काहीतरी घोळ घालतोय .."-विनोद 

"हम्म , तुम्हाला एक लक्षात येतंय का ? संजू ला त्यानेच पकडला होत ,  कोणीही बंगल्याच्या दिशेने जात असेल तर बाबूच  त्याला अडवतो ,म्हणजे बाबू सारखा त्याच रस्त्यावर नजर ठेवून असला पाहिजे आणि आज तोच तिकडे कशाचीतरी पूजा करत होता .."-अमेय 

"म्हणजे ह्यासगळ्यात कुठेतरी बाबूचाच हात आहे .."-सीमा .

"काय रे ?  कशा बद्दल बोलताय ? बाबू च नाव ऐकलं म्हणून विचारले "-आज्जी 

"आज्जी हा बाबू कसा माणूस आहे ,काही कळत नाही ..ते बोलत होतो ..आज त्याला आम्ही बंगल्याच्या दिशेने जाताना पहिले .."-सीमा 

"आग पोरी ,साधा माणूस आहे तो .. गेला असेल काहीतरी कामासाठी.मागे त्याच आणि सरपंचाचा वादावादी  झाली  होती तेव्हा म्हणाला होता शांता आक्का गावाचं काई खरं नाही बघा ..आपण जर का मंदिरात देवीची पूजा अरचा नीट केली नाही तर कोप होईल तिचा .."

"हो का ?कशावरून वादावादी झाली होती नक्की ."-अमेय 

 "काही वर्षांपूर्वी मंदिरातली घंटा पडली होती ,नंतर मग समयी पडून आग लागली होती , मंदिराच्या मागच्या बाजूला काळ्या जादूचे सगळे सामान पडलेले होते ,लिंबू ,दोरे आणि बराच काही , बाबू म्हणायचं कि देवीची पूजा नीट होतं नाही म्हणून हे सगळं होतंय आणि गावावर संकट येण्याचे चिन्ह आहेत ..पूजा करणारा सरपंचाच्या नात्यातला आहे ना आणि मंदिराची जागा बाबूच्या घरच्यांची होती त्यांनी ती मंदिराला दिली होती  .मग काय एका मागे एक  घटना घडत  होत्या .त्यातच अचानक विजय (सरपंचाचा  मोठा मुलगा )आजारी पडला होता मग त्याला शहरात ठेवलं तेव्हापासून ."-आज्जी 

सगळं ऐकून अनेक विचार डोक्यात येत होते..बांबूचं नक्की काय चाललंय ? सरपंच आणि तो का भांडले असतील ?दुसऱ्या दिवशी रोहन आणि त्याचे मित्र परत बंगल्याकडे जायला निघतात  कोणी दिसतंय का ते बघायला ....ज्या ठिकाणी काल बाबूने पूजा केली होती त्या ठिकाणी आता काही नसत .. त्यांना बंगल्याच्या दुसऱ्या बाजूने काहीतरी हालचाल दिसते ,ते पुढं जाऊन त्यांना पकडायचा विचार करतात .रोहन आणि त्याचे मित्र  बंगल्याचं गेट उघडणार तेवढ्यात बाबू त्यांना पकडतो आणि बाजूला नेतो .बंगल्यापासून लांब आणि रागावतो .

"तुम्हाला कळत नाही का?एकदा सांगितलेले ..जाऊ नका म्हणून बजवला होत ना मी ... अरे ती शक्ती ..ती बाई तुम्हाला पण खाऊन टाकेल .....निघा इथून "-बाबू. असं म्हणत तो त्यांना ओढत घेऊन जातो 

"हो पण ,तू तरी इथे काय करतोय ?  बघू तरी कोण आहे तिकडे ?आज आम्हला खरं काय ते कळलंच  पाहिजे नाहीतर  आम्ही सगळयांना सांगू तू काला  जादू करतोस म्हणून .."-रोहन एका दमात सगळं बोलून गेला .

" कशाला विषाची परीक्षा बघताय ? आणि काय म्हणालात  ?मी काळा जादू करतो ..डोकं ठिकाणावर आहे का ?"-रोहन 

"आम्ही पाहिलंय काल ...खोटं नको बोलूस ..नक्की सांग काय चाललाय ते ?"-अमेय 

"संजू ला तूच तर गायब नाही ना केलं ?"-विनोद 

"नाही रे बाबा नाही ,हे काय बोलताय तुम्ही ..संजू माझ्या मुलाप्रमाणे होता ..तो गायब झाला तेव्हापासून मी पण त्याचा शोध घेण्याचं प्रयत्न करतोय ."-बाबू 

"आम्हला सगळं नीट सांग बाबू , सरपंच आणि तुझ्यामध्ये काय वाद आहेत ? कारण ह्यासगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात .आपण  सगळे मिळून संजूला शोधू ,आम्हीपण तेच करायला आलो आहोत "-रोहन 

" सांगतो बाबा सांगतो .."-बाबू 

तेवढ्यात छाया त्यांना शोधत येते . "रोहन ये रोहन ,तुझ्या मैत्रिणीला लागलाय  बघ ....आजी ने तुम्हाला घरी बोलावलंय "-छाया 

"काय ?कोणाला  ?"-रोहन .सगळेच घाईने घराकडे जातात बाबू पण जातो त्यांच्यासोबत . बघतात तर काय सीमा ला लागलं होतं .

"अग,  सीमा हे काय झाल  ?"-अमेय .

"अरे काही नाही पडले मी रस्त्यात म्हणून लागलाय  ."-सीमा .

"अरे काळजी करू नका .ठीक आहे ती ."-आर्या.

"कुठे गेली होतीस ? कशी पडलीस ? काय झालं नेमकं "-अमेय 

"अरे आम्ही फिरत होतो ..पायी चालत चालत मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो होतो . तिकडून  एक गाडीजाताना   पहिली .त्यातून काहीतरी  खाली पडले म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो काही बांगड्या दिसल्या .म्हणून मग आम्ही त्या दिशेने धावत असताना दगड पायाखाली आला आणि मग मी पडले .त्यांना आम्ही बघू नाही शकलो .पण काहीतरी संशयास्पद नक्की आहे ."-सीमा

"हे सगळं काय चाललाय ? कोण असेल त्या गाडीत ? तुम्हाला काय गरज होती त्यांच्यामागे पळायची"-विनोद .

"अरे पण , गाडीत  काहीतरी झटापट चालल्यासारखी वाटत होती."-आर्या 

"ठीक आहे ,बघू आपण ते ..तू बरी आहेस ना आत्ता?  बाबू आम्हला सांग तू काय सांगणार  होता   ते "-अमेय 

सगळे बसले आजी ,रोहन सीमा ,आर्या अमेय आणि विनोद .बाबू सगळं सांगायला लागतो ... 

(बाबू ह्या सगळ्याना   काय सांगेल ?त्याचा ह्यासगळ्या गोष्टींशी खरंच संबंध आहे का?) पाहूया पुढच्या भागात ..

माझ्या कथा आवडल्यास नक्की नावासहित शेअर करा.मला फोल्लोव करायला विसरू नका हा.

🎭 Series Post

View all