शक्ती -7

Ajay an Inspector comes to Rohans place and they all start serching in new way ..they find few things and now Ajay takes doubt on Sarpanch ..

भाग-६ https://irablogging.com/blog/shakti--6

गावात येऊन मुलांना ४-५ दिवस झालेलं असतात . प्रत्येकाच्या घरून विचारणा होते कि कधी परत येणार ते .सगळे एक दोन दिवसात  येऊ असं सांगून वेळ मारून नेतात .सीमा आपल्या भावाला सगळं सांगते . तेवढ्यात सरपंच रोहन ला भेटायला येतात . 

"काय रे पोरा,?हे काय झालं ?"-सरपंच .

"काही नाही ओ पंच ,असच जरा लागलाय .."-रोहन 

"आर पण हे काय ?कस काय लागलाय तुम्हाला ? नाही म्हणजे  कोणी मारहाण केली का काय?"-सरपंच 

"नाही तस नाही ,इतका काही महत्वाचं नाही ते ..जाऊ द्या "-रोहन 

"तेच तर म्हणतोय ना ,जाऊ द्या ,उगाच नसत्या भानगडीत पडू नका ,,अभ्यास करा अन  जावा आपल्या घरला परत ..काय? काय आहे तुम्ही मुलं ऐकत नाही काही आमचा ...कोणाच्याबी नादाला लागून जीव धोक्यात घालू नका ...सांगायचं काम होत  ते केलं आम्ही ..बाकी तुम्ही समजदार आहातच .."-सरपंच 

एवढं बोलून ते निघून गेले सगळे विचार करू लागले "काय रे ?ह्याला कस माहित आपल्याला कोणीतरी मारलाय ?"-अमेय 

"हो ना, त्यानेच केलं असेल म्हणून माहित असेल ...पण त्याला बंगल्यात इतका का रस आहे ? नेमकी काय भानगड आहे ?"-विनोद 

"बघा ना ,आणि त्याच इशारा बाबू कडे तर नसेल ना ..कि त्याच्या मदतीने आपण बंगल्यात गेलो हे त्याला पटलेलं  दिसत नाहीये बहुतेक "-आर्या.

हे सगळं वेगळच आहे ,तिथे काही कोणी शक्ती नाही ..पण मग ती बाई कोण होती ? तिथे कोण राहत असेल ?संजूचा अन त्याचा काय संबंध ?ती घड्याळ कोणाची ?"-रोहन 

तेवढ्यात तिथे  अजय येतो .

"कोणी आहे का घरात ?"

"कोण आपण ? "-रोहन 

"मी अजय ...सीमा आहे का ?"-अजय 

"अरे अज्जू ,तू कसा आहेस ?"-सीमा 

"मी ठीक आहे, पण इथे काही तरी गडबड दिसतेय ...तुला कस काय लागलाय ?"-अजय 

"अरे सांगते, तू आत तर ये ....मित्रानो हा माझा भाऊ अजय .पोलीस अधिकारी आहे ."-सीमा 

सगळे त्याला नमस्कार करतात . रोहन ,अमेय विनोद ,सीमा हे सगळे अजय ला   आतापर्यंत घडलेला सगळं प्रकार सांगतात ...

"हं. असं आहे तर ,तुम्ही खर म्हणजे एकटा जायला नको होत ,तुम्ही पोलिसांना ह्यात सांगायला पाहिजे होत .इथे जवळचा पोलीस स्टेशन असेलच ना"-अजय 

"हो आहे ना,पण पोलिसांना जर सांगितलं तर सरपंचांना सगळं माहित होईल आणि ते पुढे काहीच करू देणार नाही .म्हणून आम्हीच  प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला . इतके दिवस झाले पण संजू चा तपास कोणीच करत नाही .पोलीस सुद्धा  सामील आहेत बहुतेक . पण आता पुढे काय ?"-रोहन 

"ठीक आहे. आपण बघू तिथे काय हाती लागत ते ...चला आपण जाऊ तिथे ... आणि काहीही कारण नसताना पोलिसांवर टीका करणे योग्य नाही ."-अजय 

अजय रोहन अमेय आणि विनोद तिकडे जायला निघतात परत रस्त्यात त्यांच्यावर हल्ला  होतो ,पण ह्यावेळेस  अजय त्यांच्यातल्या एका ला पकडतो आणि पोलीस स्टेशन ला घेऊन जातो .

"ये ,ये काय चाललंय हे ?कोण आहेत तुम्ही लोक ?"- स्टेशन  अधिकारी (सबनीस)

"ह्यांनी आमच्यावर  हल्ला केला म्हणून आम्ही पकडून आणलं ह्यांना .."-अजय 

"कोण आहात तुम्ही ? आणि हल्ला का केला ?"-सबनीस 

"ते तुम्ही त्यांना विचारायला हवं ...आमची complaint  लिहून घ्या साहेब .."-अजय 

"आम्ही काय करायचंय ते तुम्ही नका सांगू ..तुम्ही कोण आहेत ?इथे नवीनच दिसताय.. "-सबनीस 

अजय मग स्वतःची ओळख करून देतो ..सगळे पोलीस त्याला सॅल्यूट करतात सबनीस सुद्धा आता खालच्या पट्टीत बोलायला लागतो .

"साहेब ,तुम्ही इथपर्यंत आलात पण जर मुलांनी आम्हाला सांगितलं असत तर आम्हीच गेलो असतो मदतीला ..."-सबनीस 

"तुम्ही संजय पाटील च्या बतीत काय जाणता,त्याचा तपास कुठपर्यंत आला ?"-अजय 

"तपास कसला साहेब ..जर कोणी complaint  केली तर तपास करू ना? अशी काही complaint  नाही आमच्याकडे .."-सबनीस 

"आणि त्या बंगल्याचं काय ?"-अजय 

"बंगल्याचं काय ?बंद आहे तो किती वर्ष झाले .."-सबनीस 

"चला तर मग आम्ही तिकडेच जातोय ...आणि हि आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या साठी लागणारी परवानगी .."-अजय 

अजय ने काही पेपर समोर मांडले आणि तपास कार्याला खऱ्या अर्थाने  सुरवात झाली .सगळे बंगल्यात पोहचतात ...पाहणी चालू असते .त्याना पण तिथे औषध चे पाकीट ,बांगड्यांचे तुकडे असं बराच काही सापडलं. 

"हे तर ड्रग्स  आहेत आणि ह्या बांगड्या म्हणजे नक्कीच इथे मुली किंवा बायका असणार .."-अजय 

ते सगळे मागच्या बाजूला जातात .तिथे काही गाडयांचे चाकांचे ठसे ,कागद असं बराच काही आढळत .. त्याच झाडांमध्ये त्यांना एक लॉकेट सापडत ..खूप माती आणि धूळ असते त्यावर .

"हे काय ?बऱ्याच दिवसांपासून पडलेलं आहे हे बहुतेक .... कोणाचं आहे ते बघावं लागेल .. दिसताय तेवढा सोप्पं नाही हे ..."-अजय .

पुढे जात असताना अचानक गवताच्या खाली काहीतरी आहे असं जाणवत त्या सगळ्या घनदाट झाडांच्या जवळ पाहणी करताना गवतात एक चेम्बर असल्याचं जाणवते.तिथलं गवत उपटून सगळी जागा बघताना त्या चेम्बर ला लॉक केल्याचं जाणवत ..

"इथे काय आहे ? हे कुलूप तोडावे लागेल ...'-अजय 

सगळेजण ते कुलूप तोडतात ..त्यात खाली जायला एक जिना केलेला असतो .खूप जाळे -जळमट ,अंधार सगळंच असत .अजय आणि सबनीस हळूच खाली उतरतात .नि पाहणी करू लागतात .  त्यांना तिथे काही विशेष सापडत नाही .पण अचानक एका कोपऱ्यात अजय ला काहीतरी चमकतं दिसते ..तो जवळ जाऊन बघतो तर सोन्याच नाणं असत ते घेऊन ते वर येतात .प्रथम दर्शनी पाहणी करून ते घरी परत येतात . 

"पोरांनो हातपाय धुवून खाऊन घ्या काही ..उपाशी तापाशी काम होत नाही .."-आज्जी ने दम भरला .

सगळे जण जेवण आटोपून बसले .अजय हि तिथेच होता .रोहन त्याला बंगल्यात सापडलेलं घड्याळ दाखवले .

"काय रे?काय असेल हे सगळं? कोण असेल ती वाईट शक्ती ?"-सीमा 

"माझ्या प्राथमिक अंदाजावरून तिथे काही भूत वैगेरे नाही .कोणतीही वाईट शक्ती नाही .तस असत तर आपल्यला तिचा आभास झाला असता आणि खर म्हणजे मी ह्या गोष्टीना मानत नाही."-अजय 

"पण मग संजू कुठे गेला असेल  ?आणि जी बाई बाबू आणि संजू ला दिसली तीच काय ?"- विनोद 

"ते तर आहेच . एकदा बाबू शी बोलावं लागेल ..आणि ह्या सरपंचावर पण लक्ष ठेवले पाहिजे ."-अजय 

तेवढ्यात सबनीस तिथे येतात . "तुम्ही ज्या माणसांना पकडून दिल होत त्यांनी सरपंचांचा नाव घेतलं आहे .सरपंचानीच  तो हल्ला केला होता ."-सबनीस 

"ओ ,अच्छा पण असं का केलं  असेल त्यांनी ? चला सरपंचांना भेट देऊन येऊ ....."-अजय 

सबनीस आणि अजय सरपंचान भेटायला जातात ."या या ,सबनीस साहेब ..हे कोण पाहुणे आलेत ?"-सरपंच 

"नमस्कार ,हे इन्स्पेक्टर अजय ..बंगल्याच्या काही गोष्टींचा तपास करत आहेत ."=सबनीस 

"बर बर ,या असा ..काय काम काढलात आज ?"-सरपंच 

"तुम्ही ह्यांच्यावर आणि त्या मुलांवर हल्ला केला असं ह्यांचं म्हणणं आहे ."-सबनीस 

"काय ?अहो आम्ही तर ह्यांना  ओळखत बी न्हाय .हल्ला कसा करणार आणि का म्हणून करणार ?ह्यांनी काय घोड मारलं आमचं ?"-सरपंच 

"तेच तर विचारायला आलो आहोत ...आम्ही अस काय घोड मारलं कि तुम्ही आम्हालाच  मारायला निघालात ?"-अजय 

"हे बघा साहेब ,तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ..आम्ही असं काही केलं नाही बघा ."-सरपंच 

"हे बघा आमच्याकडे पुरावे आहेत .तुमचा माणूस पकडला गेलाय ."-सबनीस 

"मी परत एकदा नम्रपणे सांगतो कि आम्ही असं काही केलं नाही ....तुम्ही आता निघालात तरी चालेल ..आम्हाला जरा काम आहेत "-सरपंच 

"सरपंच ,आम्हला उगीच खाकि  रंग  दाखवायला लावू नका ..खर काय ते सांगा ..नाहीतर अटक करावी  लागेल तुम्हाला .."-अजय 

"असं म्हणताय ..मग बघा तुमचं काय आहे ते ?पण आम्ही काही हल्ला केला नाही .."-सरपंच 

सरपंच काही केल्या सांगायला तयार नव्हते  .काय झाले ते .त्यामुळे अजय आणि सबनीस तिथून निघाले .

"उद्या सरपंचानना  ताब्यात घ्या ..तेव्हाच बोलतील ते .."-अजय 

"हो साहेब ,.."-सबनीस .

अजय रोहनच्या घरी येतो परत .तोपर्यंत संजूचे आई आबा तिथे येतात .

"रोहन अरे पोरा कसा आहेस  तू ? तुला सांगितलं होत ना कि तू ह्यात पडू नकोस म्हणून .."-आबा 

"मी ठीक आहे ,पण तुम्हाला संजू साठी काहीच वाटत नाही ."-रोहन 

"आर पोरा लई  वाटत ,पण काय करू शकतो नियती पुढे ...त्या बाई ने गिळलं त्याला ....बंगल्याच्या वाईट शक्ती पासून कसा वाचेल तो ...त्याला संगितलं होत जाऊ नको म्हणून पण तो गेलाच ना ..आणि परत आलाच नाही .."- आबा (संजूचे वडील)

अजय हे सगळं ऐकत होता ... तेवढ्यात त्याला एक फोन येतो ..

(फोन कोणाचा असेल ?सरपंचानी हल्ला का असेल?) पाहूया पुढच्या भागात ..

कथा आवडल्यास नावासहित शेअर करावी ,आणि माझ्या अश्याच नव्य नव्या कथांसाठी मला फोल्लोव करायला विसरू नका हं.

🎭 Series Post

View all