शक्ती -9

sanju is hospitalized .....he met with an accident ...now ajay is close to solve the case

https://irablogging.com/blog/shakti--8

अजय आणि सबनीस तालुक्याच्या  हॉस्पिटलला पोहचतात . तिथे एका रूम मध्ये त्यांना संजू जखमी अवस्थेत  दिसतो. अजय त्याच्या जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो .पण तो झोपलेला असतो म्हणून अजय  डॉक्टरांना भेटायला जातो .

"मी आत येऊ का ?डॉक्टर साहेब "-अजय 

"हो हो या ..बसा  ..बोला काय मदत करू शकतो आम्ही तुमची  "-डॉक्टर .

"मी अजय ,पोलीस इन्स्पेक्टर .मला जरा संजू पाटील बद्द्ल माहिती हवी होती . म्हणजे तो इथे कसा आला ?त्याला काय झालाय ? "-अजय 

"संजू हा रस्त्यात एका जनाला सापडला ,त्याला खूप लागला होत . आम्ही त्याच्यावर प्राथमिक उपचार केले . औषधांच्या परिणामामुळे तो झोपेत आहेत .हाताला बरच लागलं आहे .हा एक अपघात असण्याची श्यक्यता  आहे . त्याच्या डोक्याला हि जखम झाली आहे ."-डॉक्टर .

"मी त्याला घरी कधी घेऊन जाऊ शकतो ? मला जरा त्याची विचारपूस करायची आहे "-अजय 

" संजू उठल्यावर कसा रिऍक्ट करतो त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे "-डॉक्टर 

सगळे बाहेर येतात ."तुम्हाला एक विचारू का?"-सबनीस 

"विचार ना ,त्यात परवानगी कशाला ?"-अजय 

"संजू इथे आहे हे तुम्हाला कसे कळले ?"-सबनीस 

"त्याच काय आहे ना सबनीस मी काल सतीश ला भेटलो होतो .त्याने संजूला शेवटी बघितलं होत म्हणून विचारपूस करायला गेलो होतो .तेव्हा त्यानेही संजूच्या आणि बाईच्या भानगडी बद्दल  सांगितले . मी त्याला माझा नंबर देऊन आलो होतो .कधी गरज पडली तर असू दे म्हणून ...त्याचाच फोन आला मघाशी .तो इथे दवाखान्याच्या कामासाठी  आला असताना योगायोगाने त्याला संजू इथे दिसला आणि त्याने मला कळवले ."-अजय 

असं आहे तर .."-सबनीस 

तुम्हाला डॉक्टरांनी बोलावले आहे .एका नर्सने  अजय ला सांगितले .सबनीस आणि अजय दोघेही आत गेले तर संजू जागा झाला होता .

"संजू,कसा आहेस तू  ? मी इन्स्पेक्टर अजय ..मला सांग तू कुठे होत इतके दिवस ? "-अजय 

"मला नाही आठवत मी कुठे होतो .माझं डोकं दुखतंय .."-संजू 

"थोडासा विचार कर ...तुला हेसगळ कास लागलाय ?काही अपघात झाला का?"-अजय 

"मी पडलो .गाडीतून ...बाकी काही आठवत नाही ..ती कशी आहे ?"-संजू 

"ती ?..ती कोण ? "-अजय 

"माझं डोकं दुखतंय ..मला नाही माहित .."-संजू 

"हे बघा त्याला ताण देऊ नका ..अजून त्याला थोडा वेळ लागेल ...त्याला ड्रग्स  देण्यात आले आहे त्यामुळे त्याला आठवत नसेल ."-डॉक्टर 

" ड्रग्स ..काय म्हणताय ?"-सबनीस 

"हो ,त्याला ड्रग्स देण्यात आले आहे .माझा अंदाज  आहे कि बऱ्याचदा देण्यात आले आहे ते हि खूप पॉवरफुल ..."-डॉक्टर 

"आम्ही त्याला घरी घेऊन जाऊन शकतो का ?"-अजय 

"उद्या तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता ... आज त्याला इथेच राहू द्या . त्याला थोडा वेळ लागेल ...पण होईल तो बारा .."-डॉक्टर 

"सर ,ड्रग्स कसे काय ?म्हणजे हा ड्रग्स घ्यायचा ?"-सबनीस 

"नाही सबनीस ..तो घेत  नव्हता त्याला दिल गेलाय ..जेव्हा आपण त्या बंगल्यात गेलो होतो  तिथे हि ड्रग्स सापडले होते आठवत का? तसाच त्याला हि दिल गेलाय ..पण कुठे ?तो कोणासोबत होता ?कुठे होता ?हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे ."-अजय

अजय रोहन ला कळवतो सगळे मित्र संजूला भेटायला येतात . त्यांना खूप आनंद होतो .सोबत संजूचे आई आबा पण असतात .

"थँक यु सर ,  संजू सापडला .."-रोहन 

"अरे त्यात काय ? तो सापडला पण अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे बाकी आहे ."-अजय 

सगळे दुसऱ्यादिवशी त्याला घेऊन घरी येतात .इकडे अजय चा तपस सुरूच असतो .ह्या तपासात त्याला बरीच माहिती मिळते .सर्पणाचाच मुलगा विजय त्याला हि पकडून आणतात .जी काली सुमो सापडलेली असते त्यात बांगड्यांचे तुकडे सापडतात .संशियत म्हणून एका जनाला अटक होते . संजुची तब्बेत बरी होत असते .अजय पुन्हा संजू कडे चौकशी साठी येतो .

"काय संजू ,कसा आहेस ?"-अजय 

"मी बरा आहे .पण डोकं खूप दुखत अधून मधून .. काहीच कळत नाही .."-संजू 

"मला तुझी मदत हवी आहे ..मला सांगशील तू कुठे होतास ? काय झालं ?कोण बाई होती तुझ्यासोबत ?"-अजय 

"मला फार काही आठवत नाहीये .त्यादिवशी मी रागाच्या भरात घरातू बाहेर पडलो ..त्या बंगल्याकडे जाऊ लागलो ,मला  तिकडे हालचाल दिसली .म्हणून मी बंगल्याच्या जवळ गेलो .ती मुलगी दिसली .तिचा पाठलाग करत होतो तर कोणीतरी डोक्यावर जोरदार प्रहार केला .मग मला  पुढे काय झालं काही आठवत नाही ..कधी कधी फक्त किंकाळ्या ऐकायला यायच्या .. कोणीतरी शक्ती आजूबाजू वावरतोय असं वाटायचं .."-संजय 

"तू कुठे होतास ?तुला कोणी मारले काही आठवतंय का?"-अजय 

"मला माहित नाही ...ती एक खोली  असली पाहिजे ..  काही पलंग होते तिथे ....कोणी मारलं ते आठवत नाही .. भिंतीवर कोणाचा तरी फोटो होता .अंधुक दिसत होते एकदा .  माझ्या कानावर चित्र विचित्र आवाज येत होते .सारखं इंजेकशन देत होते बहुदा ...सुई टोचल्यासारखं जाणवायचं ..एकदा जाग अली तेव्हा माझे हात बांधलेले होते .थोडासा बघण्याचा प्रयत्न केला पण अंधार होता ..काही आवाज कानावर ऐकू आले ..ते म्हणत होते कि आता इथे राहणं सुरक्षित नाही .... ह्यांना विकून पैसे येईल आणि मग जागा बदलून टाकू .. ह्याला पण घेऊ जाऊ .ह्याच्या किडनीचे पैसे मिळतील ..."--संजू 

"किती लोक होते ?"-अजय 

"मी खूप घाबरलो होतो .थोडी हालचाल केली पण त्यांच्या लक्षात आलं त्यांनी परत मला मारलं आणि इंजेकशन दिल ..दोन लोकांना पाहिलं मी मला इंजेकशन देताना ."-संजू 

"ती मुलगी कोण होती जिच्या मागे तू गेला होतास ?"-अजय 

"खरं म्हणजे , एकदा सहजच फिरताना ती  मला  दिसली होती .एकदम सुन्न होऊन  बसली होती .जणू काही वेगळ्याच जगात हरवली होती .लांबून मी पहिले होते .सुंदर होती ती .मी आवाज दिला होता पण तिने लक्ष दिले नाही कदाचित तिला ऐकू गेले  नसेल .मग नंतर ४- ५ दिवसांनी परत ती दिसली .त्या दिवशी मी तिला आवज दिला .तिने बघितले घाबरली होती ती .रडत होती .मला बघून लागली बंगल्याकडे म्हणून मी तिच्या मागे गेलो होतो हे बघायला कि ती कोण आहे? कुठे राहते ?तिचे  डोळे खुप छान होते ...अजूनही आठवतात ते डोळे .तिच्या मागे जात असतानाच कोणीतरी डोक्यावर मारलं आणि मी पडलो ."-संजू 

"हं ,म्हणजे माझा अंदाज खरा होता ती मुलगी आणि तिचे साथीदार बंगल्यात राहत असले पाहिजे ..अजून काही सांगायचय ?"-अजय 

"अजून तर काही नाही पण हो आम्हाला त्यांनी एका गाडीत बसवलं .मी अर्ध्या झोपेत होतो पण थोडस कळत होत .माझ्या सोबत बहुतेक तीच मुलगी होती आणि अजूनही एक दोन होत्या कदाचित आणि अजूनही दोन माणसे होती  .कुठेतरी घेऊन जाणार होते आम्हाला .ह ,मोठ्या शहरात घेऊन जाणार होते .त्यातच कोणाची  तरी बाचाबाची झाली .काही कळत नव्हते .."- संजू 

"शेवटचा प्रश्न तुझा अपघात कसा काय झाला?"-अजय 

'मला गाडीत बसवल्याचं जाणवत होत .थोडीशी जाग अली होती . हळूच मी माझे  हात सोडवले होते . कस बस गाडीचा दार उघडून खाली पडलो .त्यांच्या लक्षात आलं होत पुढे जाऊन गाडी थांबली आणि माणसं मागे आली होती बघायला, पण मी पडल्यापडल्य रस्त्याच्या किनारी  खाली जाऊन लपून झोपलो  होतो .मागच्या येणाऱ्या गाडयांना घाबरून कदाचित ते निघून गेले ..मग  मी रस्त्यावर चालायला म्हणून पुढे झालो पण तिथेच पडलो . कळलंच  नाही कोणी कुठे नेलं ते ? मग हॉस्पिटल मध्ये डोळे उघडले ."-संजू 

"ठीक आहे बरीच माहिती मिळाली आम्हाला .... तू त्या माणसांचाच वर्णन करू शकशील ?"-अजय 

'मी प्रयत्न करेन ,मला जास्त काही आठवत नाही ..."-संजू 

तिथून निघाल्यावर अजय सबनीस शी बोलत असतो ,"सबनीस एक लक्षात येतंय का तुमच्या ,संजू त्या मुलीच्या मागे गेला आणि कोणीतरी त्याला मारलं .म्हणजे तो नक्कीच बंगल्यातच असावा . दुसरी गोष्ट गाडीत एक दोन बायका आणि हा होता आणि बाचाबाची सुरु होती म्हणजे हि तीच गाडी असावी जी आपल्याला सापडली आणि जी सीमा ने बघितली ..."-

"हो साहेब बरोबर  आहे ,पण साहेब ह्या सगळ्यांमध्ये सरपंच आणि त्यांचा मुलगा ह्यांचा काय संबंध ?"-सबनीस 

"तेच मी पण विचार करतोय ..बघू सापडेल काही तरी ... आणि हो उद्या संजू कडून त्या माणसंच वर्णन नीट बघून घ्या "-अजय 

असं म्हणून अजय रोहनच्या घरी जातो .रोहन व त्याच्या मित्रांना सगळं सांगतो .सगळे मित्र आनंदित होतात .

"चला तर मग ,संजू सापडला ,आता आपण परत जायला मोकळे .."-विनोद 

"हो ना ,कॉलेज पण सुरु झालाय ..उद्याच निघुयात .."-आर्या

"पण अजूनही बरेच प्रश्न आहेत ..ती बाई कोण होती जी संजूला दिसायची ? सरपंचानी आपल्यावर हल्ला का केला ?"-अमेय 

"हो आहेत ना ,पण आपलं काम फक्त संजू पर्यंत पोहचण्याचा होत ...आता ह्यापुढे तुला शोध घ्यायचा  असेल तर मग तू पोलिसांत भरती हो .."-विनोद 

सगळेच हसतात .

"बार झालं बाई त्या पोराला काही झालं नाही .."-आज्जी 

"अजय सर तुमचे आभार तुम्ही त्याला शोधून काढला .."-रोहन 

"अरे आभार कसले ते तर आमचं काम आहे .आणि हो तुम्ही सगळे परत शहरात जा आणि कॉलेज सुरु करा .गरज पडलीच तर कळवेन .बाकीच्या प्रश्नांची उत्तर लवकर मिळतील .."-अजय 

(सगळे निश्चित असतात ..आजचा दिवस छान असतो त्यांच्यासाठी पण अजय ला मात्र सरपंच आणि बांगला ह्यामध्ये काय आहे ते शोधून काढायचं असत ?पाहूया पुढे काय होतंय )

🎭 Series Post

View all