Login

शकुनी आजही जिवंत आहे

Poem About Shakuni
कविता


आजही शकुनी जिवंत आहे


मानवतेचा अवमान
आज होतो सातत्याने
नित्याचीच झाली आहेत
कपट कारस्थाने

आयुष्याच्या सारी पाटात
जेव्हा शकुनीचा शिरकाव होतो
तेव्हा भयग्रस्त द्रौपदीच्या
मनाचा थरकाप उडतो

कौरवांच्या अध:पतनात
शकुनी चेच होते दुष्कार्य
त्यानेच सुडबुद्धीने विझविला
त्याच्या भाच्यांचा सूर्य

आज रक्तही जेथे घेतआहे सूड
मना मनातल्या शकुनी वर आता ओढावा आसूड

जोपर्यंत अन्यायाचे पारडे जड आहे
तोपर्यंत शकूनी आजही जिवंत आहे....


छाया राऊत बर्वे 8390086917