शाळेतली आई
मिताली आठवीत शिकत होती
तशी मिताली शांत असल्यामुळे तिला जास्त मैत्रिणी देखील नव्हत्या म्हणजे तिच्यापेक्षा वयाने मोठ्या तर नाहीच
व आई देखील अशिक्षित असल्यामुळे मुलीला
त्या कठीण दिवसाची पुसटशी कल्पना द्यावी हे देखील तिला उमगले नाही,
नेहमीप्रमाणे आज देखील मिताली शाळेत आली, तिला सकाळपासून खुप थकवा जाणवत होता त्यामुळे ती परिपाठाला देखील थांबली नाही तशीच वर्गात बसून राहिली,
सायली ने खुप विचारले पण ती फक्त "काही नाही ग ....
काही नाही ग ...."
म्हणून टाळत होती
एका माघून एक तास चालू होते,
मूल मुली गप्पा मारत होते
कुणी मस्ती करत होते
कुणी मॅडम ला अभ्यास दाखवत होते तर कुणी इकडे तिकडे फिरत होते
पण मिताली एका जागेवर बसून होती ती थोडी देखील हलत नव्हती,
आता तिचे हळूहळू पोट दुखू लागले
हळूहळू म्हणता म्हणता इतके दुखू लागले की तिला वेदना असह्य झाल्या,
तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी अलगद टिपून ती पुन्हा वर्गात रमण्याचा प्रयत्न करू लागली
पण तिला ते शक्य होत नव्हते
आता तर तिला काहितरी गार गार लागल्याचे ही जाणवत होते
ती घाबरली तिला काय करावे कळेना ती तशीच बसून राहिली
चार तास असेच संपले व जेवणाची सुट्टी झाली
तिने सायली ला तू हो पुढे मी माघून येते असे सांगून
सायलीला बाहेर पाठवून दिले
सगळी मुले मैदानावर डबा खाण्यासाठी जात होती
व आता मिताली देखील जाणार होती
पण तिने सहज तिच्या स्कर्ट ला गार काय लागते हे बघितले
तर हाताला लागलेलं रक्त पाहून ती प्रचंड घाबरली
आता काय करावं
कुणाला सांगावं म्हणून तिला काही सुचेना
ती तशीच जागेवर बसून राहिली
सायली तिची वाट बघून कंटाळली व स्वतः चा डबा खाऊन पुन्हा वर्गात आली तर मिताली अजूनही जागेवर बसलेली होती
"काय ग किती वाट बघितली तुझी तू का नाही आलीस"
"नाही आले मला बर वाटत नाहीये"
"घरी जायचे का ???"
"नाही नको वाटेल बर तू कुणाला काही बोलू नको "
"हे तुझं नेहमीचे असते "
असे बोलून सायली तिच्या शेजारी येऊन बसली,
मुळात काय झालंय या बाबतीत अनभिज्ञ असलेली मिताली मनातून खुप घाबरली
"हे रक्त जर सायली च्या खाली गेले तर तिला काय वाटेल
सांगु का तिला तू दुसरीकडे बस
पण मग तिने विचारले का
तर काय बोलू "
अशा हजार प्रश्नांनी तिच्या मनात गोधळ केला होता, तिला काही सुचत च नव्हते
आता सगळी मुलं वर्गात आली
तशी मिताली आणखी घाबरली
पाचवा तास चालू झाला कुलकर्णी मॅडम आज मुलांना मैदानावर घेऊन जाणार होत्या
जशा त्या वर्गात आल्या मूल एकदम ओरडू लागले
खेळ , खेळ .....
त्यांनी मुलांना ओळीत बाहेर जायला सांगितले,
सगळी मुलं काही सेकंदात मैदानावर पोहोचली पण मिताली व सायली अजूनही वर्गातच होत्या
"काय ग तुम्हांला का नाही जायचे "
मॅडम ने विचारले
"अहो मॅडम जायचे आहे पण ही मिताली सकाळपासून उठत च नाहीये जागेवरून "
सायली बारीक चेहरा करत म्हणाली
"अस आहे का
तू जा सायली बाहेर
मी बघते "
असे म्हणून मॅडम ने सायली ला बाहेर पाठवले व त्या मिताली जवळ बसल्या
मॅडम जश्या जवळ आल्या
तशी मिताली सावरून बसली
तिचे अंग चोरने मॅडम नि हेरले व त्या तिला बोलू लागल्या
"मिताली काय झालंय ग मला सांगशील का ???"
"काही नाही मॅडम "
"हे बघ मला माहित आहे काहितरी झालंय तू जर मला सांगितले तर मी तुझी मदत करू शकेन व नाही सांगितले तर कशी करू "
"मॅडम............."
"हो बोल......."
"माझ्या ड्रेस ला अचानक रक्त लागलंय मला कळत नाहीये काय होतंय "
असे म्हणून ती रडू लागली
मॅडम तिच्या जवळ घेल्या व तिचा हात हातात घेऊन म्हणाल्या
"अग बाळ यात रडण्यासारखे काय आहे
हे नैसर्गिक आहे प्रत्येक मुलगी वयात आली की तिला असे होते चार दिवस त्यालाच पाळी म्हणतात व तुझ्या वर्गातील आणखी मुलींना देखील होत असेल असे पण त्या कुणाला काही सांगत नाहीत "
"हो त्या दिवशी आरती पण खेळायला येत नव्हती व मग अचानक घरी निघून गेली पांढरे सर कडून सुट्टी घेऊन पण रडत होती ती "
"हो का
पण मिताली तुला आई बोलली नाही का ग कधी या विषयी "
"नाही कधीच नाही
मग मला जर माहीत असत अस प्रत्येक मुलीला होतं तर मग मी काहितरी केलं असत ना
पण मॅडम आता मी न लाजता इतर मुलींना सांगणार आहे या दिवसाविषयी
जी वेळ माझ्यावर आली ती दुसऱ्याकुणावर नको"
"अगदी बरोबर शाब्बास
मी मार्गदर्शन शिबिर आयोजित करेन मुलींसाठी मग तू त्यांना मार्गदर्शन कर "
"हो चालेल मॅडम "
म्हणून म्हणून तिने मॅडम ला मिठी मारली,
मॅडम नि तिला व्यवस्थित घरी पाठवून दिले व त्या स्टाफ रूम मध्ये गेल्या
त्यांनी तिथे गेल्यावर त्यांच्या इतर सहकारी मॅडम ला झालेला प्रकार सांगितला
" आजकालच्या आई फक्त टिव्ही व मोबाईल मध्ये व्यस्त असतात त्यांना कळू नये मुलगी वयात येईल तिला अगोदर च या गोष्टी चे ज्ञान द्यावे "
साळवे मॅडम म्हणाल्या
त्यांच्या हो त आणखी देखील दोन तीन जणींनी हो मिळवले
"हो का मग आपली काहीच जबाबदारी नाही ती मुलगी त्यांच्या कडे 12 तास राहते व आपल्याकडे 7 तास उरलेला वेळ ती क्लास मध्ये राहते ,
12 तासातील 8 तास तिचे झोपेत जातात मग विचार करा ती जास्त वेळ कुणाकडे राहते
व शिक्षक देखील दुसरी आई च असतो मग आपले काम नाही का त्यांना या दिवसाची माहिती करून देणे "
कुलकर्णी मॅडम च्या या बोलण्यावर सगळ्यांनी माना खाली घातल्या व आपण पण काहीतरी करावं याविषयी म्हणून तयार झाल्या
कुलकर्णी मॅडम ने सगळ्या मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले व त्याच बरोबर त्या मुलीच्या माता साठी देखील शिबिर घेतले, मुलींशी या विषयी कसे बोलावे, वागावे, त्यांना समज
कशी द्यावी
व शेवटी मिताली सारखी वेळ अजून तरी मॅडम च्या शाळेत कुणावर आली नाही
आता मॅडम च काय पण त्यांच्या मुली व माता पालक देखील या विषयावर मार्गदर्शन करतात
@कथेचे तात्पर्य मुलगी जन्माला घातली की आई म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या वाढतात त्या प्रत्येक आई ने समजून घ्यायला हव्यात, मुलीचे वाढणारे वय तिचे शारीरिक बदल तिच्या लक्षात आणून द्या, मुलीला मुलाप्रमाणे वाढवा तिला शिकवा तिला तिच्या पायावर उभे करा पण तिला जाणीव करून घ्या की बाळ तू एक काचेचे भांड आहेस पडले तर तडकणार पण तिला अशी काच बनवा की जर ती फुटली तर
सूड घेऊनच फुटली पाहिजे,
पाळी या विषयी तिला अगोदरच ज्ञान द्या जेणेकरून तिची मिताली होणार नाही,
कथेचे सर्व अधिकार लेखिका गीता सूर्यभान उघडे यांच्याकडे राखीव असून आपण ती नावसाहित शेअर करू शकता,
कथा कशी वाटली नक्की कळवा
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा