शांत सर की प्रशांत सर संबंध सेतू

माहिती एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची.

"शांत सर की प्रशांत सर"
.......
खरं तर संबंध सेतू सारखं काही मि पहिल्यांदा लिहितोय...मला ते लिहिणं कितीपत जमेल माहिती नाही पण मि पाहिला प्रयत्न करतोय.. तर "चॅम्पियन ट्रॉफी 2023" मध्ये मि सहभाग नोंदवला आणि मला श्रावणी ताईच्या टीम मध्ये काम करण्याचा मौका मिळाला.. या स्पर्धेत भाग घेऊन खूप छान वाटलं.. फक्त कथाच नाही तर नाना विविध प्रकारच लेखन या निम्मित मला करता आलं.. आणि त्याच स्पर्धेचा एक टप्पा म्हणजे संबंध सेतू.
तर मला संबंध सेतू मध्ये लिखाणा साठी प्रशांत सरा विषयी लिहायला सांगितले.. प्रशांत हे नावच किती सुंदर वाटतं ना.." जो आहे खूप शांत शांत तोच आहे प्रशांत".. या नावाचा अर्थ माझ्या मते असाच काही..तशी प्रशांत सरांची ओळख ग्रुप मध्ये ऍड केल्यास सर्वात पहिल्यांदा झाली..श्रावणी ताई नंतर त्यांनीच खूप साऱ्या गोष्टी मध्ये माझी मदत केली.. नवीन असल्याने मला ऍप मध्ये पोस्टिंग वगैरे करणं समजायचं नाही.. त्या वेळी सर माझी मदत करायचे. प्रत्येक फेरी निमित्त ग्रुप मध्ये चर्चा व्हायची आणि त्यात बोलत बोलत सरांची ओळख होत गेली.
सर त्यांच्या नावा प्रमाणे खूपच 'शांत' स्वभावाचे आहेत.. त्यात ही ते 'शिक्षक' आहेत.. मला शिक्षक पेशा लहानपणा पासून खूप आवडतो...पण आज काल शिक्षक होणं कुणालाही नको आहे.. आजची पिढी डॉक्टर,इंजिनीअर याच क्षेत्रात जास्त आपला जमाव जमवत आहे.. जेव्हा सरांच आत्मचरित्र्य वाचलं तेव्हा सरांचा शिक्षक होण्याचा प्रवास वाचून खूप प्रेरणादायी वाटलं.. सर रोज कितीतरी दूरचा प्रवास करून आपली नोकरीं करायचे आणि आज त्यांनी किती तरी मुलांना शिकवून चांगली नोकरीं लागण्या काबील बनवले आहे ही एक खूप मोठी अचिव्हमेन्ट आहे.
सरांच्या लिखाणाचे तर क्या कहने सरांच्या लेखनीतुन नेहमीच एक आदर्श घ्यावा असं त्यांच लिखाण आहे..याच बरोबर सर कविता सुद्धा छान तयार करतात.. याच बरोबर सरांनी केलेली स्टॅन्डअप कॉमेडी तर सर्वांचे रेकॉर्ड ब्रेक करून गेली.. "बाई पण जरी भारी असलं"...तरी.." पुरुष पण लय भारी आहे"... हे सरांच्या स्टॅन्ड अप कॉमेडी मधून सर्वांना समजले
.
सरांचा जन्म नवसाचा आहे मी पण देवाकडे एक नवस करेल की सरांची आणि माझी ओळख कायम अशीच राहु देत.. सरां कडून मला अजून खूप काही शिकायला भेटू देत..लिहायल तर खूप काही आहे..पण लिहती गेलं तर शब्द कमी पडतील असं सरांच व्यक्तीमत्व आहे..तर या संबंध सेतूला इथेच फुल स्टॉप देतो.
....
धन्यवाद.
____
© सुनिध सोहमे.