शापित अप्सरा अंतिम भाग
मागील भागात आपण पाहिले श्रेयसने ग्रंथ हस्तगत केला. त्यानंतर कलिका, तिमिरा आणि सुपर्णाचा अंत झाला. इरावतीच्या शरीरात असलेली सुगंधा धैर्यशीलला मारण्यासाठी सज्ज होती. आता पाहूया पुढे.
आश्लेषाने इरावतीच्या पायाला घट्ट मिठी मारून आई म्हणून घातलेली साद ऐकून सुगंधा क्षणभर थांबली. धैर्यच्या गळ्यावर असलेली तिची पकड सैल झाली. आपले रक्ताळलेले डोळे आश्लेषावर रोखून ती बोलायला लागली.
" प्रेमासाठी माझ्या सगळ्या शक्ती सोडून सामान्य जीवन जगत होते. ह्या महालाकडून काहीच मागितले नव्हते मी. तरीही माझा इतका तिरस्कार केला. माझ्या पोटातला अंकुरदेखील इनामदार होता. त्याची देखील दया आली नाही का? ह्या सगळ्यात वाईट म्हणजे ज्याच्यासाठी मी सगळे सोडून इथे थांबले त्यानेच मला इथे कैद केले. एक अतृप्त आत्मा बनून मी भटकत असताना तो मात्र ऐश्वर्य उपभोगत होता.मग मी का माफ करू तुम्हाला?"
सुगंधा रागाने विचारत होती.
" कारण महालात कैद होताना तुला नाण्याची एकच बाजू दिसली. एकदा माझे सगळे ऐकून घे आणि मग तूच ठरव."
आश्लेषा हात जोडून म्हणाली.
तसे धैर्यला खाली टाकून सुगंधा समोर उभी राहिली. इराचे शरीर अजुनही तिच्या ताब्यात होते. आश्लेषाने सोबत असलेले ते कागदाचे तुकडे केशरकडे दिले.
" सुगंधा,हे सगळे सगुणाबाईंनी स्वतः लिहिले आहे."
केशर कागद हातात घेऊन म्हणाली.
" केशर,मला स्वतः पेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. काय लिहिले आहे ?"
सुगंधा आता बरीच शांत झाली होती.
केशरने कागदातील सगळी हकीकत वाचली. ते ऐकून सुगंधा बरीच शांत झाली होती.
" सुगंधा , सुभानरावांचे तुझ्यावर निस्सीम प्रेम होते. त्यांनी तुला कधीही अंतर दिले नाही. त्यांच्याच वंशातील आम्हाला तूझ्या प्रेमाचे भागीदार कर."
आश्लेषा पुन्हा एकदा सुगंधाला विनवित होती.
इरावतीचे शरीर सोडून सुगंधा बाहेर आली. आता ती तिच्या मूळ सुंदर रूपात होती. साक्षात अप्सरा समोर उभी असल्याचा भास होत होता. श्रेयस ग्रंथ घेऊन पुढे आला.
" योगिनी पंथातील दिव्य ज्ञान आणि अमर व्हायचे वरदान असलेला हा ग्रंथ तुझ्या पायाजवळ ठेवत आहे."
असे म्हणून त्याने सुगंधाला नमस्कार केला.
" केशर, मी माझ्या सामर्थ्याने ह्या ग्रंथाचे पाच भाग करत आहे. सारिका,राघव,इरावती,शकुंतला आणि तू असे प्रत्येकाकडे एक भाग असेल. तसेच माझ्या योगिनी शक्ती मी इनामदार घराण्यातील दोन लेकीना देणार आहे. आजवर मी ह्या महालात अतृप्त राहिले. माझ्या आईपणाची उणीव ह्या मुलीने मारलेल्या मिठीने भरून निघाली आहे. मी माझ्या शाप वाणीतून इनामदार घराण्याला मुक्त करते. आजपासून कोणतीही लेक शापित अप्सरा असणार नाही."
सुगंधा थांबली. तिच्या सभोवती प्रकाश वलय तेजोमान होत गेले आणि एक पवित्र आत्मा अनंतात विलीन झाला.
******** एक वर्षानंतर***********
ह्या वर्षीचे पुरातत्व शास्त्रातील संशोधनासाठी असलेले बक्षीस आणि डॉक्टरेट श्रेयस पद्मनाभ देशमुख यांना प्रदान करण्यात येत आहे. भारतीय लोकसाहित्यात असलेले संदर्भ शोधून अनेक ठिकाणी लपलेल्या अनाम नायिका शोधण्याचे काम त्यांनी केले आहे. आपल्यासमोर आहेत डॉक्टर श्रेयस देशमुख.
टाळ्यांचा कडकडाट होत असताना श्रेयसने माईक हातात घेतला.
" हे पदक आणि डॉक्टरेट अशा एका आईला समर्पित आहे जिने मला प्रेमाचा,त्यागाचा अर्थ समजावून सांगितला. इतिहास शोधताना कायम दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांचे योगदान शोधायचा प्रयत्न गेले वर्षभर करत आहे. तर तुम्हा सगळ्यांना साक्षी ठेऊन हा पुरस्कार स्वीकारतो. आपल्या खेडोपाडी लुप्त झालेल्या ह्या नायिकांच्या कीर्ती सुगंध असाच दरवळत राहो."
श्रेयस व्यासपीठावरून खाली उतरत होता.पाठीमागे एक दिव्य आकृती त्याला आशीर्वाद देत होती.
श्रेयस घरी आला आणि लगेच आवरून निघालादेखील
त्याला पुढच्या दोन तासांनी असलेली न्यूयॉर्कची फ्लाईट पकडायची होती.
त्याला पुढच्या दोन तासांनी असलेली न्यूयॉर्कची फ्लाईट पकडायची होती.
" आशू गेट रेडी, आज आपला पहिला परफॉर्मन्स आहे." अभिजीत ओरडत असताना आश्लेषा तयार होऊन आली.
गळ्यात चंद्रहार,कपाळावर चंद्रकोर,अंगभर नऊवार, हातात बांगड्या आणि पायात तेच दिव्य घुंगरू.
" आशू,मी तुला सोडायला येतो." धैर्यशील म्हणाला.
" ये नाही हा डॅड, मला चिडवतात सगळे."
आशू पटकन बाहेर निघून गेली.
आशू पटकन बाहेर निघून गेली.
जवळच कॉलेज असल्याने ती चालतच निघाली होती.
एवढ्यात तिच्या कानावर शब्द पडले," लूक ब्राऊन करी विथ ब्लॅक ब्रेड."
तिच्याकडे आणि एल्साकडे बघून ते सगळे हसायला लागले.
" एलन स्टॉप दिस नॉनसेन्स!" आशु ओरडली.
" नो, आय डोन्ट, डू व्हॉट एवर यु वॉन्ट."
ते टोळके ओरडले.
आशु स्तब्ध उभी राहिली. तिने त्या चारही मुलांवर आपली नजर रोखली. एका क्षणात ते चारही जण पाच सहा फूट हवेत उडाले आणि खाली पडले. कसेबसे उठून सगळे पळून गेले आणि आशु हसत पुढे निघाली. एक तरुण योगिनी आपल्या शक्ती वापरायला शिकत होती.
" हॅलो,इन्स्पेक्टर सारीक बोलतेय." सारिकाने फोन उचलला.
वर्दिवर मिसमॅच दिसणारे आपले मंगळसूत्र सांभाळत ती बोलत होती. तेवढ्यात तिचा नवरा डबा घेऊन आला.
" लूक सारिका,मी आज दिवसभर मुख्यमंत्र्यासोबत असेल. राघव आणि तू कोणताही वेडेपणा करणार नाहीस. मला वचन दे."
अमेय तिला वचन मागत म्हणाला.
त्याला गुडबाय केले आणि सारिका बाहेर पडली. थोड्या वेळापूर्वी आलेल्या फोनवर सांगितलेला पत्ता तिने मॅपवर टाकला. शहरापासून दूर एका बंगल्याजवळ सारिका थांबली. तिने आपले हत्यार काढले आणि गेट उघडुन आत प्रवेश केला. मुख्य दरवाजा बरेच वर्षे बंद होता.
सारिका मागच्या दरवाजाने आत गेली. टॉर्च लावून सगळीकडे नजर टाकत असताना समोर एक युवती साखळीला बांधलेली दिसली. सारिका सावध झाली ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात तिचा गळा मागून आवळला गेला.
पुढून एकजण सारिकाकडे येतच होता की अचानक सूं सू आवाज करत आलेला बाण त्याच्या कपाळात घुसला आणि सारिकाने खंजीर सरळ हातावर मारून स्वतः ला सोडवले. पुढच्या दोन मिनिटात ते मानव रक्त पिशाच्च मारले गेले. समोर गर्भगळीत असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मेनका हिला सोडवून राघव आणि सारिका वेगाने बाहेर पडले.
शहराच्या बाहेर एका आश्रमाच्या बाहेर तिला सोडून ते लांडगे पळून गेले. रात्रभर सोसलेल्या सामूहिक अत्याचाराने शरीराचे लचके तोडले गेले होते. ती जवळपास बेशुध्द होती. तिला फक्त दोन आकृत्या आपल्याला उचलून नेत असल्याचे दिसले होते.
आज चार दिवसांनी ती शुध्दीवर आली. तिच्या समोर दोन तेजस्वी स्त्रिया बसल्या होत्या.
त्यातील एक स्त्री शांतपणे म्हणाली," बाळा,इथे तू सुरक्षित आहेस. तुला आता स्वतः ला समर्थ बनवायचे आहे. एवढे समर्थ की आपल्या अंगावर चालून आलेल्या लांडग्याचे धड उडवता यायला हवे."
तिला आज खूप दिवसांनी शांत वाटत होते. बाहेरील भव्य इमारतीवर पाटी झळकत होती. सुगंधा आधार केंद्र आणि शांतपणे केशर आणि शकुंतला त्या मुलीला समजावून सांगत होत्या. समर्थ व्हायचा वसा वाटत होत्या.
इरावती आणि डॉक्टर पद्मनाभ गाडीत बसले. सोबत नयना आणि गाडी चालक महादेव होतेच.
" नयना,तू पुढे बस." इरावती हसून म्हणाली.
" कशाला? डॉक्टर बसतील पुढे." नयना रागावली.
" अग आजतरी महादेवाला पार्वती शेजारी बसून प्रवास करू दे." इरा हसली.
" तुम्हाला डॉक्टसाहेब शेजारी पाहिजे तर सांगा की तसे." नयना हसली आणि पुढे बसली.
साजगावच्या दिशेने गाडी वेगाने निघाली. प्रवास संपला आणि दुरूनच मंदिर दिसू लागले आणि शेजारीच होती सौदामिनी गुरुकुल संगीत विद्यालयाची इमारत. इरावती देवीचे दर्शन घेऊन बाहेर आली. शालिनीताई तिची वाटच बघत होत्या.
" इरा,तुम्ही हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला ते फार छान झाले." सौदामिनी म्हणाली.
" मावशी,ते जावई आतुर झाला ना सासुरवाडीत रहायला." इरावती हसून म्हणाली.
" होय का? आपण मी निवृत्त झाले की आईकडे राहू असे रोज बसता उठता कोण बर म्हणायचे?"
डॉक्टर पद्मनाभ तिला चिडवत होते.
"इरावती,आज संध्याकाळी हॉस्पिलचे उद्घाटन करायचे आहे." शालिनीताई म्हणाल्या.
" हो,पण आधी माझे काम." इरा गूढ हसून म्हणाली.
सारेजण गाडीत बसले. गाडी इनामदार महालाच्या दिशेने धावू लागली. महाल आता डागडुजी करून भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात दिलेला होता. परंतु दक्षिणेकडे असलेला कोपरा मात्र इनामदार घराण्याच्या ताब्यात होता. शांत काळया कातळात बांधलेली समाधी आणि त्यात असलेली एका योगिनिची
मूर्ती पाहूनच मन शांत होत होते.
मूर्ती पाहूनच मन शांत होत होते.
इरावती चालत समाधीजवळ गेली. तिने आपल्या पर्स मधून एक वेष्टन बाहेर काढले. शांतपणे कागद बाजूला केला.
" आजवर फक्त प्रबंध लिहिणारी किंवा संशोधन आणि लोककथा यासाठी पुरस्कार घेणारी माझी लेखणी पहिल्यांदा एक कथा लिहीत आहे. तुझी,माझी प्रेम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची. ह्या कथेची पहिली प्रत तूझ्या चरणी ठेवायला आणली आहे. आशीर्वाद असू देत."
पुस्तक तिने सुगंधाच्या पायाजवळ ठेवले. काळया रंगाच्या छटा आणि त्यावर पांढरा रंग धारण केलेले नाव होते शापित अप्सरा.
आज इराला खूप शांत वाटत होते. इरा प्रत ठेवून आनंदाने बाहेर पडली. शापित अप्सरा आता खऱ्या अर्थाने मुक्त झाली होती.
वाचकांनी कथेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार. सदर कथा संपूर्ण काल्पनिक आणि मनोरंजन ह्या हेतूने लिहिली आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
©® प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा