चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलद कथालेखन स्पर्धा (संघ - कामिनी)
जलद कथालेखन स्पर्धा (संघ - कामिनी)
शापित बंगला भाग -४ अंतिम
गाडी गावाच्या रस्त्यावर वेगाने धावत होती; पण श्वेताच्या मनात खिडकीत दिसलेले दोन सावल्यांचे चेहरेच दिसत होते.
गाडी गावाच्या रस्त्यावर वेगाने धावत होती; पण श्वेताच्या मनात खिडकीत दिसलेले दोन सावल्यांचे चेहरेच दिसत होते.
"राहुल, आपण हे घर कायमचं सोडलं पाहिजे. परत तिकडे जायला नको."
राहुल काहीच न बोलता गाडी चालवत होता; पण त्याच्या डोक्यात ते डायरीमध्ये लिहलेले शब्द घुमत होते -
'या घरातून निघून जा...'
'या घरातून निघून जा...'
राहुल विचार करत होता की 'त्या घरात मृत्यू झालेल्या लोकांना अजून मुक्ती का नसेल मिळाली? काहीतरी मोठे कारण असावे यामागे?'
सकाळी ते गावातल्या एका धर्मशाळेत थांबले. तिथेच त्यांची भेट परत शिंदे काकांशी झाली.
"तुम्ही एकदम बरोबर केलं. ते घर माणसांसाठी नाहीच."
"पण काका, तिकडे नक्की काय झालं होतं? मला तर दुसरीच काही गोष्ट वाटतीये." राहुल म्हणाला.
शिंदे काका काही वेळ शांत राहिले. मग त्यांनी सांगितलं,
"वीस वर्षांपूर्वी जेव्हा ते दांपत्य राहत होतं, तेव्हा तो माणूस खूप संशयी होता. त्याला वाटायचं की बायको आपला विश्वासघात करतेय. एका रात्री त्याने तिला गळा दाबून मारले आणि हे सगळं त्यांच्या मुलाने बघितलं. तो पळत दाराकडे गेला आणि ओरडायला लागला - 'माझ्या आईला मारलं... माझ्या आईला मारलं...' तो माणूस त्याला समजवायला गेला; पण तो मुलगा काही ऐकत नव्हता. तो म्हणत होता की मी आता हे बाहेर जाऊन सांगणार आहे. त्या माणसाला काही सुचलं नाही. त्याने फुलदाणी घेतली आणि मुलाच्या डोक्यात मारली. मुलगा तिकडेच मेला. हॉलमध्ये रक्तच रक्त झालं. त्याला काही सुचत नव्हतं. तो रडत बसला; पण तिकडे हे बघणारं कुणीच नव्हतं. सकाळी शेजाऱ्यांनी बघितलं तर तो स्वतः पंख्याला लटकलेला होता. तेव्हापासून त्या आत्म्यांना शांती मिळाली नाही. ते अजूनही तिथेच अडकलेत."

राहुलला मात्र यातून समाधान मिळाले नव्हते.
ते तिकडून शहराकडे जायला निघाले. श्वेता तर अजूनही थरथरत होती. गाडीच्या सीटला घट्ट धरून बसली होती. राहुलच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळ, भीती आणि संताप यांचे विचित्र मिश्रण होते. तो आरशात पाहत होता. अचानक काच धूसर दिसायला लागली आणि त्या धुक्यात दोन सावल्या उमटल्या... एक मोठी, एक लहान.
श्वेताने ते पाहिले आणि ती किंचाळली,
"राहुल... ते पुन्हा आलेत!"
राहुलने गाडी थांबवली. काही क्षण शांत बसला आणि म्हणाला, "श्वेता हे आत्मे आपल्याला घाबरवत नाहीयेत. ते काहीतरी सांगत आहेत. सत्य समजून घेतलं नाही तर आपण कुठेही गेलो तरी ते सोडणार नाहीत."

"तू वेडा झाला आहेस का राहुल? आपण परत तिथे गेलो तर... आपलं काय होईल?"
"भीतीला पळवून नाही हरवता येत. सामोरं जाऊनच उत्तर मिळतं." एवढं बोलून राहुलने गाडी वळवली.
काही वेळात ते परत घरी पोहचले होते. घर अजून भीषण दिसत होते.
"चल... एकदाचं सगळं संपवू." राहुल म्हणाला.
"चल... एकदाचं सगळं संपवू." राहुल म्हणाला.
दरवाजा चरचरला आणि आपोआप उघडला. आत पाऊल टाकताच कुबट वासाने नाक भरून गेले.
दोघे आत आले तर हॉल काळोखात बुडालेला होता. विजेच्या उजेडात भिंतीवर सावल्या हलताना दिसत होत्या.
अचानक दरवाजा आपटून बंद झाला.
दोघे आत आले तर हॉल काळोखात बुडालेला होता. विजेच्या उजेडात भिंतीवर सावल्या हलताना दिसत होत्या.
अचानक दरवाजा आपटून बंद झाला.
"जा... निघून जा..." तोच करकरता आवाज पुन्हा घुमला.
राहुल ओरडला,
"नाही! आम्ही निघणार नाही. आधी खरं काय आहे ते सांग!"
"नाही! आम्ही निघणार नाही. आधी खरं काय आहे ते सांग!"
भिंतीवर सावल्या उमटल्या, बाई आणि लहान मूल! त्यांचे चेहरे धूसर; पण डोळ्यात वेदना होत्या.
वरून आवाज येत होता. ते पळत वर गेले. एका खोलीत दरवाज्याला कुलूप होतं; पण आतून करकरणारे आवाज येत होते.
राहुलने पायाने लाथ मारली तसा दरवाजा फुटून उघडला.
राहुलने पायाने लाथ मारली तसा दरवाजा फुटून उघडला.
तिकडे परत त्या सावल्या दिसल्या. विजेच्या प्रकाशात त्यांनी पाहिली छतावरून झोके घेतलेली दोरी आणि त्यावर लटकणाऱ्या माणसाची आकृती. डोळे लालसर, चेहरा भयानक...
श्वेताने किंकाळी फोडली.
खिडकीत ती बाई आणि मूल उभे होते.
राहुल ओरडला, "तुम्हाला काय हवंय? आम्ही इथले नाही. मग आमच्यामागे का?"
खिडकीत ती बाई आणि मूल उभे होते.
राहुल ओरडला, "तुम्हाला काय हवंय? आम्ही इथले नाही. मग आमच्यामागे का?"
तसा एक आवाज आला, "जोपर्यंत हे घर आहे, आम्ही मुक्त होणार नाही. आम्ही कैद आहोत."
अचानक एक पान उडून आले. पानावर लाल अक्षरांनी लिहिले होते -- 'आम्हाला मुक्त करा, हे घर जाळा.'
राहुलने श्वेताकडे पाहिले.
"हे घर जाळल्याशिवाय त्यांना शांती मिळणार नाही."
श्वेता रडतच म्हणाली, " राहुल आपण चुकीचं केलं तर?"
"यापेक्षा वाईट काय होईल? ते आपल्याला कधीच सुखाने जगू देणार नाहीत."
दोघे खाली धावले. किचनमध्ये ठेवलेले केरोसीन आणले. राहुलने ते सगळीकडे पसरवले.
"ही शेवटची वेळ आहे. त्यांच्यासाठीही... आपल्या सुरक्षिततेसाठीही..."
दोघे खाली धावले. किचनमध्ये ठेवलेले केरोसीन आणले. राहुलने ते सगळीकडे पसरवले.
"ही शेवटची वेळ आहे. त्यांच्यासाठीही... आपल्या सुरक्षिततेसाठीही..."
त्याने माचिस पेटवली.
पहिल्या ठिणगीनेच घराने आग पकडली. लाकूड चरचरले, भिंतीवर ज्वाला पसरल्या. खिडक्यांच्या काचा फुटल्या.
तेव्हाच त्या ज्वालांमध्ये तीन आकृती उभ्या राहिल्या - पुरुष, बाई आणि मूल. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग नाहीसा झाला होता.
त्यांनी हळूहळू वर पाहिले आणि आगीच्या उजेडात विरून गेले.
त्यांनी हळूहळू वर पाहिले आणि आगीच्या उजेडात विरून गेले.
इकडे राहुल आणि श्वेता दोघे बाहेर उभे राहिले होते. हळूहळू संपूर्ण घर राखेत बदललेले.
"अखेर सगळं संपलं!"
एवढे बोलून दोघांनी एकमेकांकडे बघितले.
एवढे बोलून दोघांनी एकमेकांकडे बघितले.
समाप्त.
©® निकिता पाठक जोग
©® निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा