चॅम्पियन्स ट्रॉफी-२०२५
जलद कथालेखन स्पर्धा (संघ-कामिनी)
शापित बंगला भाग-२
जलद कथालेखन स्पर्धा (संघ-कामिनी)
शापित बंगला भाग-२
राहुलच्या मनात दरवाज्याजवळ बघितलेले शब्द सतत घोळत होते.
'जा इथून....नाही तर उशीर होईल.'
'जा इथून....नाही तर उशीर होईल.'
तो वर आला तेव्हा श्वेता खिडकीजवळ बसून होती. ती खूप घाबरलेली होती.
"काय झालं?" राहुलने विचारले.
"तुला काहीच वाटत नाही का रे? खरंच कुणीतरी आपल्याला बघतंय?" श्वेता हळूच म्हणाली.
राहुल थोडा थांबला. कदाचित श्वेता आणखी घाबरेल यासाठी राहुलने हॉलमध्ये वाचलेले शब्द श्वेताला न सांगण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेता गॅलरीत कपडे वाळत घालत होती. अचानक एक गंध तिच्या नाकात शिरला. कुजलेल्या फुलांचा, औषध आणि आंबलेले पाणी अशा तीन गोष्टींचा एकत्र वास होता तो. ती नाक दाबून मागे सरकली.
'हा वास कुठून येतोय?' विचार करत तिने इकडे तिकडे बघितले.
झाडे, मोकळे मैदान कुठेही काहीही शंकास्पद तिला दिसले नाही; पण तो गंध अजूनही येत होता.
त्या दुपारी एक वयस्कर माणूस दारावर आला.
"मी शिंदे, शेजारी राहतो. नवीन राहायला आलात म्हणे?"
राहुलने हसून त्यांचे स्वागत केले.
"हो! तुम्ही कधीपासून इकडे राहता?"
"तीस वर्षं होतील." शिंदे म्हणाले.
त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चिंता होती.
त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चिंता होती.
"हे घर इतकी वर्षं रिकामं का होतं?" श्वेताने विचारले.
ते थोडावेळ गप्प राहिले. मग हळूच म्हणाले,
"लोकं म्हणतात, या घरामध्ये काहीतरी आहे. आधी राहायला आलेले लोक दोन वर्षांत निघून गेले. रात्रीचा आवाज, सावल्या,.. कुणालाच शांती नाही मिळाली."
"लोकं म्हणतात, या घरामध्ये काहीतरी आहे. आधी राहायला आलेले लोक दोन वर्षांत निघून गेले. रात्रीचा आवाज, सावल्या,.. कुणालाच शांती नाही मिळाली."
राहुलने विषय बदलला; पण त्यांचे शब्द त्याच्या मनात राहिले.
एके रात्री पावसाचे थेंब पडत होते. विजा चमकत होत्या. श्वेता झोपेतून उठली कारण तिला पाणी गळण्याचा आवाज आला. ती टॉर्च घेऊन हॉलमध्ये आली तर छतावरून पाणी गळत होते; पण जेव्हा तिने तिथे टॉर्च मारून बघितले तर ते पाणी नव्हते तर लालभडक रक्त होते.
ती भीतीने थरथरली. तेवढ्यात दार जोरात आपटल्याचा आवाज आला. ती जोरात ओरडली. तिच्या ओरडण्याने राहुल धावतच आला.
"काय झालं?"
"बघ छतावरून.... रक्त पडतंय."
राहुलने टॉर्च मारला; पण तिथे साधे पाणी होते. लालसर रंगाचे काहीच नव्हते.
"तुला भास होत असेल." राहुल म्हणाला.
पण श्वेताला अजूनही घरामध्ये दुर्गंध येत होता. रक्त स्पष्ट दिसत होते.
दुसऱ्या दिवशी कामवाली शांता काकूंच्या नातवाने फोन केला.
"आजी खूप आजारी आहे. ती सतत बडबडते आहे की, त्या घरातून बाहेर काढा त्यांना. नाही तर त्यांचा नाश होईल."
यामुळे श्वेता खूपच घाबरली होती.
रात्री श्वेता कपडे घडी घालत असताना आरशात तिला काही तरी हलले असे वाटले. तिने आरशात डोकावले तर तिच्यामागे एक उभा पांढरट चेहरा दिसला. ती घाबरून वळली; पण मागे कोणीच नव्हते. पुन्हा आरशात पाहिल्यावर तो चेहरा नाहीसा झाला होता.
तिने राहुलला सांगितले; पण तो अजूनही खात्रीने म्हणाला,
"तुला खूप ताण आहे. आपण थोडे दिवस गावाला जाऊ. तुझे मन बदलले की परत येऊ."
"तुला खूप ताण आहे. आपण थोडे दिवस गावाला जाऊ. तुझे मन बदलले की परत येऊ."
एका रात्री खूप पाऊस पडत होता. मध्यरात्री राहुलला आवाज आला की अंगणात कुणीतरी चालतंय. तो खिडकीतून पाहू लागला. पावसात भिजलेल्या चिखलात पावलांचे ठसे उमटत होते. मोठे मोठे ठसे होते; पण कोणी दिसत नव्हते. राहुल घाबरला. आता त्याला खात्री पटली होती की काहीतरी वेगळे नक्की आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी दारात कागदाचा एक तुकडा दिसला. त्यावर अस्पष्ट अक्षरात लिहिले होते,
'ते अजून गेले नाहीत... ते अजूनही जिवंत आहेत.'
दोघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत भीतीपेक्षा जास्त प्रश्न होते -
'हे कोण आहेत?', 'ह्या घरात कुठली वाईट शक्ती आहे?' आणि 'त्यांना असा इशारा का दिला जातोय?'
'हे कोण आहेत?', 'ह्या घरात कुठली वाईट शक्ती आहे?' आणि 'त्यांना असा इशारा का दिला जातोय?'
क्रमशः
©®निकिता पाठक जोग
©®निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा