ध्रुवशीलचे मनमोहक जंगल त्याच्या आद्वितीय निसर्गासाठी प्रसिद्ध होते आणि आम्ही पाच जण तो निसर्गच अनुभवायला ध्रुवशीलच्या घाटीवर गेलो होतो पण मला काय माहित होत ध्रुवशील ची ती ट्रिप आमच्या पाच जणांसाठी शेवटची ट्रिप ठरेलं
हॅलो मी ध्रुवी पेश्याने आर्कियॉलॉजिस्ट. खर तर हा पेशा ही मला ओघानेच मिळाला. आणि ते म्हणतात न. “प्रत्येक गोष्ट ही आधीच ठरलेली असते.” अगदी तसच माझ्याही बाबतीत घडलं नाही तर शब्दांशी खेळणारी मी पुरातत्व खात्याकडे कशी वळली असते.
असो मुद्दा तो नाहीच आहे. तर मुद्दा आमची ती भयानक ट्रिप आहे. कुठून आम्ही घाटीला जाण्याचा विचार केला आणि होत्याच नव्हत होऊन बसलं.
पण नेमक अस काय घडलं होत? त्या घाटीच अस काय रहस्य आहे? जाणून घेवूत माझ्या आयुष्याबद्दल आणि या कथे बद्दल माझ्याकडूनच
“शापित नागमणी”
तर आधी मी सगळ्यांना आमची ओळख करून देते.
मी ध्रुवी विलास जगताप घरातलं शेंडेफळ माझ्या आयुष्यात माझ एक ध्येय आहे ते सर्वांना हळू हळू समजेल. आणि माझ्या घरात मी धरून आम्ही पाच जण मी आई बाबा आणि दोन भाऊ सुजल आणि रुद्रांश.
खर तर मी एक कवी मनाची स्वछंदी मुलगी आहे पण मला लहानपणापासून एक स्वप्न पडत आलय आणि त्याचाच मागोवा घेण्यासाठी मी कवी बरोबर आर्कियॉलॉजिस्ट ची देखील डिग्री घेतली आणि स्वपाकडे एक पाऊल पुढे टाकलं असो.
आमच्या पाच जणांच्या ग्रुप मधली दुसरी व्यक्ती म्हणजे माझी सगळ्यात जवळची मैत्रीण तिला तुम्ही माझी लाईफलाईन म्हणू शकता कारण ती माझी अशी मैत्रीण आहे जिची मला प्रत्येक छोट्या मोठ्या सिच्युएशन मध्ये गरज पडते ती म्हणजे संयुक्ता.
संयुक्ता एक सोलो ट्रॅव्हलर आहे खरी आणि तिच्या याच आवडीमुळे ती आमच्या ग्रुपशी जोडली गेली तिला फिरण्याची खूप आवड अगदी लहानपणापासूनच म्हणूनच मी तिची सर्वांशी ओळख करून दिली आणि ती पुढे आमच्या ग्रुपची सदस्य बनली.
संयुक्ताचे आई बाबा माझ्या आई बाबांचे खास फ्रेंड्स तिच्या घरी ते फक्त तिघच ती आणि तिचे आई बाबा. संयुक्ता लहानपणापासूनच लाडा कोडात वाढलेली मुलगी तिच्या आई बाबांसाठी नेहमीच ती म्हणेल ती पुर्व दिशा म्हणूनच की काय संयुक्ता ने एकदा सांगितलं मला इंटिरियर डिझाईन करायचं आहे तोच तिच्या बाबांनी टॉप कॉलेजमध्ये तीच ऍडमिशन करून दिल. आणि आता ती स्वतः ची फर्म चालवते.
आमच्या ग्रुपमधला तिसरा सदस्य म्हणजे ग्रुपचा जोकर अथर्व. मी ‘जोकर’ या करता म्हणाले कारण आम्ही कितीही टेन्शन मध्ये असो हा आमच्या चेहऱ्यावर एका क्षणात हसू आणेल असा हा आमचा जिवलग मित्र अथर्व.
पण ते म्हणतात न. “प्रत्येक हसू हे खर असतच अस नाही” अथर्व आमच्या चेहऱ्यावर तर हसू आणतो पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे मात्र आधीच त्याच्या पासून कुणी तरी हिरावून घेतलं होत.
अथर्वच्या कुटुंबात अथर्व त्याची मोठी बहीण स्पृहा आणि एक लहान भाऊ आदित्य बस एवढच त्याच कुटुंब अथर्वचा आपल्या कुटुंबावर खूप जीव म्हणून अथर्व आपली ताई आणि लहान भावासाठी प्रत्येक गोष्ट करतो त्याने आदित्यसाठी आपल्या स्वप्नांना विसरून एक छोटीशी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच शिक्षण पूर्ण केल व स्वतः ही बी. ए. कम्प्लिट केल.
आता नंबर आमच्या चौथ्या मित्राचा तो म्हणजे विक्रम.
विक्रम एक श्रीमंत कुटुंबात वाढलेला घरात सगळ्यांचा लाडका मुलगा त्याचा बाकी एकच छंद बाईकवर दररोज मुलींना फिरवण. कधीही बघा त्याच्या मागे एक तरी मुलगी दिसणारच असा तो अवलिया कधी कधी आम्ही विचारातच पडतो याला मुली मिळतात कुठून.
विक्रम एक श्रीमंत कुटुंबात वाढलेला घरात सगळ्यांचा लाडका मुलगा त्याचा बाकी एकच छंद बाईकवर दररोज मुलींना फिरवण. कधीही बघा त्याच्या मागे एक तरी मुलगी दिसणारच असा तो अवलिया कधी कधी आम्ही विचारातच पडतो याला मुली मिळतात कुठून.
विक्रम च्या घरी देखील तो स्वतः त्याचे दोन मोठे भाऊ दोन वाहिनी आणि आई बाबा अस त्याच कुटुंब. आणि हा सगळ्यात लहान माझ्यासारखंच शेंडेफळ.
आणि विवेक आमच्या ग्रुपचा सगळ्यात शांत आणि कमालीचा सिरीयस टाईप मुलगा त्याच्याशी बोलायला गेलं तर कुणाला ही प्रश्नच पडेल याच्याशी बोलाव कस. असो तर याच्या घरी देखील हा ‘एकटा जीव सदाशिव’ म्हणजे एकुलता एक याच्या कुटुंबात तो आणि त्याचे आई बाबा एवढेच बस.
तर हा माझा ग्रुप आणि आमच्या आयुष्यात अस काही घडलय ज्याचा कुणी विचार ही करू शकणार नाही. ते काय बघूत या कथेत.
शांती विलास…
वेळ सकाळची 7 वाजताची…
ॐ सुर्याय नमः
“शीट आज खूपच लेट झालाय उठायला किती काम राहिली आहेत माझी आम्हाला ट्रिपला जायच आहे आणि मी अजून घरीच आता सगळे येऊन उभे राहतील दारात.” ध्रुवी आपलं पटा पट आवरत म्हणाली
आणि रूमच्या बाहेर आली.
काही क्षणा नंतर…
“आई चल ग नाश्ता दे लवकर मला बाहेर फ्रेंड्स येऊन उभे राहतील आवर लवकर.” डायनिंग टेबलवर बसत ध्रुवी म्हणाली.
“हो, बाई घे आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे मी खा आणि पळ.” हातात डिश आणत शैलजा म्हणाली
तोच ध्रुवीने डिश हातात घेतली आणि दोघीनी नाश्ता केला.
काही वेळा नंतर…
ध्रुवी तयार होऊन बसलीच होती इतक्यात विक्रम ची कार ध्रुवीला घ्यायला आली आणि सगळे ध्रुवशीलच्या घाटीकडे रवाना झाले.
क्रमशः…
तर आता ध्रुवीचा ग्रुप ध्रुवशील च्या घाटीकडे रवाना झाले आता पुढे काय होणार बघुत पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा