शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप
भाग २
भाग २
शरद थांबला. पण समोर अनोळखी मुलीला पाहून त्याला वाटलं की मागून तिच्या ओळखीचा कोणीतरी येत असेल, म्हणून त्याने मागे वळून पाहीलं. कोणीच नव्हतं.
“मला काही म्हणालात?” – शरद.
“हो तुम्हालाच थांबा म्हणाले.” – क्षिप्रा.
ही मुलगी ओळख पाळख नसतांना आपल्याला का थांबवते आहे हे शरदला समजेना. तिच्या जवळ छत्री होती आणि बसस्टॉप पण समोरच होता. तो गोंधळला. त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून क्षिप्रा म्हणाली,
“मला ओळखलं नाही का?” – क्षिप्रा.
“ओळख? आपण यापूर्वी कधी भेटलो आहोत का?” – शरद.
“अहो मागच्याच आठवड्यात आपली भेट झाली नाही का? एवढ्यात विसरलात?” – क्षिप्रा.
शरदने मेंदूला खूप ताण दिला पण त्याला या मुलीशी भेट झाल्याचं काही आठवत नव्हतं. इतक्या सुंदर आणि आकर्षक मुलीशी आपली भेट झाली आणि आपल्याला ती आठवणार नाही असं कसं होईल? काही तरी घोळ आहे. तो म्हणाला,
“हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आपण भेटल्याचं मला तरी आठवत नाही. कोणी तरी दुसराच असेल.” -शरद.
“मागच्या आठवड्यात बुधवारी रात्री साडे नऊ वाजता तुम्हीच माझ्यासाठी इथे बसस्टॉप वर थांबला होता. आता आठवलं?” – क्षिप्रा.
“माय गॉड, त्या तुम्ही होत्या? नवलच आहे.” – शरद.
“नवल काय त्यात? मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. पण तुम्ही कोण, कुठे काम करता काहीच माहीत नव्हतं. आज अचानक दिसला. खरंच त्या दिवशी मी खूपच तुसडे पणाने वागले. त्याबद्दल सॉरी.” – क्षिप्रा.
“अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ. माणूस परिस्थिती नुसार वागतो. तुम्ही कणखर पणा दाखवला हे मला आवडलं. त्या परिस्थितीत तुम्ही जे वागलात तेच योग्य होतं.” – शरद.
“तुम्ही समजून घेतलं हे ऐकून फार बरं वाटलं. मनावरच एक ओझं उतरलं. थॅंक्स.” क्षीप्रा.
“मी त्या दिवशी एक ऑफर दिली होती, ती अजून कायम आहे.” – शरद.
“ऑं, कोणची ऑफर? आपली नुसती वादावादीच झाली त्या दिवशी.” – क्षिप्रा.
“नाही मी शांतच होतो, मनातून तुमचं कौतुकच करत होतो. चिडल्या तुम्ही होत्या.” – शरद.
क्षिप्रा थोडावेळ त्या प्रसंगाची उजळणी करत होती. मग म्हणाली,
“ओके. काय ऑफर दिली होती?” – क्षिप्रा.
“तुम्हाला कुठे सोडू का? ही ऑफर होती.” – शरद असं म्हणाला पण मग घाबरला की त्याने पहिल्याच भेटीत जास्तच लिबर्टी तर नाही घेतली? खरं तर तिला पाहिल्यावरच खोल कुठे तरी क्लिक झालं. तिचा सहवास हवा हवासा वाटू लागला होता. आणि अनावधानाने तो ऑफर बद्दल बोलून गेला.
“तुमच्या बरोबर बाइक वरुन? पाऊस किती पडतो आहे बघितलं का? बाइक वर मी भिजणार नाही का?” – क्षिप्रा.
शरद हिरमुसला झाला. एक चान्स वाया गेला. पावसाला सुद्धा आत्ताच पडायचं होतं.
“हां हे माझ्या लक्षातच आलं नाही. ओके तुम्ही बसने जाणंच बरोबर आहे. ओके देन बाय.” आणि त्याने बाइक चालू केली. – शरद.
“एक मिनिट, तुम्ही रेन कोट वापरत नाही का? पार भिजून गेला आहात. बायको चीड चीड करणार घरी गेल्यावर.” – क्षिप्रा.
“ती असती तर नक्कीच चिडली असती. पण आता ती या जगात नाहीये. त्यामुळे त्या आघाडीवर शांतता आहे.” – शरद.
क्षिप्राचा चेहरा ते ऐकून पडला. यावर काय बोलावं तेच तिला सुचेना.
“सॉरी, मला माहीत नव्हतं.” - क्षिप्रा.
“नेवर माइंड. इट इज ओके. तो आता भूतकाळ आहे. पण आता वर्तमानात पावसाचा जोर वाढतो आहे, तुम्ही लवकर बसस्टॉप वर जा, नाहीतर भिजाल. बाय.” – शरद.
“तुम्हाला भिजायला आवडतं?” – क्षिप्रा.
“हो आवडतं मला, पण त्याचं काय? तुम्ही का भिजत उभ्या राहिल्या आहात?” – शरद
“मी जर म्हंटलं की तुमची ऑफर मी स्वीकारली आहे तर?” – क्षिप्रा.
शरदची विकेटच पडली. तरी तो म्हणाला,
“अहो पण पाऊस वाढतो आहे. तुम्ही भिजाल. घरी ओरडा खावा लागेल.” – शरद.
“आईची माया असते ती. ती बोलणारच. तुम्ही नका टेंशन घेऊ.” – क्षिप्रा.
“ठीक आहे बसा.” – शरद.
“मी छत्री घेऊनच बाइक वर बसते, मग तुम्ही पण भिजणार नाही.” – क्षिप्रा.
शरदच्या मनात चांदणे. हुरळूनच गेला तो. क्षिप्रा गाडीच्या मागच्या सीट वर बसली. छत्री होतीच. तिने दोघांच्याही डोक्यावर येईल अशी धरली. त्यामुळे तिला शरदला चिकटून बसावं लागलं. शरद खुश.
“गाडी हळू चालवा. छत्री उडून जाईल, आणि छत्री बरोबर वाऱ्याने मी पण पडेन” – क्षिप्रा.
थोडं दूर गेल्यावर वाऱ्याचा आणि पावसाचा जोर खूपच वाढला. क्षिप्राला छत्री सांभाळणं कठीण झालं होतं.
“अहो छत्री उडते आहे. कुठे थांबता येईल का?” – क्षिप्रा.
शरदला क्षिप्रा काय बोलते आहे ते नीट ऐकू गेलं नाही तो थांबला. क्षिप्रा पुन्हा तेच म्हणाली. “थोडं समोर गेल्यावर एक हॉटेल आहे तिथे थांबू शकतो.” शरद म्हणाला. क्षिप्राने मान डोलावली.
क्रमश:---
दिलीप भिडे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा