शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप
भाग ३
भाग ३
हॉटेल मधे गेल्यावर,
“काय घेणार, चहा की कॉफी? की सॉफ्ट ड्रिंक?” – शरद.
“या पावसात सॉफ्ट ड्रिंक? नको कॉफीच बरी.” – क्षिप्रा.
“मस्त पाऊस पडतो आहे. काही खायला पण मागवायचं का?” – शरद.
“माझी आई जाम वैतागते बाबांवर.” – क्षिप्रा.
“का बुवा?” – शरद.
“सतत फोकस आपला खाण्यावरच.” – क्षिप्रा.
शरदला प्रकर्षाने जाणवलं की संभाषणाची गाडी भलत्याच ट्रॅक वर चालली आहे, ती बदलण्याची आवश्यकता होती. पण बाबांचा विषय निघाल्याने एक गोष्ट पक्की झाली होती, ती म्हणजे लग्न झालेलं नाहीये. तो म्हणाला,
“ते सोडा, आपण इतका वेळ नुसतंच बोलतो आहोत. माझं नाव शरद गुप्ते.” – शरद.
“मी क्षिप्रा देशपांडे.” – क्षिप्रा देशपांडे.
कॉफी आली. कॉफी पिता पिता बरंच अवांतर गप्पा गोष्टी झाल्या. पाऊस पण थांबला होता. शहरात शिरल्यावर एका ठिकाणी क्षिप्रा म्हणाली की,
“मी इथे उतरते. इथून मी जाईन.” – क्षिप्रा.
“ओके.” शरदने बाइक थांबवली. बाय करून शरद निघाला. तरंगतच घरी आला. पण हळू हळू त्याचे विचार बदलत गेले. त्याचं मन म्हणालं की त्याचं एक लग्न झालेलं आहे. ती मुलगी मोकळेपणी बोलली यांचा अर्थ तिला सामाजिक जाणिवेचं भान आहे. तू उगाच भलते विचार मनात आणू नकोस. एक साधी ओळख हीच वस्तुस्थिती आहे. ती तशीच ठेव. मग शरदने तिचा विचार मनातून झटकून टाकला. असेच चार दिवस गेले, कितीही म्हंटलं तरी ऑफिस मधून घरी येतांना बसस्टॉप वर त्याचं लक्ष जायचंच. पण ती दिसली नाही.
नंतरच्या एका रविवारी, नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे चांगला दोन तीन कप चहाची किटली आणि ब्रेड बटर घेऊन, आलेली तीन चार पेपर घेऊन, गॅलरी मधे बसला. जेमतेम दहाच मिनिटं झाली असतील, अजून पहिलाच चहाचा कप संपायचा होता, तो बेल वाजली. शरदची अजून कोणाशी इतकी घसट झाली नव्हती, त्यामुळे त्याला जरा आश्चर्यच वाटलं. कोण असेल असा विचार करताच त्याने दार उघडलं. समोर क्षिप्रा उभी होती. एकदम फ्रेश. फुला सारखी टवटवीत. हसऱ्या मुद्रेने ती शरद कडे पहात होती.
“तूम्ही?” शरद जवळ जवळ ओरडलाच. “तूम्ही इथे? माझ्या घरी?”
“आत येऊ द्याल की बाहेरच बोलायचं आहे?” – क्षिप्रा.
“ओह सॉरी सॉरी. या आत या.” – शरद.
क्षिप्रा आत आली चहूकडे नजर फिरवून निरीक्षण करत होती. भिंतीवर चित्राचा म्हणजे शरदच्या बायकोचा हार घातलेला फोटो होता.
“हा फोटो तुमच्या बायकोचा का?” – क्षिप्रा. शरदने मान डोलावली.
“किती सुंदर होत्या, त्यांच्यावर ही वेळ यावी याचं वाईट वाटतं. काय झालं होतं?” – क्षिप्रा.
“मी ऑफिस मधे होतो, ती मैत्रिणी बरोबर शॉपिंगला जाणार होती. एका भरधाव जाणाऱ्या कारने तिला सिग्नलवर रस्ता क्रॉस करतांना उडवलं. तातडीने हॉस्पिटल मधे पोचवलं, पण दोन तासात संपल सगळं.” शरद आता भाऊक झाला होता.
“मग त्या कार वाल्याला पकडलं का? त्याला शिक्षा झाली का?” – क्षिप्रा.
“त्यांची चूक नव्हती. दुसऱ्या बाजूने रहदारी चालू होती त्याच बाजूने तो जात होता, पण स्टीयरिंग व्हीलच तुटलं आणि तो काहीच करू शकला नाही. आणि त्याचा दोष नव्हता म्हणून मी पण काही केलं नाही.” – शरद.
वातावरण कारण नसतांनाच गंभीर झालं होतं. दोघांनाही समाजात नव्हतं की काय बोलावं ते.
“बरं ते जाऊ द्या, तुम्ही इथे कश्या काय? माझा पत्ता कोणी दिला?” - शरद
“तुम्ही गॅलरीत बसला होता न? चला तिकडे मग सांगते.” – क्षिप्रा.
गॅलरीत आल्यावर,
“ती समोरची बिल्डिंग दिसते न त्यांच्या पाचव्या मजल्यावर मी राहते. ती समोर पाचव्या मजल्यांची गॅलरी दिसते आहे ती आमचीच. तुम्ही नेहमीच रविवारी इथे बसून चहा पित पित पेपर वाचता, आम्हाला दिसायचं. आपली ओळख नव्हती म्हणून फार लक्ष नव्हतं. पण आज बघितलं तर तुम्हीच दिसला.” – क्षिप्रा.
“असं झालं तर. म्हणून तुम्ही आलात. ओके. चहा घेणार? मी छान चहा करतो.” – शरद.
शरदने किचन मधे जाऊन चहाचा मग आणला, आणि तिला चहा दिला. “हे ब्रेडबटर चे स्लाइस आहेत हे पण घ्या.”
थोडावेळ अवांतर गप्पा चालू असतांनाच तिच्या आईचा फोन आला.
“आईचा फोन आहे जेवणाची वेळ झाली आहे. मी निघते. बाय सी यू.” – असं म्हणून क्षिप्रा निघाली.
क्रमश:---
दिलीप भिडे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा