शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप
भाग ४
शरदने क्षिप्राला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोळ्यांसमोरून तिची मूर्ती काही हलत नव्हती. ती आल्यानंतर काय काय बोलणं झालं ते आठवत होतं. रात्री बऱ्याच उशिरा त्याला झोप लागली. चार पांच दिवस तसेच गेले. रोज संध्याकाळी त्याने बसस्टॉप च्या जवळ उभा राहून तिची थोडा वेळ वाट पाहीली. काही उपयोग झाला नाही. ती रविवारी येईल असं त्याला उगीचच वाटलं. पण ती नाही आली. त्याने गॅलरीतुन मान उंच करून बघितलं, पण काही हालचाल दिसली नाही. शेवटी त्याने तिचा विचार डोक्यातून काढून टाकला.
पण नंतर एक दिवस संध्याकाळी बसस्टॉप जवळ ती अचानक दिसली. तिला पाहून त्याने ब्रेक दाबला, पण तिथे रस्ता थोडा उखडला होता आणि पालिकेने त्यावर बारीक खडी टाकली होती, त्यावरून शरदची गाडी घसरली आणि त्याचा बॅलन्स सुटला. तो पडला आणि बाइक बरोबर खेचल्या जाऊन थोडं दूर पर्यन्त रस्त्याला घासत गेला. हे सगळं क्षिप्राच्या समोरच घडलं. ती धावली. लोकं पण धावली. त्यांनी शरदला उठवलं. पॅन्ट एका पायावर फाटली होती, आणि शर्ट बाही वर फाटला होता. पायाला आणि हाताला चांगलंच खरचटलं होतं आणि थोडं थोडं रक्त वाहत होतं. लोकांनी त्याला चालवत बसस्टॉप वर नेऊन बसवलं. एकाने त्यांची बाइक रस्त्याच्या कडेला लावली.
“अरे बापरे, तुम्हाला तर बरंच लागलं आहे. लगेच डॉक्टर कडे जायला पाहिजे.” – क्षिप्रा.
शरदने पायाची आणि हाताची जखम पाहिली, आणि म्हणाला,
“नाही काही खास नाहीये. थोडं खरचटलं आहे इतकंच. गाडी हळू होती म्हणून जास्त लागलं नाही. तुम्ही काळजी करू नका.” – शरद.
इतक्यात बस आली आणि शरदला फारसं लागलेलं नाही हे बघून, बाकी सर्व लोकं बस मधून निघून गेले. आता बसस्टॉप वर शरद आणि क्षिप्रा दोघंच उरले.
“तुम्ही उगाचच थांबलात. मला फारसं काही लागलं नाहीये, मी जाईन बाइक वरुन.” – शरद
“एवढं लागलेलं असतांना? तुम्ही बाइक चालवत जाणार? नाही नाही, मी रिक्शा बघते. बाइक ठेवा इथेच. उद्या घेऊन जाऊ. आत्ता आपण डॉक्टर कडे जाणार आहोत.” – क्षिप्रा.
“खरंच मला काही जास्त लागलं नाहीये. मी असं करतो थोडा वेळ थांबतो, तुमची बस आली की मग मी जाईन.” – शरद.
“ही काही रात्र नाहीये. लोकं येतीलच आता आणि बस पण येईल. पण तुम्ही बाइक वरुन जाणार का?” – क्षिप्रा.
“हो.” – शरद.
“मग मी पण येते तुमच्या बरोबर. तुम्हाला एकटं सोडणार नाही.” – क्षिप्रा.
“शरद काही बोलणार होता, पण त्याने गप्पच बसायचं ठरवलं. बायका एकदा निर्णय दिल्यावर तो बदलत नाही हे त्याला चांगलाच ठाऊक होतं.
“चला.” तो म्हणाला.
घरी पोचल्यावर क्षिप्रा पण त्यांच्या बरोबर येत होती. त्याला अवघडल्या सारखं झालं.
“मी जाईन एकटा. तुम्ही काळजी करू नका.” शरद म्हणाला. पण क्षिप्राने त्याच्या कडे लक्षच दिलं नाही आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या फ्लॅट वर गेली.
“औषधांचा डबा कुठे आहे? सोफ्रामायसीन लावून बँडेज बांधावं लागेल.” - क्षिप्रा.
“दोन मिनिटं थांबा. मी कपडे बदलून येतो आणि डबा पण घेऊन येतो.” - शरद.
घाई घाईने कपडे बदलून शरद कापूस आणि चुना घेऊन आला.
“हे काय आणलं तुम्ही? चुना?” – क्षिप्राने आश्चर्याने विचारले.
“हो, हा आमचा गावठी उपाय. पण रामबाण. माझ्या आजीने शिकवले.” – शरद.
“काहीतरीच काय, चुना लावल्याने रॅशेस येतील.” – क्षिप्रा.
“नाही. बघा. आता कापसाने जखम साफ करायची आणि चुना खसा खसा जखमेवर चोळायचा. अर्ध्या तासात जखम बरी.” – शरद विजयी मुद्रेने म्हणाला.
“ओके. द्या कापूस मी जखम स्वच्छ करते मग चुना लावते.” – क्षिप्रा.
“तुम्ही कशाला कष्ट घेता, मला लावता येईल.” – शरद.
“कापूस आणि चुना” असं म्हणून क्षिप्राने हात पुढे केला.
शरदनी मुकाट्याने दोन्ही गोष्टी तिच्या हातावर ठेवल्या. मग तिने शरदने जसं सांगितलं तसा खसा खसा चोळून चुना जखमेवर लावला. मग म्हणाली की,
“आता आराम करा. जेवणाची काय व्यवस्था आहे? डबा लावला आहे का?” – क्षिप्रा.
“नाही, आता मी फारसं काही करणार नाही, खिचडी लावीन आणि मोकळा होईन.” – शरद.
क्षिप्रा गॅलरीत गेली आणि आईला फोन लावला. तिला परिस्थितीची कल्पना दिली. मग शरद ला म्हणाली.
“तुम्ही आता त्रास करून घेऊ नका. मी डबा घेऊन येते. तो पर्यन्त टीव्ही बघा.” – क्षिप्रा.
क्षिप्रा गेल्यावर शरद विचार करत होता की ही मुलगी आपल्यासाठी एवढं का करते आहे? मलमपट्टी तर अगदी हक्क असल्या सारखी केली. परत डबा वगैरे पाठवण्याची काहीच जरूर नव्हती. पण कुठे तरी मनामध्ये आनंदच झाला. आता ती डबा घेऊन येईल म्हणजे अजून थोडा वेळ तिच्या बरोबर घालवायला मिळेल. शरद मनोमन खुश झाला.
क्रमश:---
दिलीप भिडे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा