मागील भागात.
कार्यक्रम झाल्यावर सार्थक त्याच्या आई वडील आणि मोठ्या बहिणीसोबत घरात आला होता.
“माझा क्युटी पाय.” सावीने सार्थकला जवळ घेतल.
“आज खुपच प्रेम उतु चालल आहे.” सार्थक “नाही तेव्हा फक्त भांडत असतेस माझ्याशी.” सार्थकने भुवई उंचावली होती.
“कारण आज माझ्या भावाने कामच असं केल आहे.” सावी “मीच काय, ती बघ आई पण तुझ्यावरची आज नजरच उतरवून टाकणार आहे.” सावीने तिच्या आईला हातात काहीतरी घेऊन येताना पाहील होत आणि त्यावरूनच अंदाज बांधला होता.

आता पूढे.
आईने जवळ येऊन सार्थकची डोक्यापासून पायापर्यंत नजर उतरवली.
“काय गं! तु पण ना.” बाबा “अशी थोडीच नजर लागते कोणाला?” बाबा हसतच बोलत होते.
“तुम्हाला नाही माहीत.” आई तिच काम करत बोलत होती. “खाली सगळेच गरजेपेक्षा जास्त कौतुक करत त्याचं. त्या शीतल वहीनी तर बोलत होत्या. मोठा असता तर जावईच करुन घेतल असत.”
आता मात्र सावी आणि बाबांना त्यांच हसु आवरल गेल नव्हतं.
“तुम्ही फक्त हसा.” आईने तोपर्यंत त्याची नजर उतरवून टाकली होती. “आईची माया तुम्हाला नाही कळणार.”
बरोबरच आहे ना. आईची माया कोणाला कधी कळली आहे? मारणार नाही म्हणून जवळ बोलवायचं आणि जवळ आल्यावर मात्र सणसणीत मारायचं. नंतर जेवणही त्याच हाताने प्रेमाने चारायचं.
आता पुर्ण सोसायटीमध्ये सार्थक सोबतच त्याच्या आई वडीलांच कौतुकही सुरु झाल होत. ते मात्र रमणला आता बघवल जात नव्हतं. मग त्यानेही सोसायटीमध्ये सगळ्यांनाच स्वतःच कौतुक सांगायला सुरवात केली होती. सगळ्यांसमोर मला माझ्या आई वडीलांची किती काळजी आहे हे दाखवुन लागला होता. एवढचं काय? तर त्याने त्याच्याही मुलाला जबरदस्ती तबला वादनाचा क्लास लावुन दिलेला होता. त्याच्या मुलाला मात्र चित्रकलेमध्ये आवड होती. त्याला चित्रकलेचा क्लास लावायचा होता. पण रमणने त्याच्या मुलाच काहीच ऐकलेल नव्हतं.
सार्थक आता रोज सकाळी उठुन त्याच्या आईसोबतच देवासमोर दिवा लावायचा. मग आई आणि बाबा दोघांच्या ही पाया पडुनच घराबाहेर पडायचा. फक्त एका भजन-कीर्तनाने त्यात झालेले बदल बघुन दोघांनाही त्याच खूपच आश्चर्य वाटलं होत.
दिवसांनी त्यांचा धावण्याचा वेग पकडला. रमणनेही त्याचा दिखावुपणा दाखवणे वाढवलेलं होतं. आता तो प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणसाला उपदेशाचे डोस पाजायला लागला.. सोसायटीमधली सगळीचं माणसं रमणच्या वागण्याला चांगलेच वैतागले.
काही दिवसानंतर पंढरपुराच्या वारीला सुरवात झाली. आता सार्थकला ही वारीला जायची ओढ लागली होती. त्याने हट्ट केलेला रमणलाही समजला होता. मग त्यानेही वारीला जायची तयारी केली.
सार्थकच्या आई वडीलांना आता सार्थकची काळजी वाटायला लागली. कारण पंढरपुर काही जवळ नव्हतं आणि सार्थकला एवढं लांब चालायची सवय पण नव्हती. त्याच्या मोठ्या आजोबांना जस कळलं तसा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या आनंदातच त्यांनी पण वारीला जायची तयारी केली.
“अरे दादा. तुझा घुडघा तरी बरा आहे का?” सार्थकचे आजोबा चिडुन त्यांच्या मोठ्या भावाला भांडत होते. “चालला सार्थकच्या मागे. तो आणि तु एवढं लांब चालणार आहात का?”
“चालू रे.” मोठे आजोबा “तो पांडुरंग घेऊन जाईल मला. आता तर माझा नातू आहे सोबत. काही नाही होणार.” मोठे आजोबा मोठ्या उत्साहाने त्यांची तयारी करत बोलले. तस आजोबांनी नकारार्थी मान हलवली होती. मग त्यांनी सार्थकच्या वडीलांना फोन लावला होता.
“काय रे?” फोन उचलल्या उचलल्या सार्थकचे आजोबा बोलले. “सार्थक खरचं जाणार आहे वारीला?”
“हो बोलला तर आहे.” सार्थकचे वडील “बघु निघालाच तर त्याच्या मागे गाडी पण ठेवु आपली. अप्पांनी पण तयारी केली आहे ना?” आता सार्थकचे वडील हसत बोलले होते.
“हो ना रे.” सार्थकचे आजोबा “सांगुन पाहील पण नाही ऐकला दादा. म्हणे माझा नातू आहे आता. मग तो पांडुरंगच घेऊन जाईल मला.” आजोबा पण आता हसायला लागले होते.
सगळीच तयारी करुन सार्थक त्याच्या वडीलांसोबत गावाला पोहोचला होता. सावीची परीक्षा असल्याने दोघी मायलेकी घरीच होत्या. असही त्यांची एक गाडी दोघा आजोबा आणि नातुच्या मागेच असल्याने सार्थकच्या आईला एवढी काही चिंता नव्हती.
वारीला उत्साहात सुरवात झाली होती. सगळ्यांच्या कल्पनेपलीकडे सार्थकने सगळी वारी चालत पुर्ण केली. त्याच्यासोबत सार्थकचे मोठे आजोबाही व्यवस्थीत पंढरपूरला पोहोचले होते. मोठे आजोबां बोललेल्या वाक्याची प्रचिती प्रत्येकाला आली. सगळ्यांनीच मनोभावे पांडुरंगाला हात जोडले होते. सार्थकची आई आणि सावी दोघीही वारीच्या शेवटच्या दिवशी गाडीने पंढरपूरला पोहोचले. त्यांनीही पांडुरंगाच दर्शन घेतलं होत.
एवढचं काय? फक्त दिखाव्यासाठी वारीला निघालेल्या रमणलाही त्या पांडुरंगाने पंढरपूरला व्यवस्थित आणलं होत. जेव्हा की त्याला थोड्या अंतरावर जाण्यासाठीही गाडी लागत होती. थोड चाललं की त्याला दम लागत होता. शेवटी त्यालाही आपल्या भक्तांची काळजी असतेच की. पण तो एकदम व्यवस्थित पंढरपूरला पोहोचल्याने त्याला स्वतःवर आश्चर्य वाटलं होत. मन तर मानत होत. पण बुध्दी मात्र स्वतःलाच श्रेय देत होती.
“बघीतलं का?” रमण “कोणीही करु शकत. उगाच लोक दिखावा करतात.” वारीवरुन परत आल्यावर सोसायटीच्या आवारात सगळी मंडळी जमलेली होती. मग रमणने परत त्याची नेहमीची सुरवात केलेली होती.
“हो का?” सुमन आज्जी “मग उद्यापासून जवळच्या कामासाठी गाडी वापरणं बंद कर.”
“हो मग.” रमण तोऱ्यातच बोलला होता. “तुम्हाला काय वाटलं? मला चालता येत नाही. उद्यापासून गाडी बंद.”
मग सगळ्यांनीच रमणच कौतुक करुन त्याला हरभराच्या झाडावर चढवलं. तो हि लगेच खुश झाला होता. पण ते म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस. अगदी तसचं झालं होत. रमण फक्त दोनच दिवस गाडी वापरणे थांबवु शकला होता. त्यानंतर लगेचचं त्याचे पाय दुखायला सुरवात झाली होती. पंढरपुरपर्यंत चालत गेलेला तो. आता चार पावल चालायला ही परत दमायला लागला होता. ते बघुन रमणला परत स्वतःवरच आश्चर्य वाटायला लागलं होत. तरीही स्वतःचा तोरा सोडेल तो रमण कुठला?

क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा