Login

शरणागतांची वाहे चिंता भाग ३

शरणागतांची वाहे चिंता
मागील भागात.

सगळ्यांनीच रमणच कौतुक करुन त्याला हरभराच्या झाडावर चढवलं होत. तो हि लगेच खुश झाला होता. पण ते म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस. अगदी तसचं झालं होत. रमण फक्त दोनच दिवस गाडी वापरणे थांबवु शकला होता. त्यानंतर लगेचचं त्याचे पाय दुखायला सुरवात झाली होती. पंढरपुरपर्यंत चालत गेलेला तो. आता चार पावल चालायला ही परत दमायला लागला होता. ते बघुन रमणला परत स्वतःवरच आश्चर्य वाटायला लागलं होत. तरीही स्वतःचा तोरा सोडेल तो रमण कुठला?

आता पूढे.

काही दिवसांनी सार्थकच्या वडीलांनी त्यांची कार विकली आणि ती गाडी रिप्लेस करून नवीन मोठी एसयुव्ही गाडी घेतली. त्यांना सध्याची कार लहान पडायला लागली होती. एकततर फक्त माणसचं यायची किंवा सामान आणि सामान इतक ही नसायचं की त्यासाठी छोटा पिक अप करायची वेळ येईल. म्हणुन त्यांनी ती मोठी गाडी घेतली. आता त्यांच्याकडे सात सीटर गाडी पण आली होती आणि गरज लागल्यास तिसर सीट फोल्डर करुन त्यात सार्थकच्या वडीलांना त्यांच्या ऑफीसच सामान पण आणता येणार होत.

आता त्यांनी गाडी आणली म्हणून रमणलाही लगेच गाडी घ्यावीशी वाटायला लागली. खरं तर त्याची तिन माणसाचं कुटुंब होत. त्याला अनुरुप एक चांगली सेडन कार त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्याला नवीन गाडीची काहीच गरज नव्हती. तरी फक्त दुसऱ्यांनी घेतली म्हणून त्याला घ्यायची गरज वाटु लागली होती. त्याच्या घराचे हफ्ते ही अजुन संपलेले नव्हते. त्याच्या घरचे त्याला समजावुन थकले होते. तरी तो काही ऐकायलाच तयार नव्हता.

शेवटी सर्वांचा विरोध झुगारून त्याने नवीन पंचवीस लाखाची गाडी घेतलीच होती. त्याने पैशांची व्यवस्था कशी केली? हे कोणालाच सांगीतलेल नव्हतं. त्याला बाकीच्यांनी विचारुन देखील पाहीले. पण रमणने सांगायला टाळाटाळ केली होती. गाडीच स्वागत मात्र जोरदार केलेल होत.

अशातच चार महिने भुर्रकन उडुन गेले होते. एके दिवशी काही अनोळखी माणसं त्या सोसायटीमध्ये येऊन पोहोचले. ते थेट रमणच्या घरी गेले. त्यांच्या औपचारीक कपड्यांवरून रमणच्या कामातली माणसं असल्याच समजुन सोसायटीतल्या माणसांनी त्यांच्याकडे सध्यातरी दुर्लक्ष केलेलं होत. पण ती माणसं येऊन गेल्यानंतर मात्र रमण चांगलाच चिंतेत असल्याच दिसायला लगलं. त्याचा स्वभाव बघता बाकीच्यांनी तर त्याला काही विचारणं टाळलेलेच होत. पण सुमन आज्जींनी त्याची विचारपुस केली. तो वरवर जरी सगळेच काही ठिक असल्याचं बोलुन गेला होता. तरी त्या मागे काहीतरी लपवत असल्याच आज्जींना जाणवलं.

आपली संस्कृतीच अशी आहे ना की, समोरचा कसाही वागला? तरी त्याला अडचणीत बघुन त्याची कुठुन का असेना? त्याची माहीती काढलीच जात असते. प्रसंगी गपचुप मदतही होत असते.

पुढच्याच महिन्यात तिच माणस परत येऊन रमणच्या घरी नोटीसच देऊन गेली होती. यावेळेस ही रमणने कोणाला काहीच सांगीतलेल नव्हतं. पण त्याची चिंता वाढतचं चालल्याच सगळ्यांनाच जाणवत होत. यामुळे त्याची चिडचिडही खुप वाढतं चालली होती. हल्ली हल्ली तर तो कोणावरही पटकन ओरडु लागला होता.

त्याच वागण बघुन सोसायटीमधले बाकी सदस्यही आता चिंतेत आले होते. शेवटी त्याचीही सगळ्यांसोबत बरीच वर्ष सोबत होती. आता दुसरा काहीच उपाय न दिसल्याने सगळ्यांनीच सार्थकला रमणच्या मुलासोबत बोलायला सांगीतले. सार्थक आणि त्याच्यात चांगलीच गट्टी होती. पण तो ही काहीच बोलला नव्हता.

एके दिवशी सार्थक नेहमीप्रमाणेच सकाळी सोसायटीमध्ये असलेल्या मंदिरात गेलेला होता. तिथल्या मंदिरात पांडुरंगाची पुजा करुन तो तिथुन बाहेर पडला. तर त्या मंदिराच्या भिंतीच्या आडोशाकडुन सार्थकला आवाज आला होता. त्याने जरा कान टवकारले तर त्याला समजल की तो रमणचा आवाज होता. त्याला जास्त काही कळलं नाही पण पैसे भरायला जमत नाही. एवढचं काय ते त्याच्या लक्षात आलेलं होत. मग त्याने ही गोष्ट लगेचचं त्याच्या वडीलांना सांगितली.

काही दिवसांनी रमणच्या घरी कोर्टाची नोटीस येऊन धडकली. तेव्हा रमण अजुनच खचुन गेला. त्याला बघुन आता सगळ्यांनाच त्याची खुपच काळजी वाटायला लागली. कोर्टात हजर झाल्यानंतर त्याच्याकडे फक्त पैसे भरण्याची मागणी करणार होते. त्यासाठी त्याला जास्त मुदतही मिळणार नव्हती.

शेवटी सुमन आज्जी, सार्थकचे वडील, सोसायटीचे इतर काही सदस्य मिळुन रमणच्या घरी जाऊन बसले होते. एवढ्या सगळ्यांनाच एकदम आलेल बघुन रमण तर गांगरून गेला होता. तो काहीच बोलला नाही बघुन सुमन आज्जी बोलल्या.

“आता बऱ्या बोलान बोलणार की आधीसारखी काठी उचलु?” सुमन आज्जी एकदम कडक आवाजात बोलल्या होत्या.

तस रमणला त्याला शिकवणारी पंधरा वर्षापुर्वीच्या सुमन आठवल्या होत्या. त्यांनीच तर त्या सोसायटीमधल्या बऱ्याच मुलांना शिकवलेल होत. त्यांच्यामुळेच या सोसायटीमधली बरीच मुले मोठमोठ्या पोस्टवर कामाला होती. म्हणुनच त्या सोसायटीमध्ये सुमन आज्जींना खुपच मान होता. रमणही त्यातलाच एक विद्यार्थी होता. एवढे दिवस तर दुर्लक्ष केल होत. पण आताची त्याची अवस्था बघुन सुमन आज्जी मधली शिक्षिका जागी झाली होती.

रमणचे डोळे जरा ओलावले. तो अजुनही शांतच होता. म्हणून रमणची बायको पुढे आली.

“ते कसे काही बोलतील?” रमणची बायको जरा चिडुन बोलली. “घराचे हफ्ते अजुन संपले नव्हते, तोवर ही गाडी घेऊन आले. गाडीचे हफ्ते सांभाळताना घराचे चार महिन्याचे हफ्ते थकले. मग बँकेने नोटीस पाठवली होती. आता तर कोर्टाची नोटीस आली आहे. पैसे नाही भरले तर घर खाली कराव लागणार.” शेवटच बोलता बोलता तिचा गळा भरुन आला होता.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all