मागील भागात.
“ते कसे काही बोलतील?” रमणची बायको जरा चिडुन बोलली. “घराचे हफ्ते अजुन संपले नव्हते, तोवर ही गाडी घेऊन आले. गाडीचे हफ्ते सांभाळताना घराचे चार महिन्याचे हफ्ते थकले. मग बँकेने नोटीस पाठवली होती. आता तर कोर्टाची नोटीस आली आहे. पैसे नाही भरले तर घर खाली कराव लागणार.” शेवटच बोलता बोलता तिचा गळा भरुन आला होता.
आता पूढे.
“पण आधीच घराचं कर्ज असताना दुसर कर्ज कसं काय भेटलं?” सार्थकचे वडील
“ते प्रायव्हेट फायनान्स कडुन घेतल म्हणे.” रमणची बायको
“एवढं सगळं झाल आणि आता सांगु राहीले?” सुमन आज्जी
“कुठल्या तोंडाने सांगु?” रमणचा आता कुठे आवाज निघाला होता. “आजवर जसा मी वागलो आहे. त्यावरुन कोणी मदतीला येईल ही अपेक्षाच सोडुन दिली होती मी.”
“एवढचं ओळखल का रे आम्हाला तु?” सार्थकचे वडील चिडुन बोलले. “एवढ्या वर्षाची सोबत अशीच होती का?”
“आता जे झाल ते जाऊद्या.” सुमन आज्जी “पुढे काय? गावी आई वडीलांना कळवलसं का?”
“नाही.” रमण दिर्घ श्वास घेत बोलला.
“ते इथे होते तोवर निदान त्यांचा तरी धाक होता तुला.” सुमन आज्जी “उगाच त्यांना गावाला जाऊ दिल.” सुमन आज्जींनी नकारार्थी मान हलवली होती.
“कधी बोलावलं आहे कोर्टात?” सार्थकचे वडील
“उद्या आहे तारीख.” रमण
“एखादा वकील बघीतलास का?” सोसायटीचे अध्यक्ष
“नाही.” रमणची बायको “पैसेच नाही हातात. तर वकील तरी कसा बघु?”
“बरं उद्या जाऊन तर ये.” सार्थकचे वडील “बघुया आपण काहीतरी.”
रमणला थोडा धीर आला होता. दुसर्या दिवशी तो कोर्टात गेला होता. अपेक्षेप्रमाणे त्याला कोर्टाकडून पैसे भरण्यासाठी सांगीतलं गेल होत. अन्यथा त्याच्या विरुध्द अटकेचा आदेश काढला जाणार होता. त्याच्या विरुध्द रिकव्हरी केस दाखल केली गेली होती. त्याने जर पैसे नाही भरले तर त्याच्या घरावर ही जप्ती येणार होती.
रमण खुपच टेन्शनमध्ये घरी आलेला होता. काय कराव? ते सुचत नव्हतं. तो त्याच टेन्शनमध्ये असताना एके दिवशी त्याचे आई वडील त्याच्या घरी येऊन पोहोचले. त्यांना अस अचानकं आलेल बघुन त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण मुश्कील झालं. त्याची आई जशी आत आली तसा त्याने तिच्या पायाशी बसुन घेतलं आणि अस्फुट हुंदके त्याच्या तोंडातून बाहेर पडले. ते बघून त्याच्या आईने त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवायला सुरवात केली.
आई वडीलांना आलेलं बघुन रमणला आता बराच धीर आला. त्यांनी येताना थोडेफार पैसे आणलेले होते. त्यातुन रमणसाठी एक चांगला वकील करण्यात आला. तरी बँकेचे पैसे भरण्यासाठी अजुन पैशांची गरज होतीच. फक्त ते पैसे भरायला मुदत मिळण्यासाठी कोर्टाला विनंती करायची होती. जी भेटण्याची शक्यता खुपच कमी होती.
पुढच्या तारखेपर्यंत पैशांची जुळवाजुळव करण्यात रमणचा वेळ गेला होता. तरी ही हवी तितकी रक्कम जमा झाली नव्हती.
त्या तारखेच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी सोसायटीच्या मंदीरात भजनाचा कार्यक्रम चालु झाला होता. यावेळेस ही सार्थकला वादनासाठी बसवण्यात आले. हरिनामाचा गजर झाला आणि भजनाला सुरवात झाली.
विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोवीला.
या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोवीला ||
रमण त्याच्या घराच्या खिडकीतून हे सगळंच बघत होता. मनाला आतून काहीतरी जाणीव झाली आणि तो सरळ उठून खाली आला. जणू काही तो आपोआप तिकडे ओढला गेला होता. भजन चालु असलेल्या जागेतून पूढे जात तो त्या विठूच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला. आज तो मनापासुन त्या विठ्ठलाला शरण गेला होता.
तिथे उपस्थित सगळेच रमणला बघून भारावून गेले. रमणची तिथेच बसल्या बसल्या भजनामध्ये तंद्री लागली. अस नव्हतं कि त्याचा देवावर विश्वास नव्हता. फक्त मी पणामध्ये तो गुरफटला गेला होता. कधी ते भजन संपल ते रमणला ही समजलं नाही. इतका तो त्या भजनात तल्लीन झाला होता. जेव्हा तिथला पुजारीने त्याला प्रसाद द्यायला हात लावला. तेव्हा तो भानावर आला.
“आज तु त्याला शरण आला आहेस.” पुजारी “आता तुझी चिंता त्याच्यावर सोड.”

"शरणागतांची वाहे चिंता." एवढं बोलुन तो पुजारी त्याच्या दुसर्या कामाला निघून गेला.
इकडे रमणने मनापासुन हात जोडत तो प्रसाद घेतला आणि आपल्या घरी निघून गेला. आज त्याला खूपच हलकं वाटायला लागलं होत.
दुसर्या दिवशी रमण कोर्टात गेला. आजवर कधीही कोणत्याही गुन्हेगाराला अथवा फसवणाऱ्या माणसाला वेळ ने देणारे न्यायमूर्ती साहेब आजच नेमकी सुट्टीवर गेले होते. समोरच्या वकीलांनी चार्ज कोर्टाकडे त्यांची केस नेण्याची विनंती तिथल्या क्लार्कला केली. पण आधीच चार्ज दिलेल्या कोर्टातही केसेसचा खूपच लोड असल्याने त्यांनी विनंती फेटाळून लावली गेली आणि त्यांच्या केसला तारीख पडली गेली.
रमणला आता पैसे जमा करण्यासाठी अजून दिवस मिळाले होते. त्या दिवसांतच रमणने त्याने नवीन घेतलेली गाडी विकली आणि पैसे उभे केले होते. जे पुढच्या तारखेला कोर्टातच त्या बँकवाल्या माणसांकडे जमा केले होते. त्याचे आता राहीलेले हफ्ते भरले गेले होते आणि पुढचे हफ्ते वेळेवर भरले जातील अशा आशयाच प्रतिज्ञापत्र त्याच्याकडुन लिहून घेतलं गेलं. त्यामुळे कोर्टाने ही ती केस लगेच बंद केली.
तिथून सुटल्यावर रमणने सगळ्यांची माफी मागीतली. खासकरून सार्थकची, कारण टेन्शनचे मूळ कारणच तोडून टाकले तर टेन्शन कसले राहील? असथ तो त्याला सहज बोलला होता. त्यामुळेच त्याला तीच गाडी विकायची कल्पना आली.

ज्यांच्याकडून ती गाडी घेतली होती. रमणने त्यांनाच ती परत विकली होती. कारण त्या गाडीवरच्या लोन ट्रान्स्फरची प्रोसेस त्या माणसांकडून सहज होणार होती.
एका भल्या मोठ्या टेन्शनमधुन मोकळ झाल्यावर रमण संध्याकाळी परत घरी येऊन त्या सोसायटी मधल्या विठुरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला.

समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा