Login

स्पर्धेच्या निमित्ताने...

स्पर्धेच्या निमित्ताने...
स्पर्धेच्या निमित्ताने...
साधारणतः दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे ईराचे गेट-टुगेदर झाले की,संजना मॅडम कडून चॅम्पियन ट्रॉफीची घोषणा होते. परंतु यंदा चॅम्पियन ट्रॉफीची घोषणा व्हायला थोडा वेळ लागला. अजून कशी
झाली नाही. नक्कीच काहीतरी कारण असेल पण स्पर्धा नक्की होणार असं वाटत होतं. एकदाची स्पर्धेची घोषणा झाली आणि आतुरता संपली. आता मनात विचार चक्र सुरू झालं, स्पर्धा कशी असेल. दीर्घ कथा असेल का? (डोळ्याच्या प्रॉब्लेम मुळे बरं का) कारण दीर्घकथा लिहायला मला थोडं अवघड जातं. पण इथेही सुटकेचा निःश्वास टाकला. कारण स्पर्धेमध्ये जलद कथा, लघुकथा, सुविचार, अलक लेखन, व्हिडिओ पर्वणीच पर्वणी. अरे वा! चला माझ्यासाठी तरी छानचं. अत्यंत उत्साहाने स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज झाले. टीम घोषित झाल्या. पुन्हा उत्सुकता.

आपल्या टीम कोण कोण असेल. नाही, आपण कोणत्या टीम मध्ये असू. मी ज्या टीम मध्ये होते त्या टीम मधले सदस्य काही नवीन, काही ओळखीचे. खूप छान वाटलं. टीम कॅप्टन अश्विनी. आणखी एक सुखद धक्का.अश्विनी ईराच्या एका गेट-टुगेदर मधे भेटलेली. चला छान सुरुवात झाली. लिखाणाला सुरुवात केली. कथा व्याकरण तपासणीसाठी ग्रुप वर टाकायच्या. प्रत्येक फेरी नुसार कथा तपासणीसाठी ग्रुप वर टाकत गेले आणि काय आश्चर्य काही तासातच कथा तपासून तयार. टाका ताई आता कथा ब्लॉगवर. कॅप्टनची अत्यंत प्रेमळ सूचना. असे करता करता स्पर्धा कधी सुरू झाली आणि कधी संपली कळलेच नाही.

अश्विनी. टीम कॅप्टन-
अश्विनी एक सुस्वभावी व्यक्तिमत्व. असं म्हणतात.. "ए.सी. नव्हे चांगल्या हृदयाची, शांत डोक्याची माणसे घराचे तापमान थंड ठेवू शकतात." अगदी तसेच झाले. कुठे गडबड नाही, कुठे चिडचिड नाही, सारं काही अगदी ऑलवेल.

शिल्पा सुतार मॅडम.
खरंतर शिल्पा मॅडम ईरावरील टॉपर लेखिका. लिखाणातील त्यांचे स्थान पाहून त्यांच्याशी बोलण्याची माझी तीव्र इच्छा होती. आता त्या ग्रुपमध्येच आल्यावर 'सोने पे सुहागा' मला तर एवढा आनंद झाला की, काय सांगू. आणि पहिल्यांदाच त्यांच्याशी फोनवरील बोलल्याने मी त्यांच्या प्रेमात पडली. अत्यंत सुस्वभावी असे व्यक्तिमत्व. मला एक गोड मैत्रीण त्यांच्या रूपाने मिळाली.

खुशी,
आपल्या टीम मध्ये खुशी आहे आता सर्वत्र खुशीच खुशी. हे समीकरण. सकारात्मक ऊर्जा आणि झाले ही तसेच. टीम मध्ये सकारात्मक ऊर्जा शेवटपर्यंत टिकून राहिली. खरंच खुशी तुझे खूप खूप कौतुक.

चेतन सर ,
माझ्यासाठी चेतन सर नवीन होते. पण त्यांच़े लेखन प्रभुत्व, गप्पांमध्ये सहभाग, कथा लिहिण्याचा त्यांचा स्पीड आणि विशेष म्हणजे सहकार्याची भावना ओतप्रोत भरलेली. खरंच सर्वच कौतुकास्पद.

शिल्पा परुळेकर,
ईरावरील नवखेपण त्यांनी जाणवूचं दिलं नाही. त्यांच्या सुंदर सुंदर कथा वाचनीय होत्या. आणखी एक नवीन मैत्रीण मला मिळाली.

हेमा ताई,
हेमाताई बद्दल काय बोलावं? रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असताना सुपरफास्ट एक्सप्रेस धडधडत निघून जावी अगदी तसेच. काय स्पीड. एक से बढकर एक सुंदर सुंदर कथा. चेतन सर, हेमाताई आणि अश्विनी हे तिघेही स्पर्धा जिंकायचीच या ध्येयाने अगदी झपाटलेले होते. अर्थातच आमचा सुद्धा झपाटलेल्या यादीत सहभाग होताच. त्यामुळेच विजयश्री खेचून आणल्या गेली.

ऋतुजा वैरागडकर,
ऋतुजाची उत्साही लेखणी मला माहिती होती. आपल्या संघात त्या आहेत ती गोष्ट मनाला निश्चितच आनंद देणारी होती. आणि इथेही त्यांनी आपल्या सुंदर लिखाणाची छाप टाकली. आणखी एक गोड मैत्रीण.

विद्या,
नावातच ज्ञान, विद्वत्ता सारं काही दडलेल. विद्याही माझ्यासाठी नवीन होती. फोटो पाहिला होता. अत्यंत सोज्वळ चेहरा. पहिल्यांदाच फोन केला आणि तिनेही माझं मन जिंकून घेतलं. विशेष म्हणजे प्रत्येक बाबतीत परिपूर्ण ज्ञान . खरंच विद्या तुझे खूप खूप कौतुक.

सुशांत सर,
सुशांत सरही माझ्यासाठी नवीन होते. परंतु त्यांचे लिखाण, ग्रुप वरील त्यांचे योगदान अगदी मोलाचे. प्रत्येक सामाजिक विषयावर त्यांची पकड जबरदस्त आहे. मधून मधून ग्रुप वर देखील सहभाग.खूप छान सर.

सर्वेश सर,
सर्वेश सरांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांचे गुणगान नेहमीच अनेकांच्या तोंडून मी ऐकले होते. म्हणूनच सर आपल्या ग्रुप मध्ये आहे ती गोष्ट सुद्धा माझा साठी सुखद धक्का देणारी होती. व्याकरण तपासण्यात त्यांचाही मोठा सहभाग. सर, माझ्या कथेसाठी AI वरून इमेज द्याल का? माझा भीत भीत प्रश्न.पण कथा पाठवा मॅडम, लगेच देतो तयार करून. आणि काही वेळातच इमेज माझ्या फोन नंबर वर पाठवायचे सुद्धा.मार्गदर्शन अगदी अचूक. मधून मधून ग्रुप वर सहभाग. सर्व काही खूप छान.

मीनाक्षीताई,
मीनाक्षीताई आणि मी ईराच्या स्नेहसंमेलनात भेटलो. सोबत छान छान फोटो काढले. अत्यंत सुस्वभावी,मृदू व्यक्तिमत्व. सकारात्मकता ओतप्रोत भरलेली. निश्चितच त्यांचा उत्साह पूर्ण स्पर्धेत पाहायला मिळाला.

जानकी ताई,
जानकी ताईंचे नाव सुद्धा मला नवीन होते. परंतु स्पर्धा जिंकायलाचं हवी, ही त्यांची तळमळ प्रत्येक वेळी दिसून येत होती. त्यांचीही प्रत्येक कथा वाचनीय होती. खरंच जानकी ताई खूप कौतुक. आणखी एक नवी मैत्रीण.
अशा सुंदर सुंदर व्यक्तिमत्त्वाच्या, एक से बढकर एक अशा हुशार व्यक्ती एकत्र आल्या म्हणतात नां.. एकटा माणूस फक्त विचार करू शकतो पण संपूर्ण संघ भविष्य घडवतो.त्यामुळेच यशाचा मार्ग सुकर झाला व विजयाची पताका फडकावल्या गेली.

संजना मॅडमचे सुद्धा या निमित्ताने खूप खूप आभार. त्यांनी आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आपल्यासमोर आरसा नसता तर आपण आपले रूप पाहू शकलो नसतो. प्रत्येकामध्ये अनेक सुप्त गुण असतात पण त्यासाठी प्लॅटफॉर्म मिळणे, संधी मिळणे महत्त्वाचे असते. ही संधी आपल्याला ईरा व्यासपीठ अर्थातच संजना मॅडमच्या माध्यमातून मिळाली आणि आपल्या विचारांचे प्रकटीकरण आपण करू शकलो.शेकडो थोर विचार, भावना व आकांक्षा मनात बाळगण्यापेक्षा एकच सत्कृत्य आपल्या हातून झाले तर त्यांचे मूल्य अधिक असते. ते सत्कृत्य संजना मॅडमच्या हातून घडले. खरंच संजना मॅडमचे व्यक्तिमत्त्व म्हणजे विचारांचे कृतीचे आणि संवेदनशीलतेचे एक दुर्मिळ मिश्रण आहे. या ईरा व्यासपीठाने (नव्हे ईरा विद्यापीठाने) मला लेखक पदवी मिळवून दिली. खूप खूप धन्यवाद संजना मॅडम.

खरंच ईरा व्यासपीठ हे अनेक नवरत्नांची खाण आहे. संजना मॅडम आपल्या लाईव्ह मध्ये बोलल्या होत्या की,ईरामधे अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत की आपण त्यांना काय पुरस्कार देणार. अगदी खरं आहे मॅडम. कारण ही सर्व व्यक्तिमत्व म्हणजे ईश्वराकडून मिळालेला स्वतःच एक पुरस्कार आहेत. नामदेव सर, निधी मॅडम अमित सर, शिल्पा सुतार मॅडम, सारिका, शीतल माने कोण कोणती आणि किती नावे घ्यावी. सर्वांचेच खूप खूप कौतुक.

कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यामागे झटणारे अनेक खांदे असतात. ईरा प्रशासकीय वर्ग, परीक्षक वर्ग, ईरा परिवार आणि ईराचा असंख्य वाचक वर्ग सर्वांचे खूप खूप आभार.
धन्यवाद
सौ. रेखा देशमुख
0