Login

शत्रूंच्या छायेत भाग - १

कॅप्टन अनाया आणि तिच्या टीमचे शौर्य शत्रूला पकडण्यास मदत करते.
शत्रूंच्या छायेत भाग - १


कॅप्टन अनाया देशमुख हे भारतीय संरक्षण दलातील सर्वोत्तम इंटेलिजन्ट अधिकाऱ्यांपैकी एक नाव. वयाने तरुण, पण धैर्य, बुद्धिमत्ता आणि देशनिष्ठा यांचं सुंदर मिश्रण तिच्यात होतं.
दिल्लीतील कमांड सेंटरमध्ये पहाटेच्या अंधारोबरोबरच आपत्कालीन अलार्म वाजला होता. स्क्रीनवर एक चिन्ह सतत चमकत होतं, “Red Protocol Active”.

कॅप्टन अनायासह तिचं पथक, लेफ्टनंट आरव, टेक्निकल अधिकारी मीरा आणि कम्युनिकेशन एक्स्पर्ट शौर्य यांना तातडीने बोलावण्यात आलं.

ब्रिफिंगमध्ये रॉ अधिकारी म्हणाला, “आपल्याकडील ‘X-47’ नावाचा गुप्त संरक्षण पासवर्ड एका ड्राइव्हमध्ये आहे. जर हा पासवर्ड चुकीच्या हातात गेला, तर आपल्यावरील उपग्रह सुरक्षा प्रणाली धोक्यात येईल.
गुप्त शत्रू गट ‘Black Flang’ या पासवर्डच्या मागे आहे. तुम्हाला सीमाक्षेत्रात जाऊन त्यांची हालचाल थांबवायची आहे.”

अनाया म्हणाली, “सर, आम्ही पासवर्ड कधीही लीक होऊ देणार नाही.”

टीम हत्तीमल जंगलातून शत्रूच्या छावणीकडे पहाटेपूर्वी पोहोचली. अंधारात फक्त रातकिड्यांचा आवाज होता. काही अंतरावर अज्ञात गाड्यांची हालचाल दिसत होती. आरवने दुर्बीण लावून पाहिलं, “मॅडम, हे काही साधे लोक नाहीत. पूर्ण शस्त्रसज्ज टीम आहे.”

अनाया शांतपणे पोटावर झुकत पुढे गेली. तिला यांनी केलेली योजना आधीच समजली होती, शत्रू सीमारेषा ओलांडून उपग्रह कंट्रोल युनिटवर हल्ला करणार होता.

टीमने त्यांच्या गुप्त ट्रान्समीटरद्वारे कमांड सेंटरला संकेत पाठवला. मिशन सुरू होतं…

पण अचानक… सर्व काही बदललं

जंगलात एका जुन्या कोठारासारख्या ठिकाणी ते पोहोचले. तेथून सिग्नल येत असल्याचा शौर्यने उल्लेख केला. अनाया आत शिरली आणि आजूबाजू तपासत असतानाच तिच्या मागून कुणीतरी तिला बेशुद्ध करण्यासारखी तीव्र झटका-डिव्हाइस लावलं.

डोळे उघडले तेव्हा अनाया एका अंधाऱ्या खोलीत, खुर्चीला बांधलेली होती. धातूच्या दारापलीकडून आवाज आला.

कुणीतरी हसत म्हणाला, “कॅप्टन अनाया देशमुख… अखेर आम्ही तुला पकडलं.”

समोर तीन लोक आले, मुखवटे घातलेले. त्यांच्यातील एक नेता ‘वोल्ट’ म्हणून ओळखला जात असे.

वोल्ट म्हणाला, “आम्हाला X-47 चा पासवर्ड सांग. नाहीतर आम्ही तुला इथून बाहेर जाऊ देणार नाही.”

अनाया शांतपणे म्हणाली, “मी सैनिक आहे. देशाच्या सुरक्षेवर तडजोड करणार नाही.”

वोल्ट रागाने टेबलवर हात आपटत म्हणाला,
“तुला वेळ देतो, विचार करून बोल… तुझ्या टीमचं ठिकाणही आमच्याकडे आहे.”

अनाया घाबरली नव्हती, पण चिंतित नक्कीच होती. जर शत्रूंना तिच्या टीमवर हल्ला करता आला, तर संपूर्ण मिशन धोक्यात जाणार होतं.

तिच्या मनात एकच विचार, “कोणत्याही परिस्थितीत पासवर्ड सांगायचा नाही.”

खोलीत बसल्याबसल्या ती डोळे मिटून पुढील पाऊल ठरवू लागली. तिला माहित नव्हतं… तिची टीम अजूनही तिच्या शोधात जिवाशी केलेल्या खेळात गुंतली होती.