Login

शत्रूंच्या छायेत भाग - २ (अंतिम भाग)

कॅप्टन अनाया आणि तिच्या टीमचे शौर्य शत्रूंना पकडण्यास मदत करते.
शत्रूंच्या छायेत भाग - २ (अंतिम भाग)


जंगलाच्या काठावर सकाळचे सूर्यकिरण उतरू लागले होते, पण अनाया कुठेच दिसत नव्हती. तिच्या गायब होण्याने टीममध्ये तणाव वाढला होता.

मीरा तिच्या पोर्टेबल सिग्नल-ट्रेसरकडे पाहत म्हणाली,
“मॅडमचा बायो-ट्रॅकर काही सेकंदांसाठी सक्रिय झाला होता. कदाचित पकडताना त्यांच्या उपकरणांनी जॅमिंग केलं असेल. पण लोकेशन या कोठाराच्या बाजूला खोलवर आहे.”

आरवने ताबडतोब टीमला निर्देश दिले, “आपण तीन वेगवेगळ्या दिशेने आत जाऊ. शत्रू कोणत्या बाजूनेही पलटी करू शकतो.”

शौर्यने आपले कम्युनिकेशन जॅमर सक्रिय केले, यामुळे शत्रूचे रेडिओ संपर्क ३० मिनिटांसाठी अडचणीत येणार होते.

टीम अंधाऱ्या गल्ल्यांमधून सावधपणे पुढे सरकू लागली. पायाखाली मोडणाऱ्या पानाचाही आवाज त्यांना टाळावा लागणार होता.

अनाया आता पूर्णपणे सजग होती. तिचे हात बांधले होते पण तिचे डोळे सतत खोली तपासत होते, भिंतीतील भेगा, छताचा कोपरा, जमिनीवरील पॅटर्न, बाहेरचे आवाज…सर्व.

तिला सैनिक म्हणून माहित होतं, दर छोट्या गोष्टीतून सुटकेचा मार्ग तयार करता येतो. वोल्ट पुन्हा आत आला. यावेळी त्याचा चेहरा जास्त कठोर होता.

वोल्ट म्हणाला, “आमच्या हाती उपग्रह-सिस्टमचं नियंत्रण येणार आहे. फक्त एक पासवर्ड… आणि हे देश गुडघ्यावर. बोल, अनाया.”

अनाया त्याला शांत नजरेने पाहत म्हणाली, “सैनिक जेव्हा देशासाठी उभा असतो तेव्हा भीतीपेक्षा निष्ठा मोठी असते.”

वोल्ट गुरगुरत बाहेर निघून गेला.

शौर्यने हलक्या आवाजात सांगितलं, “सावधान, दोन गार्ड्स अजून आहेत.”

आरव,‌ “मीरा, डावीकडचा. मी उजवीकडचा हॅन्डल करतो.”

दोघांनी नॉन-लिथल स्टनरने गार्ड्स निष्क्रिय केले. कोणताही आवाज न होता ते पुढे गेले.

कॉरिडॉरच्या शेवटी मोठी दारं दिसत होती, शक्यतो नियंत्रण कक्ष होतं ते.

त्यांनी टीमचा सिग्नल रिब्रीफ केला, “अनाया आतच असण्याची शक्यता ७८%.”

आरवच्या डोळ्यांत पहिल्यांदाच काळजी जाणवत होती.
“अनाया सुरक्षित असली पाहिजे.”

खोलीत एक लहानसा स्क्रू अनायाच्या नजरेत आला.
ती पायाने खुर्ची मागे ढकलत जमिनीवर पडली. संधी कमी होती पण ती प्रयत्न करत होती. तिने बोटांनी स्क्रू बाहेर काढला आणि दोरीवरील लूप हळूहळू सैल करू लागली.

दूरवरून आवाज येऊ लागले, शत्रू गोंधळलेले दिसत होते.
शक्यता होती, तिची टीम जवळ आली आहे.

अनाया, “बस, आता वेळ झाली आहे.” आरवने सिग्नल दिला, “आक्रमण!”

मीरा आणि शौर्य दोन्ही बाजूंनी आत शिरले. शत्रूचा गोंधळ उडाला. तिथे त्यांच्या सर्व मॉनिटर्सवर भारताच्या उपग्रह प्रणालीचे नकाशे चमकत होते.
वोल्ट ओरडत म्हणाला, “पासवर्ड मिळवा! हे मिशन थांबू नये!”

पण तितक्यात, दार फोडून अनाया बाहेर आली.
तिने स्वतःचा बेसिक डिफेन्स मोड वापरून गार्ड्सला चुकवत जवळच्या कन्सोलजवळ पोहोचली.

वोल्ट पुढे येऊन अनायाला रोखत म्हणाला,
“पासवर्ड दे! हे देश वाचवायचं तुझ्यासाठी नाही, तुझ्या कमांडसाठी नाही… आज तुला तुझे प्राण वाचवायचे आहे!”

अनाया एक पाऊल पुढे झाली, ठाम आवाजात म्हणाली,
“सैनिकाचं जीवन त्याच्या देशापेक्षा कधीच मोठं नसतं.”

वोल्ट संतापला. त्याचे साथी कंट्रोल पॅनेल सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते.

अनाया शांतपणे म्हणाली, “पासवर्ड हवा? ठीक आहे…”

वोल्ट थबकला. अनाया जवळ झुकून म्हणाली, “No Surrender.”

वोल्ट गोंधळला. त्या क्षणी आरव मागून आला आणि तटस्थरीत्या वोल्टला थांबवला.

कमांड सेंटरकडून टीमच्या इयरपीसवर संदेश आला,
“अभिनंदन टीम. तुम्ही ‘Black Fang’ चा खरा नेता, वोल्ट याला पकडलंत.
X-47 पासवर्ड कधीच अस्तित्वात नव्हता.
हे सर्व ऑपरेशन त्याला बाहेर काढण्यासाठी रचलेलं होतं.”

मीरा थक्क झाली, “म्हणजे… आपण ज्या पासवर्डचं रक्षण करत होतो, तो फक्त एक सापळा होता?”

“हो, पण तुमची निष्ठा आणि तयारी खऱ्या पासवर्डपेक्षाही मौल्यवान आहे.”

आरवने अनायाकडे पाहत शांतपणे म्हटलं, “मॅडम, तुमच्या धैर्यामुळे आम्ही हे मिशन पूर्ण करू शकलो.”

अनाया हसली, “टीमवर्कमध्ये कधीच ‘एकटा’ असं नसतं.”

संध्याकाळचा सूर्य खाली उतरत होता. हेलिकॉप्टरमध्ये बसताना अनाया खिडकीतून जंगलाकडे पाहत म्हणाली,
“प्रत्येक मिशन शिकवून जातं. आजच्या मिशनने शिकवलं, विश्वास आणि धैर्य हेच खरे सुरक्षा-किल्ले आहेत.”

कमांडरने बेसवर स्वागत करत सांगितलं, “तुमच्या धैर्यामुळे देश एका मोठ्या संकटातून वाचला आहे.”

टीमचे चेहरे अभिमानाने उजळले.