" तू एकदा त्या मुलीला भेट..!" मनोज संकेतला बोलला.
पल्लवीला ह्या गोष्टीचा इतका राग आला की ती तिथून उठून तडक बाहेर पडली आणि तिच्या चेअरवर जाऊन बसली. संकेत पल्लवीचा असा रागावलेल्या चेहरा पहिल्यांदा पाहत होता. मनोजला मात्र ह्याच काही वाटलं नाही.
" अरे..! काय सांगतोयस हे..?" संकेत मनोजला बोलला.
" खरंच सांगतोय. त्या मुलीला भेट..!"
" राहूदे.! चल..! कामं करूया..!"
असं बोलून संकेत उठला आणि ऑफिसकडे जाऊ लागला. मागुन मनोजही आला. मनोज त्याच्या चेअरवर बसला. त्याला तिथे आलेलं पाहताच पल्लवीने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि तिच्या कामात व्यस्त आहे असं दाखवू लागली.
काही वेळाने संकेतने पल्लवीला आवाज दिला,
" पल्लवी..!"
" येस.? आले..!" असं बोलून पल्लवी संकेतच्या टेबल समोर उभी राहिली. टेबलसमोरील पार्टिशनवर दोन्ही हात ठेवून बोलली,
" बोला सर..! काय हुकूम..?"
" हुकूम वैगरे काय..? तुला आता एक मेल फॉरवर्ड करतो आहे. तो तेवढा चेक करून मला काही बदल करावे लागतील का ते इथे येऊन सांग..! मेलला रिप्लाय देऊ नकोस..!"
" ठीक आहे..!"
" आणि मनोजला सांग झालेत तेवढे रिपोर्ट संकेतला सेंड कर..!"
" ते तुझं तू बघ..!"
" काय..?"
" मनोजला काय सांगायचं आहे ते..!"
" एक मिनिट..!"
" तुमच्यात नक्की काय झालंय..?"
" काही नाही .." पल्लवी तोंड दुसरीकडे फिरवून बोलली.
" लंचब्रेकमध्ये मनोज जे बोलला त्याचा राग आलाय का तुला..?"
" हां मग..! कसा बिनधास्त बोलला तो तुला की त्या मुलीला भेट एकदा..!" पल्लवीने मनातलं बोलून टाकलं.
" अ गं..! त्याला काही वाटलं असेल म्हणून तो बोलला. मी काय लगेच त्याचं ऐकून तसं करणार आहे का..?"
" तू त्याचं ऐकून करणार आहेस की नाही हे मला माहित नाही. पण तो असं कसं सुचवू शकतो..!"
" तू नको एवढा राग राग करुस..!" संकेत पल्लवीला समजावत म्हणाला.
" मला राग नाही आलाय. पण तो चुकीचं बोलला. वरून त्याला ते चुकीचं वाटतं ही नाही आहे..!"
" तू शांत हो..!"
संकेतने पल्लवीला त्याच्या बाजूच्या चेअरवर बसायला बोलावलं,
" ये..! बस इथे..!"
" राहूदे..! कामं आहेत..!"
" जरा वेळ बस..!"
पल्लवी तिथे येऊन बसली.
" एक विचारू..?"
" विचार..!"
" तुझ्यात आणि मनोजमध्ये काही झालं आहे का..?"
" काय..? "
" कोणत्या गोष्टीवरून वाद..?"
" नाही रे..! वाद असं नाही..!"
" मग काय..?"
" काय सांगू तुला आता..!"
" सांग..! तूच सांगू शकतेस..! तो बोलणार नाही..!"
" अरे..! तू सुरुचीला भेटून आल्यानंतर तुमच्यात जे घडलं आणि आधीपासून जे घडतंय ते सगळं आम्हाला सांगत आहेस ना..!"
" हो..! मग..?" संकेत मध्येच बोलला.
" अरे ऐकून घे..! " पल्लवी त्याला थांबवत बोलली, " तर त्या दिवशी घरी जाताना मी त्याला सहज म्हणाली की, तू संकेतच्या जागी असतास तर काय केलं असतस..? तर तो बोलला, मी आईला समजावून सांगितलं असतं की तुला नातवंड हवं आहे ना. मग त्यासाठी वेगळे ऑप्शन आहेत."
" वाह..! ग्रेट..! मानलं त्याला...!"
" काय ग्रेट..?"
" मग..! त्याचे विचार किती फॉरवर्ड आहेत..!"
" फक्त विचार आहेत..! समोर परिस्थिती आली की बोललेलं करायला जमत नाही सगळ्यांना. म्हणून मी त्याला तस बोलून दाखवलं.."
" ओहह...! मग..?"
" मग काय..? मग तो बोलला, मला काय तू इतरांसारखी समजतेस का..? त्याला मी समजावत होते, पण त्याला त्या गोष्टीचा राग आला आणि तो लगेच निघून गेला. तेंव्हा पासून तो असा वागतोय..!"
" असं झालं आहे तर..!"
" हं..!"
" पण तुझं ही चुकलंच...! तू त्याला असा प्रश्न विचारायला नको हवा होतास.. त्यात त्याने त्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यावर प्रतिउत्तर तरी द्यायला नको हवं होतं."
" हो..! पण मी त्याला सॉरी बोलणार होते. पण तो लगेच निघून गेला."
" मग तू त्याला थांबवायचंस ना..! किंवा दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्याबरोबर बोलायचं ना..!"
" अरे हो रे..! मी बोलायचा प्रयत्न करत होते. पण तो तेंव्हा पासून मला टाळतोय. त्यात तू टेन्शन मध्ये होतास. त्यामुळे तुला मी काही बोलले नाही."
" मग आता सॉरी बोल..! मी तुझ्याबरोबर येतो..!"
" आता नाहीच बोलणार...!" पल्लवीही हट्टाला पेटली.
" का ..? आता तुला काय झालं..?"
" तुला कसा बोलला तो, त्या मुलीला भेट म्हणून. म्हणजे त्याचे विचार ही तुझ्या आई सारखेच आहेत..! किंवा तू बोललास तसे त्याचे विचार ' फॉरवर्ड ' आहेत."
" अच्छा..! म्हणजे आता तू ही त्याच्यावर रागावलीस..? आता तुम्ही तुमचं बघा..!"
" हो..! चल..! मला कामं आहे. मी मेल चेक करते आणि तुला भेटते."
" ओके..!"
असं बोलून पल्लवी तिच्या जागेवर गेली. संकेत मात्र हे सगळं ऐकून स्वतःशीच हसत होता. तशी चूक पल्लवीची होती. तिने कशाला उगाच त्या बोळ्या मनोजला असा प्रश्न विचारायचा..? त्या बिचाऱ्याने दिल उत्तर..! उत्तर तर चांगलं दिल होत की त्याने. मग त्यात पल्लवीने उगाच कशाला चूका काढायच्या किंवा त्या उत्तरांवर संशय घ्यायचा.! पल्लवी त्याची परीक्षा तर घेत न्हवती ना..? हं..! संकेतने पल्लवी आणि मनोजकडे पाहिलं. नाही नाही..! पल्लवी आणि मनोज..! नाही..! शक्य नाही..! पल्लवी स्वतःहून मनोजकडे आकर्षित झाली असेल..? नाही..! ........... असेल ही..! बिचारा साधा भोळा..! आवडला असेल तिला..! पण शक्यता कमीच.! जरी मनोज तिला आवडला असेल तरी आता मात्र तिच्या मनातून उतरला. मनोज मला अस का बोलला असेल की, 'एकदा भेट त्या मुलीला '. त्यालाच विचारून पहावं. आज ऑफिसमधून निघाल्यावर ह्याला पकडू. असा विचार करत संकेत कामाला लागला.
पल्लवीने मेल चेक केले आणि संकेतला येऊन भेटून गेली. ती तिच्या जागेवर बसली आणि मनोज संकेतजवळ गेला. जणू काही तो पल्लवीच्या समोर जाणं टाळत होता.
" तुला सगळे रिपोर्ट सेंड केले आहेत. चेक करून घे..!" मनोज संकेतला बोलला.
" अरे.! थँक्स..!"
" थँक्स काय..? माझं काम आहे ते..!"
" हो..! पण सगळे रिपोर्ट एवढ्या लवकर पूर्ण केलेस म्हणून थँक्स बोललो."
" अजून काही..?"
" काही नाही.. आता तुला आराम. मी रिपोर्ट चेक करतो. काही चेंजेस असतील तर मी ते करतो..!"
" थँक्स..!" असं बोलून मनोज तिथून जायला मागे वळला. तोच संकेतने त्याला आवाज दिला,
" मनोज..!"
" येस..?" मनोज संकेतकडे पाहून बोलला.
" आज ऑफिसमधून निघाल्यावर तुला कुठे जायचं आहे का..?"
" कुठे म्हणजे..? "
" अरे..! म्हणजे घरीच जाणार आहेस की दुसरं काही काम आहे?."
" नाही रे..! घरीच जाणार आहे..! तुझं काही काम आहे का..?"
" काम असं नाही. पण तुझ्याबरोबर बोलायचं आहे. आपण निघाल्यावर कॉफीस घेत बोलू..!"
" ओके..! शक्य असेल तर इथेच बोल..!"
" नको..! आपण बाहेर बोलू..! चालेल ना..?" संकेतने प्रश्न केला.
" हो रे..! चालेल.!" असं बोलून मनोज त्याच्या चेअरवर जाऊन बसला.
संध्याकाळ झाली. तिघे ही ऑफिसमधून निघाले. पल्लवीने संकेतला बाय केलं आणि ती पुढे निघाली. दररोज तिच्या सोबत चालणार मनोज त्या दिवसापासून पुढे निघून जात होता. आज मात्र तो संकेतबरोबर मागे राहिला होता. बहुतेक हे दोघे आज कुठे तरी जाणार आहेत वाटतं. हं..!, असं मनात बोलून पल्लवी निघून गेली.
संकेत मनोजला जवळच्या कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा