शीतल
अचानक एक बातमी टीव्ही वरती आली
त्या बातमीने अनेक मनेही हेलावली
त्या बातमीने लावले बुद्धीला विचार करायला
प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का?असा विचार मनी आला
हल्ली अनेक घटना ऐकल्या
तरी त्यांनी मनावर आघात नाही केला
पण तुझा उल्लेख होताच
डोळ्यात अश्रू चा थेंब मात्र आला
ज्यांचं अनेकांनी अनुकरण करावं त्या घरातील तु
ज्यांना अनेकांनी पुजील त्यांची वारसदार तु
ज्यांचा समाजसेवेचा वसा
कित्येकांनी घेतला
त्यांचा अंश असा कसा नैराश्येत गेला
काय चुकले?कोठे चुकले?
आम्हा माहीत नाही
आम्हा मात्र एवढे वाटते
तू केलीस फार घाई
थोडा अजून तू विचार करायला हवा होतास
आणि सामंजस्याने तू प्रश्न मिटवा यला हवा होतास
प्रिती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा