Login

शेंडेफळ भाग १

नेहमीच झुकतं माप हे बारक्या लेकाकडे का सासूबाई?
टीम : श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

"अहो आई..तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे आराम करायला आणि तुम्ही हे इतकं करत बसता?" वैष्णवी म्हणाली

मी बरी आहे. ते जरा पंखा फास्ट असतो ना रात्रीचा म्हणून जरा सर्दीने डोकं धरलं आहे." वैष्णवीच्या सासूबाई म्हणाल्या.

बरं..ठीक आहे. हे घ्या, सूप बनवलं होतं घरी ते घेऊन आलेय. गरम आहे तर पिऊन घ्या म्हणजे जरा बरं वाटेल." वैष्णवी सुपचा डब्बा पुढे करत म्हणाली आणि उठून चमचा आणायला गेली.

छोटी जाऊबाई घरातच होती पण आवाज देण्याची पद्धत माहीत नसल्याने वैष्णवीनेच तिची विचारपूस केली आणि नेहमी सारखी जाऊबाईने अहंकारात मान डोलावली.

पुढे काही न बोलता वैष्णवी किचन बाहेर चमचा घेऊन आली.

"सूप जास्त तिखट नाही लागत ना?" वैष्णीवने सासूबाईंना विचारलं.

"नाही नाही..बरोबर झाल आहे. जरा बरं वाटलं सूप पिऊन." वैष्णवीच्या सासूबाई म्हणाल्या.

वैष्णवीने सासुबाईंची बाकी विचारपूस केली आणि रिकामा झालेला सुपचा डब्बा घेऊन घरी यायला निघाली.

दोन दिवसांनी पुन्हा सकाळी सकाळी दिराचा फोन आला. आईची तब्बेत पुन्हा बिघडल्याने त्याने हॉस्पीटल मध्ये आणल्याच सांगितल.


हॅलो, हां भाऊजी काय म्हणताहेत डॉक्टर?" वैष्णवीने दिराला विचारल

काही नाही थोडा अशक्तपणा आला आहे म्हणाले. रिपोर्ट केले आहेत ते उद्या दुपारी मिळतील असं म्हणालेत

" बरं ठीक आहे." एवढं बोलून वैष्णवीने फोन ठेवला.

वैष्णवीने आईंना पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेल्याच नवऱ्याला सांगितलं. काही छोट्या मोठ्या टेस्ट करून डॉक्टारांनी त्यांना सोडलं


"हॅलो..हां विशाल अरे वैष्णीवीने सांगितलं मला आत्ताच. तुझा फोन आला तेंव्हा मी आंघोळीला गेलो होतो. बरं डॉक्टर काय म्हणालेत?" वैष्णवीच्या नवऱ्याने विचारलं.


"अरे काही नाही दादा. ईसिजी रिपोर्ट करायला सांगितले होते त्यांनी. रिपोर्ट लगेच दिले त्यांनी नॉर्मल आहेत. तिची थोडी धावपळ झाली ना म्हणून झालं असेल ते बाकी सगळं ओके आहे."वैष्णवीच्या दिराने सांगितलं


"बरं ठीक आहे. आई आता इकडे येतेय ना? वैष्णवीच्या नवऱ्याने विचारलं.

"नाही आता माझ्यासोबत येतेय मग संध्याकाळी पाठवतो तिकडे. तिची आधीची औषधं पण तिकडेच आहेत ना." वैष्णवीचा दिर म्हणाला.

"बरं ठीक आहे. चल मग आणि काही वाटलंच तर मला कॉल कर नाहीतर वैष्णवीला फोन कर. ओके चल बाय"


"हा हा सांगतो काही वाटलं तर."

क्रमशः
©®श्रावणी लोखंडे
0

🎭 Series Post

View all