टीम: श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
"संध्याकाळी सासूबाई घरी आल्या. खूपच थकलेला चेहरा. अंगात त्राण उरले नव्हते. पहिला माळा चढून येतांना पण त्यांना धाप लागत होती इतका अशक्तपणा आला होता.
"हे घ्या.. थोडं लिंबू पाणी पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. सर्दी पण आहे त्यामुळे जास्त दिलं नाही." वैष्णवी म्हणाली.
"मला जरा गरम पाणी करून ठेव हां.. औषधं घ्यायची आहेत. दुपारी जेवणानंतरची गोळी घ्यायची विसरली होती."सासूबाई म्हणाल्या.
"अशा कश्या गोळ्या विसरता. बघू इकडे कोणत्या गोळ्या आहेत!"गोळ्यांची पिशवी आणि त्यात असलेलं प्रिस्क्रीप्शन बघून त्याप्रमाणे गोळ्यांची पाकीट सेट करून वैष्णीवीने पुन्हा गोळ्यांच्या डब्ब्यात ठेवली.
"आता गोळी घेऊ नका खूप उशीर झाला आहे. संध्याकाळी लवकर जेवून घ्या आणि मगच गोळ्या घ्या. तोवर जरा पडा. मी संध्याकाळसाठी नाश्ता बनवते काहीतरी."वैष्णवी सासूबाईंना म्हणाली.
"बरं"
"हां हॅलो..बोला. अहो तुमचा फोन पाहिला पण आईंच्या गोळ्या बघत होते ना म्हणून फोन रिसिव्ह केला नाही."वैष्णीवीने संदर्भासहित स्पष्टीकरण देत नवऱ्याला सांगितलं.
"अगं पण मी कुठे काही विचारलं तुला. बरं ते सोड आई कधी आली इकडे?" विवेकने वैष्णवीच्या नवऱ्याने विचारलं.
"आत्ताच आल्यात. अर्धा तास तरी झाला असेल!" वैष्णवी म्हणाली
"बरं..ठीक आहे का ती आता?" विवेकने विचारलं.
"अम्म्म..आहेत तश्या ठीक. अशक्तपणा खूप आहे. लिंबू पाणी दिलं होतं मगाशी. आता पडल्यात थोडावेळ. बघू संध्याकाळी काय बोलतात.
"हम्म्म ठीक आहे. बघ लक्ष ठेव जरा तिच्यावर. काही खायला पाहिजे का विचार म्हणजे येताना घेऊन येतो."विवेक म्हणाला.
"कोण..तुम्ही घेऊन येणार? ते पण बाहेरून. काही गरज आहे का? एकतर त्यांना बरं नाहीये त्यात बाहेरचं खाणं कितपत चांगलं आहे. जरा पण कळत नाही." वैष्णवी जरा वैतागतच म्हणाली.
"अगं तसं नाही..म्हणजे जरा तोंडाला चव येईल."माती खाल्ल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलला पण पुन्हा माती खाल्ली त्याने हे त्याच्या लक्षात आलं आणि चूक सुधारण्यासाठी बोलणार तितक्यात..
"अच्छा... म्हणजे तोंडाला चव येण्यासाठी बाहेरून घेऊन येणार. याचा अर्थ माझ्या हाताला चव नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? की मी बनवते ते चविष्ट नसते असं म्हणायचं आहे?म्हणजे कितीही करा तरी बाहेरून आणतो हे बोलून दाखवणार यात काय आनंद मिळतो काय माहीत?की आम्ही किती काळजी घेतो असं दाखवायचं असते देव जाणे" वैष्णवी जरा रागातच म्हणाली.
क्रमशः
©® श्रावणी लोखंडे
क्रमशः
©® श्रावणी लोखंडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा