जलद लेखन
शेतकरी नवरा हवा गं बाई
भाग २
शेतकरी नवरा हवा गं बाई
भाग २
एके दिवशी दुपारी चहाच्या वेळी मनीषाने शरद जवळ शेखरच्या लग्नाचा विषय काढला.
"अहो, आता शेखर साठी मुलगी पाहायला हवी," आपले राजकुमार लग्नासाठी सज्ज आहेत.
"अहो, आता शेखर साठी मुलगी पाहायला हवी," आपले राजकुमार लग्नासाठी सज्ज आहेत.
"हो गं. सुरुवात करायला काही हरकत नाही."
पाहूया. एक दोन मुलींची माहिती आहे माझ्याकडे.पाहतो प्रयत्न करून
आणि हो तुला तर माहीतच आहे, अलीकडे शेतकरी मुलाशी लग्न करायला मुली नकार देतात. त्यांना मुलाकडे शेती हवी असते.पण शेतकरी मुलगा नको असतो. त्यामुळे खूप कठीण झालं आहे गं हल्ली.
आणि हो तुला तर माहीतच आहे, अलीकडे शेतकरी मुलाशी लग्न करायला मुली नकार देतात. त्यांना मुलाकडे शेती हवी असते.पण शेतकरी मुलगा नको असतो. त्यामुळे खूप कठीण झालं आहे गं हल्ली.
हो. तुम्ही म्हणता ते सुद्धा खरं आहे. पण त्यामुळे शेतकरी मुलांनी काय लग्न करायचं नाही कां? मनीषा म्हणाली.
अगं सगळा समजण्या समजण्याचा फरक आहे. मुलींनीही समजूतदारपणा घेतला पाहिजे. बघूया.
चल मी येतो शेतावर जाऊन. असे म्हणून शरद घराबाहेर पडला.
शेखर साठी वधूसंशोधन सुरू होतं.दोन-तीन वर्ष अशीच निघून गेली.
शेखर साठी वधूसंशोधन सुरू होतं.दोन-तीन वर्ष अशीच निघून गेली.
अशातचं एक मुलगी शेखर साठी सांगून आली. मुलीचे वडील शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांना शेती विषयी, शेतकरी मुलांविषयी जिव्हाळा होता. मुलीचे नाव शर्वरी. शर्वरी शिकलेली पदवीधर मुलगी होती. शरदने आपल्या आई-वडिलांचे आणि आपल्या भावांचे मत घेतले आणि शेखर व शर्वरीचे शुभमंगल पार पडले.
नव्या नवलाईचे दिवस निघून गेले. शर्वरी फारशी कोणात मिसळत नव्हती. सारखी आपल्याच विश्वात राहायची ती. तिचे म्हणणे असे होते की, मी माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार शेतकरी मुलाशी लग्न केले. इथे तर माझ्या शिक्षणाचा काहीचं उपयोग नाही.
नव्या नवलाईचे दिवस निघून गेले. शर्वरी फारशी कोणात मिसळत नव्हती. सारखी आपल्याच विश्वात राहायची ती. तिचे म्हणणे असे होते की, मी माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार शेतकरी मुलाशी लग्न केले. इथे तर माझ्या शिक्षणाचा काहीचं उपयोग नाही.
शेखर तिला समजावून सांगायचा. अगं शर्वरी माझ्या दोन्ही वहिनी खूप चांगल्या आहेत. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेचं असे नाही. तुला काही अडचण असेल तर निःसंकोचपणे आपल्या बहिणी समान जाऊबाईंना सांगत जा. पण शर्वरी ऐकायलाच तयार नव्हती. आता तर वारंवार शर्वरी शेखरजवळ वेगळा संसार थाटण्याबद्दल बोलू लागली.
एवढे वर्ष अगदी एकमेकांना जीव लावणारं आपलं कुटुंब.आता काय होणार? याची काळजी शेखरला वाटू लागली. तो शर्वरीला "कुटुंबाची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती" कशी असते. आई वडिलांचे आशीर्वाद, भावंडांचा जिव्हाळा मला सतत बळ देतो. तू समजून घे. पण या सर्व गोष्टी 'पालथ्या घागरीवर पाणी.' शर्वरी आपल्या मनासारखे वागत होती. तर देव- माणसं असलेल्या तिच्या सासू-सासऱ्याना हे सारं कल्पनेच्या पलीकडचं होतं.
आशा स्वयंपाक करता करता मनात विचार करत होती. खरंच आजकाल लग्नाची परिस्थिती विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुलांची परिस्थिती बिकट आहे.मुलींचा असा ग्रह असतो की ,शेतकरी मुलाशी लग्न झाल्यास एक तर खेड्यात राहावे लागेल. घरातील सर्व कामे करावी लागतील. सासू-सासऱ्यांना बघावं लागेल. त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी चालते.पण नोकरी करणाऱ्या मुलाकडे त्यांचा कल असतो.
आज कुटुंबे लहान आहे. एक मुलगा किंवा एक मुलगी क्वचित प्रसंगी दोन अपत्ये. त्यामुळे मुलं अगदी लाडात वाढलेली असतात. शिक्षणामुळे मुलींचे घरकामाकडे दुर्लक्ष होते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, संयुक्त कुटुंब पद्धतीत रुजणारी मूल्ये, आदर्श यांचा वस्तूपाठ पुढच्या पिढीकडे सरकतचं नाही आणि यामुळे नात्यांमध्ये असलेले प्रेम, एकमेकांप्रति काळजी, सन्मान यांचे धडे लहानपणापासून मिळतचं नसल्याने पौगंडावस्थेतील व युवावस्थेतील पिढीचा गोंधळ, एकाकीपणा वाढतो. त्यामुळे जगण्याच्या व्याख्याच बदलू लागल्या आहेत.
तेवढ्यात शेखर घरी आला. "वहिनी शर्वरी कुठे आहे दिसत नाही."
काय हो भाऊजी, आल्या आल्या लगेच शर्वरी शर्वरी. आशा वहिनीने शेखरची फिरकी घेतली.
काय हो भाऊजी, आल्या आल्या लगेच शर्वरी शर्वरी. आशा वहिनीने शेखरची फिरकी घेतली.
तसं नाही हो वहिनी, मी शेतात गेलो तेव्हा ती जरा रागातच होती.
बरं बघतो मी. झोपली असेल बेडरूम मध्ये. म्हणत शेखर बेडरूममध्ये गेला.शर्वरी झोपली होती. शर्वरीचे डोळे रडून रडून सुजलेले त्यांने पाहिले. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे शेखरने ओळखले. तिला अगदी प्रेमाने जवळ घेऊन तो तिला म्हणाला, शर्वरी, आपण निश्चितच यावर काहीतरी तोडगा काढू. तू चार दिवसासाठी माहेरी जाऊन ये. असे म्हणून शेखरने शर्वरीला माहेरी पाठवले.
पुढील भाग अवश्य वाचा.
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा