जलद लेखन
शेतकरी नवरा हवा गं बाई
भाग १
शेतकरी नवरा हवा गं बाई
भाग १
चलता कां हो जाऊबाई? आपण मंदिरात जाऊन येऊ लवकर. मामंजी जेवायला येतीलच आता. तोपर्यंत आपण मंदिरातून यायला हवं.
आशा थोरल्या जाऊबाई मनीषाशी बोलत होती.
आशा थोरल्या जाऊबाई मनीषाशी बोलत होती.
हो गं आशा चल. आज श्रावण सोमवार. महादेवाला बेल वाहून येऊ. असं म्हणत दोघीही मंदिरात जायला निघाल्या.
एका खेडेगावातील हे तीन भावांचं संयुक्त कुटुंब. भरपूर शेती. घरचं वातावरण अत्यंत धार्मिक. घराच्या शेजारीचं शंकराचे मंदिर. घरातील सर्व मोठी मंडळी सासू-सासरे, सुना, मुलं मंदिरात दर्शन करून आल्याशिवाय जेवत नसत. सासरे जेवायला येण्याच्या आधी आशा व मनीषा मंदिरात जाऊन बेल वाहून आल्या.
कां गं आशा, आपण खरंच भाग्यवान आहोत. आपल्यावर मुलीसारखं प्रेम करणारे सासू-सासरे आपल्याला मिळाले.
हो. खरंच आपण भाग्यवान आहोत. मनीषा म्हणाली.
आता आपले लहान-दीर शेखरलाही अगदी मनासारखी बायको मिळाली म्हणजे झालं.
अहो वहिनी, ऐकतोय मी बरं कां तुमचं संभाषण. मलाही मनासारखी बायको मिळणारचं. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत की माझ्यावर.
हो शेखर. म्हणतात नां "स्त्री घराला स्वर्ग बनवते" आपण सर्वजण किती अगदी गुणागोविंदाने राहतो. छान वाटतं नां? सर्वजणांना आपल्या कुटुंबाविषयी हेवा वाटतो बघा.
शरद ,शुभम् आणि शेखर तिघे भाऊ. दोघांची लग्न झालेली. तिन्ही भाऊ शेतीत राबायचे. अगदी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करण्याकडे तिघांचाही कल. शेतीत उत्पन्नही त्यामुळे भरपूर व्हायचे. शेतीच्या पिकांवर आणखी शेती घेऊन त्यांनी शेती वाढवली होती.
आशा, आज पहिला श्रावण सोमवार. आज काहीतरी गोड व्हायलाच हवे. बासुंदीचा बेत करायचा कां?
हो करू या की बासुंदी. मनीषा म्हणाली.
अगं पण दुध मिळेल कां वेळेवर? त्यापेक्षा पुरणपोळी करूया. सासुबाई व मामजींना पुरणपोळी खूप आवडते. तुला माहीतच आहे.
बरं बरं जाऊबाई. म्हणत आशा स्वयंपाक घराकडे वळली.
दोघींनी मिळून भराभर स्वयंपाक केला. सासूबाईंची पूजा आटोपली होती. तेवढ्यात मामंजी ही आले. आपल्या सासू-सासऱ्यांना जेवायला वाढून आशा व मनीषा आपल्या पती देवांची वाट पाहत बसल्या.
दोघींनी मिळून भराभर स्वयंपाक केला. सासूबाईंची पूजा आटोपली होती. तेवढ्यात मामंजी ही आले. आपल्या सासू-सासऱ्यांना जेवायला वाढून आशा व मनीषा आपल्या पती देवांची वाट पाहत बसल्या.
थोड्यावेळाने शरद, शुभम ही घरी आले. पाठोपाठ शेखरही आला. हसत खेळत सर्वांचे जेवणं आटोपली.
जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून तिघेही भाऊ, वडील एकत्र बसून शेतात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पद्धतीने कशी शेती करायची यावर चर्चा करत. शेखरला तर शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची भारी आवड. तो सतत शेतीमध्ये विविध पिकांसाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहायचा. त्यामुळे शेतात भरघोस उत्पादन व्हायचे.
पुढील भाग अवश्य वाचा.
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा