जलद लेखन
शेतकरी नवरा हवा गं बाई
भाग ३
शेतकरी नवरा हवा गं बाई
भाग ३
शर्वरी माहेरी आली आणि आल्या आल्या आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागली.
तिचे वडील सदाशिवराव अवाक् झाले.
तिचे वडील सदाशिवराव अवाक् झाले.
"अगं शर्वरी रडू नकोस. शांत हो आणि काय झालं ते आधी मला सर्व सांग."
शर्वरीने आजपर्यंत ज्या गोष्टी मनात ठेवल्या होत्या, त्या सर्व तिच्या वडिलांजवळ व्यक्त केल्या.
सदाशिवरावांनी अगदी शांतपणे तिचे सर्व बोलणे ऐकून घेतले.
आणि मनात विचार केला.आता ही सर्व परिस्थिती अतिशय संयमाने हाताळायला हवी.
सदाशिवरावांनी अगदी शांतपणे तिचे सर्व बोलणे ऐकून घेतले.
आणि मनात विचार केला.आता ही सर्व परिस्थिती अतिशय संयमाने हाताळायला हवी.
त्यांनी शर्वरीला विश्वासात घेतले.
आणि तिला सांगू लागले. अगं शर्वरी आईविना लेक तू . तुझ्याकडे पाहून मी दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी मनात आणला नाही. आज तुला आईसारखे प्रेम करणारी सासू मिळाली. बहिणींसारखे प्रेम करणाऱ्या जावा मिळाल्या. एकंदरीत
तुझ्या घरचे सर्व लोक विचाराने अतिशय चांगले आहेत. तू नक्कीच तिथे सुखी राहू शकशील. असा मला पूर्ण विश्वास होता. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा संबंध जुळवला. आणि मला आजही याची खात्री आहे की, तू तिथे नक्कीच सुखी राहशील.
आणि तिला सांगू लागले. अगं शर्वरी आईविना लेक तू . तुझ्याकडे पाहून मी दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी मनात आणला नाही. आज तुला आईसारखे प्रेम करणारी सासू मिळाली. बहिणींसारखे प्रेम करणाऱ्या जावा मिळाल्या. एकंदरीत
तुझ्या घरचे सर्व लोक विचाराने अतिशय चांगले आहेत. तू नक्कीच तिथे सुखी राहू शकशील. असा मला पूर्ण विश्वास होता. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा संबंध जुळवला. आणि मला आजही याची खात्री आहे की, तू तिथे नक्कीच सुखी राहशील.
अगं जरा समजून घे, दरवर्षी कितीतरी विद्यार्थी कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर पडतात. प्रत्येकाला नोकरी मिळेलचं असं नाही. मग कमी पगारावर नोकरी करताना त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्यापेक्षा घरच्या शेतीकडे वळण्यात कमीपणा न मानता, त्या शेतीमध्ये नवे प्रयोग, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाऊ शकते आणि विशेष म्हणजे तो या जमिनीचा मालक असतो. ही सर्वात मोठी जमेची बाजू. शेतात पीक होत नाही, अशी ओरड करण्यापेक्षा पारंपारिक शेतीऐवजी जरा वेगळ्या पद्धतीने शेती करण्यात अधिक फायदा आहे.
आज तुम्ही मुली,स्रिया विविध क्षेत्रात पारंगत आहे. तुम्ही 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणण्यापेक्षा शेतकरी मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरला पाहिजे. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला पाहिजे.
सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, फुल शेती नक्कीच तुम्ही महिला चांगल्या रीतीने करू शकता. हे क्षेत्र आपले नाही असे म्हणण्यापेक्षा आज मी हेही नक्कीच करू शकते असा आत्मविश्वास तुम्ही स्त्रियांनी मुलींनी दाखवायला पाहिजे. म्हणजे दोघे मिळून उत्तम शेती करू शकतील.
तुम्हाला नव्या व्यवसायाची दिशा दाखवली, याबाबत योग्य प्रशिक्षण दिले आणि तांत्रिक, आर्थिक मदत केली तर कोणताही प्रयोग तुम्ही यशस्वीपणे करून दाखवाल याची मला खात्री आहे. फक्त तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. त्यात आवड निर्माण करायला पाहिजे. हे मात्र तितकेच खरे आहे.
सेंद्रिय शेती हा मुलींसाठी, महिलांसाठी उत्तम पर्याय आहे. आज भाजी, फळे, धान्य रसायनाच्या अतिवापरामुळे दूषित झाले आहे. आपल्या जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण किती आहे? त्यासाठी किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे? ही खते रासायनिक पद्धतीने द्यावीत कां? की अन्य काही उपाय आहे? यावर विचार मंथन व्हायला हवे. सरळ सरळ कृषी केंद्रावरून एकमेकांच्या सांगण्यावरून खते आणली जातात आणि जमिनीत अयोग्य पद्धतीने टाकली जातात. त्यामुळे काय होतं की पुढच्या पिढीच्या हाती असंच जमिनीचं बिघडलेलं आरोग्य जात राहतं.
म्हणून जमिनीतलं 'सेंद्रिय कर्ब', त्यातील सूक्ष्म जीवांची हालचाल वृद्धिंगत करून तिला सुपीकतेच्या स्थितीत आणलं जावं आणि ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके वापरण्याऐवजी नैसर्गिक खते, कीड नियंत्रणाचे उपाय हवे. मुलींनी, महिलांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने जाऊन शेती संबंधित तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवे.
यासाठी कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळाचा वापर केला जाऊ शकतो. याची माहिती माझ्यापेक्षा तुला अधिक असेल म्हणून जरा वेगळ्या दृष्टीकोनातून बघ. खरोखरचं अशी पावलं उचलणं गरजेचे आहे. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे सूत्र होते. त्याचं आज उत्तम नोकरी असं समीकरण आहे. त्यामुळे प्रत्येक उपवर मुलीचा 'मला नोकरीवाला नवरा मिळाला पाहिजे' याकडे कल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात नांदायला सून मिळणे कठीण झाले आहे.
शेतकरी मुलाला बायको मिळणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या लग्नाळू मुलांची लग्ने लांबत आहेत. त्यांचे लग्नाचे वय वाढत चालले आहे. काही ठिकाणी तर अनेकांनी लग्नाची आशाच सोडून दिली आहे. म्हणूनचं मुलींचा शेती संबंधित तंत्रज्ञान शिकण्याकडे कल वाढला पाहिजे. जेणेकरून पती-पत्नी दोघेही शेतीत नवनवीन प्रयोग करून पिके घेतील व हळूहळू 'शेतकरी मुलगा नको गं बाई' म्हणण्याऐवजी 'शेतकरी मुलगा हवा गं बाई' असं नक्कीच होऊ शकेल.
शर्वरी अगदी शांत डोक्याने या सर्व गोष्टी ऐकून घेत होती. तिलाही हळूहळू आपल्या वडिलांचे म्हणणे पटत होते. विनाकारण आपण असे वागत होतो. खरोखरच आज माझ्या वडिलांनी माझे डोळे उघडले.
शर्वरी अगदी शांत डोक्याने या सर्व गोष्टी ऐकून घेत होती. तिलाही हळूहळू आपल्या वडिलांचे म्हणणे पटत होते. विनाकारण आपण असे वागत होतो. खरोखरच आज माझ्या वडिलांनी माझे डोळे उघडले.
खरंचं वडील म्हणतात त्या प्रमाणे माझ्या घरचे सर्व लोक अतिशय चांगले आहेत. मीच चुकत होते. हे आज माझ्या लक्षात आलं आहे. खरोखरचं आपण चुकलो. तिने लगेच शेखरला फोन लावला. झाल्या प्रकाराची माफी मागितली. शेखरनेही आनंदाने तिला माफ केले.
घरातल्या सर्वांना हे ऐकून खूप आनंद झाला. लगेच शर्वरीला तिच्या वडिलांनी तिच्या सासरी पोहोचवून दिले.
घरातल्या सर्वांना हे ऐकून खूप आनंद झाला. लगेच शर्वरीला तिच्या वडिलांनी तिच्या सासरी पोहोचवून दिले.
चला मुलींनो घेऊया आपण
शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे धडे
आणि शेतीला पुन्हा नेऊ या
नव्या प्रगतीच्या दिशेकडे...
शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे धडे
आणि शेतीला पुन्हा नेऊ या
नव्या प्रगतीच्या दिशेकडे...
शेतकरी मुलाचा करा विचार
नका जाऊ देऊ त्याला नैराश्याकडे
करा तुमच्या शिक्षणाचा उपयोग
आणि गिरवा नव्या शिक्षणाचे धडे.
नका जाऊ देऊ त्याला नैराश्याकडे
करा तुमच्या शिक्षणाचा उपयोग
आणि गिरवा नव्या शिक्षणाचे धडे.