शेवटची इच्छा (भाग - एक)

ही एक रहस्यमय लघुकादंबरी आहे नक्की वाचा


शेवटची इच्छा… (भाग - एक)

ही एक काल्पनिक कथा आहे हिचा कुठल्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही तरी संबंध आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा

अनुराधा ;

"आमच्या लग्नाला जेम तेम पाच सहा दिवसच झाले होते. ऋग्वेद नवीन बंगला विकत घेतला होता त्याला जुन्या वस्तू जमा करण्याची खूप आवड होती. म्हणून लग्न होताच आम्ही त्या जुनाटश्या पण पहिल्यांदा पाहता क्षणी कुणाला ही आवडेल अश्या त्या बंगल्यात शिफ्ट झालो.
वर करणी बघता तो बंगला खूपच जुनाट वाटत असला तरी तिथे नुकतच कुणीतरी राहून गेल असाव अस मला जाणवत होत. पण नवीन लग्न झाल होत नुकताच नवीन संसार देखील सुरु होणार होता म्हणून मनातली शंका मी मनातच ठेवली आणि ऋग्वेद च्या आनंदात सहभागी झाले.
खर तर पुढच्या क्षणी किंवा भविष्यात काय लिहून ठेवलय हे आपण कधीच सांगू शकत नाही. माझ्या ही बाबतीत असच काहीस घडल पण ते काय ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझ्या बद्दल जाणून घ्यावं लागेल. माझं नाव अनुराधा आणि मी येतीये लवकरच तुमच्या भेटीला."

अनुराधा बंगलो…
वेळ सकाळी 10 वाजताची…
बंगल्याचा सेक्युरिटी गार्ड रामप्रसाद सिगारेट फुकत ऋग्वेद ची वाटच बघत बसला होता. तेवढ्यात एक नेक्सन कार दारा जवळ येऊन थांबली कार ला बघताच रामप्रसाद ने दरवाजा उघडला तस ऋग्वेद ची कार बंगल्याकडे भरदाव निघून गेली. त्यावेळी अनुराधा नवीन घर बघायला आपल्या मनाप्रमाणे सजवायला खूपच उत्साहित होती. तिला माहीत ही नव्हतं ज्या घराला सजवण्याचे ती स्वप्न बघत आहे ते घर पुढे तिला काय काय दाखवणार आहे.
ऋग्वेद ची कार घराजवळ आलेली समजताच तिथल्या मोलकरीण कृष्णाबाई आणि रामदिन लगेच स्वागताला हजर झाले. कृष्णाबाईंनी अनुराधाच्या गृहप्रवेशाची तयारी देखील केली होती.
कृष्णाबाई या ऋग्वेदच्या फक्त एक मोलकरीण नव्हत्या तर त्यांनी ऋग्वेद ला आपल्या पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलं होत. म्हणून कृष्णाबाईंना आपल्या धाकल्या मालकाच सगळ चांगलं व्हावं अस वाटत होत आणि म्हणून त्या ही त्या बंगल्यात राहायला आल्या होत्या.
रामदिन ने गाडीतून सामान काढल आणि ड्रायव्हर सुरेशला गाडी पार्क करायला लावली व तिघे बंगल्याच्या मुख्य दरवाज्या समोर येऊन थांबले.
अनुराधा आणि ऋग्वेदच लग्न खूपच घाई गडबडीत झाल होत. त्यामुळे त्यांना कसलीच नीटशी तयारी करता आली नव्हती. काही जवळच्याच लोकांना बोलावून त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न आटपल होत.
अनुराधा आणि ऋग्वेद दोघही उच्च शिक्षित व नवीन विचारांचे होते त्यामुळे त्यांचा विधी संस्कार पूजा अर्चना यांवर फारसा विश्वास नव्हता.
त्यांच म्हणणं होतं. "विधीवत लग्न करणे म्हणजे नुसता पैशांचा अपव्यय." म्हणून दोघांनी एकमत करून रजिस्टर लग्न करण्याच ठरवल. आणि ते छान पार ही पडल.
पण या लग्नासाठी घरच्यांनी सत्यनारायण पूजा करण्याची अट घातली होती. शेवटी ती अट मान्य करून व पूजा करून दोघ नवीन घरात शिफ्ट झाले.
अनुराधा घरात पाऊल टाकणार तेवढ्यात कृष्णाबाई म्हणाल्या…
"ताई साहेब, थांबा जरा या घरात तुम्ही पहिल्यांदाच प्रवेश करत आहात आधी माप तर ओलांडा मग या घरात."
दोघ ही एकमेकांकडे बघू लागतात. लगेच कृष्णाबाई अनुराधाला ओवाळतात व म्हणतात.
"हं, आता या कलशाला आतून उजव्या पायाने हळूच धक्का द्या आणि माप ओलांडून घरात प्रवेश करा."
अनुराधा सांगितल्या प्रमाणे माप ओलांडून घरात प्रवेश करते. तेवढ्यात रामदिन येतो.
"साहेब तुमचं सामान."
ऋग्वेदच सामान ठेऊन रामदिन निघून जातो.
इकडे अनुराधा आपल्या नवीन संसाराची कल्पना मनात रंगवत नवीन घर बघण्यात मग्न होते. व कृष्णाबाई चहा बनवायला निघून जातात.
ऋग्वेदही अनुराधा बरोबर आपल नवीन घर बघण्यात मग्न होतो.
अनुराधा घराच्या प्रत्येक भिंतीला स्पर्श करत नवीन संसाराची स्वप्ने रंगवत असते. तेवढ्यात ऋग्वेद मागून येत तिला विचारतो.
(अनुराधाला जवळ ओढत) "मग, कस वाटलं आपलं नवीन घर?"
अनुराधा थोडस लाजून म्हणते.
(स्मित हास्य करत) "मी विचार देखील केला नव्हता मला अश्या सुंदर घरात राहायला मिळेल खूप सुंदर आहे आपलं घर. (थोडस थांबून) अं, पण एका गोष्टीची कमी आहे."
ऋग्वेद अनुराधाच बोलण ऐकून विचारातच पडतो आणि तीला विचारतो.
"कमी? कसली कमी?"
ती थोडीशी हसते आणि म्हणते.
"हे घर आपल्या दोघांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. मग याला फक्त माझच नाव का ? आपल्या दोघांचं नाव का नाही. (थोडासा विचार करून). अं, आपण घराला \"अनुवेद\" नाव दिल तर? अनुराधाच अनु आणि ऋग्वेदच वेद. \"अनुवेद\""
"अनुवेद" ऋग्वेद मनात विचार करतो आणि एक स्मित हास्य करून म्हणतो.
"खूप छान नाव आहे हे हेच नाव देउ या घराला"
दोघ ही एकमेकांकडे बघतात आणि एकमेकात हरवून जातात.
पुढे काय होणार : नवीन लग्न नवीन अनोळखी जागा आणि त्यात एक रहस्य अनुराधा त्या नवीन घरात ऍडजस्ट होईल का? बघूत पुढील भागात

🎭 Series Post

View all