स्पर्धा
रेसिपी
रेसिपी
शेवगा ही बहु गुणकारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कारण या झाडांची मुळे, खोड, फांद्या,पाने, फुले हे सर्वच भाग अतिशय उपयुक्त आणि लाभदायक आहेत. या भाजीचा कोणताच भाग टाकाऊ नाही. आयुर्वेदिक शास्त्रात शेवग्याला फार महत्त्व आहे. साधारण ३०० प्रकारच्या लहान मोठ्या आजारांवर ही भाजी गुणकारी असल्याचा दावा केला जातो. म्हणूनच औषधी गुणांची खाण असलेली ही भाजी नियमित सेवन करणे हितकारक आहे. शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषक तत्वे असतात. म्हणून शेवग्याच्या झाडांची पाने उन्हात वाळवून ऐनवेळी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. शेवगा वर्षभर उपलब्ध असतो. सांबार, आमटी, कढी यात घातलेली शेवग्याची शेंग पदार्थांची लज्जत वाढवते. शिवाय भाकरी, भाजी, पराठे, सूप, वरण, भजी, चटणी, थालीपीठ यात शेवग्याच्या पानांचा उपयोग आपण करू शकतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये व पानांमध्येही अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे यात प्रोटीन, अमिनो अॅसिड, बीटा कॅटरीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम इत्यादी अनेक पौष्टिक घटक आढळतात. शेवग्याच्या आयुर्वेद शास्त्र महत्वानुसार अलीकडे
शेवग्याची वनशेती केली जाते. किंवा शेताच्या कुंपणाला किंवा शेताच्या बांधावर शेवगा लावला जातो. शेवग्याच्या फुलांची भाजी तर खूपच स्वादिष्ट होते. शेवग्याच्या शेंगांचे सूप खूप पौष्टिक असते. असा हा बहुगुणी शेवगा कधी कधी दुर्लक्षित असतो. फक्त उन्हाळ्यात याचे सेवन कमी करावे.

शेवग्याच्या पानांची भाजी
साहित्य
एक पाव किंवा तुम्हाला लागतील तेवढी शेवग्याची पाने, भिजवलेली मुगडाळ किंवा हरभरा डाळ, फोडणीसाठी मोहरी, तेल तिखट, हळद, मीठ, आले लसूण पेस्ट.
साहित्य
एक पाव किंवा तुम्हाला लागतील तेवढी शेवग्याची पाने, भिजवलेली मुगडाळ किंवा हरभरा डाळ, फोडणीसाठी मोहरी, तेल तिखट, हळद, मीठ, आले लसूण पेस्ट.
कृती
शेवग्याची पाणी स्वच्छ धुऊन चिरून घ्या. कढईत तेल घालून कांदा मंद आचेवर तळून घ्या. नंतर त्यात तिखट, हळद, लसूण पेस्ट घाला व भिजवलेली मूग डाळ किंवा हरभरा डाळ घाला. ही डाळ मंद आचेवर चांगली शिजू द्या. शिजत आली की शेवग्याची चिरलेली पाने किंचित साखर व चवीनुसार मीठ घालून परत चांगली वाफ येऊ द्या. व चपाती किंवा भाकरी बरोबर खायला घ्या अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते. आपण चवळीची किंवा मेथीची भाजी करतो त्याप्रमाणे ही भाजी आहारात ठेवावी. याच शेवग्याच्या पानांना मेथीच्या पानांप्रमाणे डाळीचे पीठ लावून आपण करू शकतो.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा