Login

शेवटचा कॉल... भाग - २

शेवटचा कॉल सगळं उघड करतो, खरा गुन्हेगार तोच नव्हता ज्याच्यावर सगळ्यांचा संशय होता. सत्याचा चेहरा शेवटी सर्वांना थरारून सोडतो.
शेवटचा कॉल... भाग - २


फॉरेन्सिक टीमने दोघांचे DNA, बोटांचे ठसे, चेहऱ्याचे बायोमॅट्रिक्स, सगळं तपासून पाहिलं.

दोघेही १००% जुळणारे, अशक्य.
मानवी जीवशास्त्राच्या दृष्टीने जवळजवळ असंभव.

सोनम म्हणाली, “सर, हे साधं क्लोनिंग नाही. हे… दुसऱ्या पातळीचं विज्ञान आहे.”

देशमुखने कपाळावर हात ठेवला, “मग कबीर कोण? तो तिसरा आहे?”

सोनम शांतपणे म्हणाली, “कबीर आपल्याला दोघांमध्ये गोंधळ करून देतोय. खरा कबीर… अजून बाहेर आहे.”

दुसऱ्या दिवशी सकाळी, त्यांना दोघांनाही वेगळं चौकशीसाठी नेलं. आर्यन–१ (जो पहिला पकडला गेला) म्हणाला, “मी पोलीस आहे. माझं आयडी कार्ड माझ्या घरात आहे. तुम्ही जाऊन तपासा.”

आर्यन–२ (जो वेअरहाऊसमध्ये बांधलेला सापडला) म्हणाला, “माझं आयडी कार्ड कबीरने चोरलं. तो माझा आयडी वापरत असे.”

दोघेही विश्वासार्ह, दोघेही शांत, दोघेही हुशार.
पण चूक एकाने केली.

देशमुखने अचानक विचारलं, “तुझी आई कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात अॅडमिट होती?”

आर्यन-१ थोडासा थांबला, डोळ्यात हलका पोकळपणा.
“कोकिलाबेन… हॉस्पिटल… बहुतेक…”

देशमुखने काहीही न बोलता त्याची फाईल बंद केली.
कारण… आर्यनची आई १० वर्षांपूर्वीच मरण पावली होती.

आर्यन–२ ची चौकशी केली तेव्हा त्याने काही धक्कादायक सांगितलं.

“कबीरला तुला मानसिकरीत्या मोडायचं होतं. त्यासाठी त्याने एक ‘आर्यन प्रतिमा’ तयार केली. जी लोकांना दिसेल… आवाज ऐकू येईल… पण तू नसेल.”
देशमुख चकित झाला. “म्हणजे तू असा म्हणतोयस की तो डुप्लिकेट म्हणजे कबीरचा तयार केलेला बायो–फेस आहे?”

आर्यन–२ शांतपणे म्हणाला—
“तो मी नाही. आणि मी… मीच खरा आर्यन आहे.”

देशमुखला आता खात्री वाटू लागली, खरा आर्यन आर्यन–२ आहे. पण एका तासानंतर कथा उलटी झाली.

पोलिस स्टेशनमध्ये अचानक दिवे गेले. सर्व CCTV बंद झाले, सर्व्हर क्रॅश.

देशमुख ओरडला, “सिक्युरिटी! सर्व बॅरकेड बंद करा!”

तेवढ्यात मोठ्या स्क्रीनवर एक संदेश झळकला,
“LEVEL-1 ACCESSED”
“PROJECTION: ARYAN-SYSTEM”
सगळे हादरले. नंतर स्क्रीनवर कबीरचा चेहरा दिसला.

हसत, “तुम्ही पाहताय ते ARYAN PROJECT आहे.
माझं आयुष्यभराचं काम.”

त्याच्या मागे अंधारात काही काचेच्या टाक्या दिसत होत्या. त्यात मानवी आकृत्या.

काही पूर्ण, काही अपूर्ण, काही आर्यनसारखेच.

कबीर म्हणाला,
“आर्यन… माझा ‘परफेक्ट मॉडेल’.
शक्ती, बुद्धी, भावना, आणि न्यायाची भावना, सगळं संतुलित.”

“मी एकच बनवला होता, पण निसर्गाने खेळ खेळला.”

“दोन तयार झाले.” स्क्रीन अचानक बंद झाला.

या गोंधळात दोन्ही "आर्यन" त्यांच्या कोठड्यांमधून पळून गेले, कसे?

ते कोणीच सांगू शकत नाही. CCTV मध्ये दिसत होतं,

आर्यन–१ एका कोठडीतून बाहेर पळतोय.
आणि दुसरा CCTV मध्ये, आर्यन–२ वेगळ्या दिशेने पळतोय. सगळे थक्क झाले.

ते दोघे एकमेकांना भेटलेत का? ते माहित नव्हतं.

संध्याकाळी ७ वाजता एक तातडीचा कॉल आला,
ठाण्याच्या जंगलात एक जळलेली कार सापडली.

स्टेअरिंगवर बसलेला मृतदेह पूर्ण भाजलेला.

पण सीट बेल्टला अडकलेलं पेंडंट‌ “A.S.”

देशमुख तडाखा देत म्हणाला, “कुठला आर्यन?? कोण मेलं??” फॉरेन्सिक प्रमुख सोनमने तपास केला.
आणि तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती दिसली.

“सर…मृतदेहावर एकही DNA नाही, जणू शरीर… कुणाचंच नाही, ते synthetic आहे.”

देशमुख मागे हटला. “म्हणजे… हा खरा आर्यन नाही?
की नकलीही नाही?”

सोनम म्हणाली, “कबीरने आणखी एक पोलीस आर्यन तयार केला होता."

त्या सार्‍या गोंधळात एका लॅपटॉपवर एक व्हिडिओ मिळाला. त्यात आर्यन–१ आणि आर्यन–२ दोघेही दिसत होते.
दोघेही कॅमेऱ्याकडे पाहत. दोघेही एकच वाक्य म्हणत,
“कबीरचं काम अजून संपलेलं नाही.” नंतर प्रकाश चमकला आणि दोघांपैकी एकाने दुसऱ्याचा गळा दाबायला सुरुवात केली.

कोण कोणाला? ते दिसेपर्यंत व्हिडिओ बंद झाला.

एका आठवड्याने…

पुण्यातील हडपसरमध्ये एका CCTV मध्ये एक माणूस कॅमेऱ्यात दिसला, आर्यन–१.

त्याच संध्याकाळी, नाशिक रोडवर दुसरा CCTV, आर्यन–२.
देशमुख हतबल झाले.
सोनम म्हणाली
“कबीरचा प्रयत्न एकच, खरा आणि नकली यांच्यात सीमा मिटवणं. जो पर्यंत आपल्याला कबीर सापडत नाही…
तो पर्यंत, आर्यनची ओळख कायम गोंधळात राहील.”

देशमुख कुजबुजला, “आणि मग? पुढे काय?”

सोनम थरथरत्या आवाजात म्हणाली, “पुढे?
कबीर म्हणाला होता ना,‘खेळ फक्त सुरू झालाय…’
त्या दोघांचे ठसे आता भारतात अनेक ठिकाणी दिसतायत.”
“याचा अर्थ…कदाचित…दोघांच्याही पाठीमागे…
कबीर अजून जिवंत आहे.”