शेवटचा साक्षीदार
रात्रीचे बरोबर अकरा वाजले होते. मुंबईच्या शिवडी पोर्टवरून धुकं हळूहळू शहराकडे सरकत होतं. त्या धुक्यातून एक काळी SUV शांतपणे उतरत होती. रात्रीच्या अंधारात ती कार आणखीच भयाण वाटत होती. पोर्टच्या कोपऱ्यातील गोडाऊन नंबर 17 च्या जवळ येऊन कार थांबली. दार उघडले… आणि बाहेर उतरली इन्स्पेक्टर अनाया देसाई, क्राईम ब्रांचची सर्वात तरुण पण तितकीच तेजस्वी अधिकारी.
आजची रात्र साधी नव्हती. तिला मिळालेल्या एका अज्ञात फोनकॉलने संपूर्ण पोलीस विभाग हादरला होता.
“आज… गोडाऊन 17 मध्ये… तुम्हाला तुमच्या सर्व केसचं उत्तर मिळेल,” एवढंच त्या आवाजाने म्हटलं होतं.
सहा महिन्यांपासून अनाया एका मालिकाहत्यारा (serial killer), “द सायलेंट रीपर”, च्या मागावर होती. मुंबईला हादरवणाऱ्या त्या पाच खुनांमध्ये एकही पुरावा नव्हता. हातात मिळायचा तो फक्त हरवलेला वेळ, आणि मृत देहावर पडलेली लाल रंगाची एकच पेन्सिलची खूण.
त्या खूणांचा अर्थ अजूनही अनाया उलगडू शकली नव्हती.
आज मात्र त्या आवाजातील आत्मविश्वास वेगळाच होता. जणू कुणीतरी आतून जाणून-बुजून तिला काही मोठ्या गोष्टीकडे नेत होतं.
अनाया गोडाऊनच्या मोठ्या लोखंडी दरवाजासमोर उभी राहिली. हातात पिस्तुल, डोळे तीक्ष्ण. तिने हळूच दरवाजा ढकलला… आणि आत पूर्ण शांतता.
फक्त कोपऱ्यात लुकलुकणारा एक पिवळसर बल्ब.
समोर एक लाकडी टेबल होता. त्यावर एक लाल पेन्सिल आणि त्याखाली एक फोल्ड केलेला कागद.
अनायाचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. तिने तत्परतेने कागद उघडला, त्यावर लिहिलं होतं:
“तुझ्या सर्व केसचं उत्तर या गोडाऊनमध्येच आहे. पण आधी… तुझ्याच जवळच्या माणसाला वाचव."
खाली एक पत्ता दिलेला होता, वरळी कोस्टल रोड, ब्लॉक 3, फ्लॅट 504.
खाली एक पत्ता दिलेला होता, वरळी कोस्टल रोड, ब्लॉक 3, फ्लॅट 504.
अनाया दचकली. हा कोण? तिला कुणाला वाचवायला सांगतायत? आणि तोही तिच्या जवळचा माणूस?
तिने लगेच वायरलेसवर संदेश पाठवला:
“सगळे युनिट्स तयार ठेवा. मी वरळीला जात आहे.”
“सगळे युनिट्स तयार ठेवा. मी वरळीला जात आहे.”
गाडी रॉकेटसारखी निघाली.
फ्लॅट 504 चं दार किंचित उघडं होतं.
अनायाने सावधपणे आत प्रवेश केला.
अनायाने सावधपणे आत प्रवेश केला.
घर पूर्ण रिकामं. एकही फर्निचरचा मागमूस नाही. पण हॉलच्या मध्यभागी एका खुर्चीला बांधलेलं एक व्यक्तीचं आकृतीसारखं काहीतरी दिसत होतं.
ती जवळ गेली तसं तिला जाणवलं, ते खऱ्या माणसाचं शरीर नव्हतं, तो एक पुतळा होता.
पुतळ्याच्या गळ्यात एक कार्ड टांगलेलं होतं.
त्यावर लिहिलं होतं:
“तू जे शोधत आहेस, ते तुझ्या दृष्टीसमोर आहे… पण सत्याकडे बघण्याचं धाडस तुझ्यात नाही.”
त्यावर लिहिलं होतं:
“तू जे शोधत आहेस, ते तुझ्या दृष्टीसमोर आहे… पण सत्याकडे बघण्याचं धाडस तुझ्यात नाही.”
अनाया चिडली. तिने कार्ड उलटवलं… आणि तिथून एक USB ड्राइव्ह खाली पडली.
ड्राइव्ह लॅपटॉपला लावताच स्क्रीनवर एकच व्हिडिओ उघडला. धूसर, पण ओळखीचं वातावरण, गोडाऊन 17.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उभा होता. चेहरा मास्कने झाकलेला. हातात लाल पेन्सिल.
त्या व्यक्तीने कॅमेराकडे पाहिलं आणि म्हणाला:
“अनाया… तुला माहित आहे का तू कोणाचा शोध घेत आहेस? सायलेंट रीपर हा तुला माहित असलेला व्यक्ती आहे. आणि या केसचा पुढचा बळी… तू स्वतः आहेस.”
व्हिडिओ कट झाला.
अनाया एक क्षण निश्चल झाली.
अनाया एक क्षण निश्चल झाली.
कुणी तिला एवढं जवळून कसं ओळखतंय? एवढ्या खात्रीनं तिच्याशी बोलतंय?
त्या क्षणाला तिच्या फोनवर मेसेज आला:
“वेळ संपत चालली आहे. परत गोडाऊन 17 मध्ये जा.”
“वेळ संपत चालली आहे. परत गोडाऊन 17 मध्ये जा.”
अनाया पुन्हा गोडाऊनमध्ये आली तेव्हा आतला पिवळा बल्ब आधीच बंद पडला होता. केवळ मोबाईलचा फ्लॅश वापरून ती आत चालत होती.
मग अचानक, तिच्या पायाला काहीतरी ओलं लागलं.
तिने फ्लॅश खाली मारला. ताजी रक्ताची रेषा गोडाऊनच्या आतल्या खोलीकडे जात होती.
अनायाने धडधडत्या हृदयाने पिस्तुल उगारलं आणि दरवाजा आर्धा उघडला,
आत एक तरुण मुलगा अर्धमेला अवस्थेत पडलेला होता. त्याच्या कपाळावर लाल पेन्सिलची तीच खूण.
पण तो अजून जिवंत होता.
आत एक तरुण मुलगा अर्धमेला अवस्थेत पडलेला होता. त्याच्या कपाळावर लाल पेन्सिलची तीच खूण.
पण तो अजून जिवंत होता.
तो थरथरत म्हणाला,“तुम्ही… तुम्ही उशीर केला… तो इथे होता… तो म्हणाला, अनायाला सत्य सांगू नकोस…”
“कोण? कोण होता इथे?” अनाया ओरडली.
मुलगा उत्तर देण्याआधीच त्याचा श्वास थांबला.
अनाया हादरली.
मुलगा उत्तर देण्याआधीच त्याचा श्वास थांबला.
अनाया हादरली.
तिने लगेच शिवडी पोर्टचे सर्व CCTV फुटेज तपासायला सांगितले. पण आश्चर्य म्हणजे, गोडाऊन 17 जवळच्या कॅमेऱ्यांमध्ये अनाया एकटीच दिसत होती.
कोणतीही SUV नाही. कोणताही दुसरा व्यक्ती नाही.
जणू तो कोणीतरी परग्रहवासी नव्हता, तो तिच्या मनाला खेळवत होता.
त्या दरम्यान तिच्या फोनवर पुन्हा एक मेसेज:
“शेवटचा साक्षीदार तुझी वाट बघतोय… तुझ्या स्वतःच्या घरात.”
अनाया काही क्षण स्तब्ध झाली.
तिचं घर?
त्या दरम्यान तिच्या फोनवर पुन्हा एक मेसेज:
“शेवटचा साक्षीदार तुझी वाट बघतोय… तुझ्या स्वतःच्या घरात.”
अनाया काही क्षण स्तब्ध झाली.
तिचं घर?
अनाया घाईत आपल्या दादरमधील फ्लॅटमध्ये पोहोचली.
दार उघडलं तेव्हा घरात पूर्ण अंधार. पण किचनमधून हलका प्रकाश दिसत होता. ती सावधपणे पुढे गेली.
किचनमध्ये एक माणूस बसलेला होता.
अनाया ओरडली, “Hands up! Turn around!”
त्या माणसाने सावकाश मान फिरवली आणि अनायाच्या अंगातलं रक्त थंड झालं.
दार उघडलं तेव्हा घरात पूर्ण अंधार. पण किचनमधून हलका प्रकाश दिसत होता. ती सावधपणे पुढे गेली.
किचनमध्ये एक माणूस बसलेला होता.
अनाया ओरडली, “Hands up! Turn around!”
त्या माणसाने सावकाश मान फिरवली आणि अनायाच्या अंगातलं रक्त थंड झालं.
तो तिचा मोठा भाऊ, आरव होता.
“आरव? तू इथे? हे काय चाललंय?”
आरव हळूच पिस्तुल टेबलावर ठेवत म्हणाला,
“अनाया… मला माहित होतं, तू शेवटी इथेच येशील.”
आरव हळूच पिस्तुल टेबलावर ठेवत म्हणाला,
“अनाया… मला माहित होतं, तू शेवटी इथेच येशील.”
“तू… तूच सायलेंट रीपर आहेस?” अनाया थरथरत म्हणाली. आरव शांत हसला.“हो. आणि नाही."
आरव म्हणाला, “तुला आठवतं का अनाया, दोन वर्षांपूर्वीची ती केस? जिथे चुकीच्या आरोपाखाली माझी पत्नी नेहाला तुरुंगात डांबलं गेलं… आणि ती तिथेच मेली, त्या केसची तपासणी कोण करत होतं?”
अनायाच्या डोळ्यात पाणी आलं. “आरव… मला खूप वाईट वाटतं… पण मी काही करू शकले नाही…”
“हो. आणि त्यामुळे मी स्वतः न्याय दिला,” तो म्हणाला.
“मी ज्यांनी नेहावर खोटे आरोप केले त्या पाच जणांना एक एक करून संपवलं. त्यांनाच… लाल पेन्सिलची खूण देऊन.”
अनाया रडत म्हणाली, “तू काय केलंस आरव… हे गुन्हे आहेत!”
“गुन्हे?” आरव ओरडला. “जे लोक निर्दोषांना मारतात, ते गुन्हेगार नाही? आणि मी निर्दोषाचा नवरा, दोषी?”
एका क्षणासाठी शांतता पसरली.
एका क्षणासाठी शांतता पसरली.
आरवने पिस्तुल हळूहळू उचलली आणि म्हणाला,
“अनाया, मला माहित आहे तू मला अटक करशील. पण एक विनंती, माझ्या फाईलवर ‘सायलेंट रीपर’ लिहू नकोस. मी खुनी नाही… मी फक्त प्रतिशोध घेतला.”
अनायाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
“अनाया, मला माहित आहे तू मला अटक करशील. पण एक विनंती, माझ्या फाईलवर ‘सायलेंट रीपर’ लिहू नकोस. मी खुनी नाही… मी फक्त प्रतिशोध घेतला.”
अनायाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
“आरव… प्लीज… पिस्तुल खाली ठेव.”
आरवने हसत मान हलवली.
“Goodbye…....."
आरवने हसत मान हलवली.
“Goodbye…....."
आणि बंदुकीचा ट्रिगर, धडाम. अनाया ओरडली. आरव स्वतःचं जीवन संपवून बसला होता.
त्या रात्रीच्या शेवटी अनाया पुन्हा एकटी उरली.
त्या रात्रीच्या शेवटी अनाया पुन्हा एकटी उरली.
मीडिया ओरडत होती,“सायलेंट रीपरचा शेवट!”
पण अनायाच्या फाईलवर लिहिलं होतं,
“Case Closed, Cause: Personal revenge, Not serial thrill.”
“Case Closed, Cause: Personal revenge, Not serial thrill.”
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा