शेवटची भेट
रुग्णालयाच्या पांढऱ्या भिंतींवर पसरलेली निस्तब्धता जणू काहीतरी सांगत होती. मंद उजेडात शेजारच्या बेडवर पडलेला आर्यन डोळे मिटून शांत होता. मशीनवर चालणाऱ्या रेषा हळूहळू मंदावत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ शांतता होत, जणू त्याने आयुष्याशी सगळं बोलून घेतलं होतं.
दरवाज्यात सिया उभी होती. हातात एक लहानशा फुलांचा गुच्छ होता, ती रोज आणायची, आज शेवटचं फुल होतं. तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, फक्त एक खोल शून्य तिची नजर होती.
“आर्यन… उठ ना, आज खूप काही बोलायचं होतं आपल्याला,” ती हळू आवाजात म्हणाली.
“आर्यन… उठ ना, आज खूप काही बोलायचं होतं आपल्याला,” ती हळू आवाजात म्हणाली.
आर्यनचे ओठ किंचित हलले, “सिया… तू आलीस ना… मला माहिती होतं, तू येणारच…”
ती त्याच्या जवळ बसली. हातात हात घेत म्हणाली, “तुला आठवतं का? कॉलेजच्या पहिल्या दिवशी आपण भेटलो होतो. तू माझं पेन उचलून दिलंस आणि म्हणालास, ‘तुझी ही स्माईल मी कधीच विसरू शकत नाही.’”
आर्यन हसला. तोच हसरा चेहरा, पण आज त्याच्या ओठांवर वेदनेची छटा होती. “हो आठवतंय… आणि तू त्या दिवसानंतर मला एक दिवसही शांत बसू दिलं नाहीस.”
दोघे काही क्षण शांत राहिले. मशीनच्या आवाजात त्यांच्या श्वासांचा ताल मिसळला होता.
सिया म्हणाली, “आपण किती स्वप्नं पाहिली होती ना , छोटंसं घर, सकाळचं चहा तू बनवणार, आणि मी तुझ्यासाठी कविता लिहिणार…”
आर्यनने तिच्या हातावर घट्ट पकड घेतली, “ती स्वप्नं अजूनही तुझ्या डोळ्यांत दिसतात सिया. मी नसेन, पण ती स्वप्नं जग, माझ्यासाठी.” आर्यन म्हणाला.
आर्यनने तिच्या हातावर घट्ट पकड घेतली, “ती स्वप्नं अजूनही तुझ्या डोळ्यांत दिसतात सिया. मी नसेन, पण ती स्वप्नं जग, माझ्यासाठी.” आर्यन म्हणाला.
सियाचे डोळे पाणावले. “तू असशीलच आर्यन… माझ्या प्रत्येक श्वासात. पण तू असं निघून जाऊ नकोस ना.”
तो हसला, “मरण म्हणजे शेवट नाही सिया, ते फक्त भेटीचं दुसरं ठिकाण आहे. आपण पुन्हा भेटू… कदाचित त्या आभाळाच्या पलीकडे.”
सिया त्याच्या छातीवर डोकं ठेऊन रडत राहिली. डॉक्टरांनी हळूच आत येऊन मशीनकडे पाहिलं. स्क्रीनवरील रेषा थांबल्या. शांतता पसरली.
डॉक्टरांनी हात जोडून डोळ्यांनी इशारा केला “तो गेला.” त्यांच्या कॅन्सर शेवटच्या टेजला होता.
सियाचं डोकं अजूनही त्याच्या छातीवर होतं. तिला काही ऐकूच आलं नाही. तिला वाटलं, तो फक्त झोपलाय. ती कुजबुजली
“आर्यन… उद्या आपण आपला फेवरेट ठिकाणी जाऊ, समुद्रकिनारी, चालेल?”
“आर्यन… उद्या आपण आपला फेवरेट ठिकाणी जाऊ, समुद्रकिनारी, चालेल?”
उत्तर आलं नाही. पण सियाला वाटलं, कुठेतरी हलकी झुळूक तिच्या केसांतून गेली, जणू आर्यनचं हात फिरल्यासारखं.
ती हळूच उठली. हातातील गुलाब त्याच्या छातीवर ठेवला आणि म्हणाली
“ही शेवटीची भेट नाही… ही नव्या प्रवासाची सुरुवात आहे.”
“ही शेवटीची भेट नाही… ही नव्या प्रवासाची सुरुवात आहे.”
ती निघून गेली. बाहेर सूर्यास्त होत होता. आकाश लालभडक झालं होतं, जणू तिचं दुःख आभाळानेही ओळखलं होतं.
काही महिन्यांनंतर…
सिया समुद्रकिनारी आली. हातात वही होती आर्यनसाठी लिहिलेल्या कविता.
ती वाळूवर बसली आणि त्या कवितेतून वाचू लागली
सिया समुद्रकिनारी आली. हातात वही होती आर्यनसाठी लिहिलेल्या कविता.
ती वाळूवर बसली आणि त्या कवितेतून वाचू लागली
“कधी तरी पुन्हा भेटू आपण,
त्या लाटांमधून ओसंडणाऱ्या आठवणींत,
तू सूर्यास्तात लपशील,
आणि मी त्या प्रकाशात तुला शोधत राहीन.”
त्या लाटांमधून ओसंडणाऱ्या आठवणींत,
तू सूर्यास्तात लपशील,
आणि मी त्या प्रकाशात तुला शोधत राहीन.”
एक लाट आली आणि तिच्या पायांना स्पर्श करून गेली. सियाने स्माईल केलं. तिला वाटलं “तोच आहे, माझा आर्यन…”
ती वही बंद करून उभी राहिली. समुद्राच्या वाऱ्याने तिचे केस उडाले, चेहऱ्यावर शांत हास्य होतं.
जीवन पुढे चाललं होतं… पण त्या भेटीची ओळख, त्या स्पर्शाची ऊब, तिच्या प्रत्येक धडधडीत कायमची कोरली गेली होती.
जीवन पुढे चाललं होतं… पण त्या भेटीची ओळख, त्या स्पर्शाची ऊब, तिच्या प्रत्येक धडधडीत कायमची कोरली गेली होती.