चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
शीर्षक - " शेवटी चीज झालं.."
लघुकथा फेरी
शीर्षक - " शेवटी चीज झालं.."
लता रडत होती तिच्या डोळ्यात पाणी होतं.
सार्थक आपल्या आईला रडताना पाहून म्हटला,
"कायं झाले आये..? "
"काय नाय लेकरा" फाटक्या पदराने डोळे पुसत लताने सावरते स्वतःला.
"बापूने मारलं ना? मला माहित हाय. पैसं पाहिजे असतील ना प्यायला. देऊन टाकायचं." सार्थक बोलला कारण त्याला हे रोजचेच झाले होते.
"तुझ्या त्या शिकबनी साठीच साठवून ठेवते ना." लता आवंढा गिळत बोलते.
"जाऊदे नको ती महागाची शिकवणी. मी माझाच करन अभ्यास." सार्थक समजूतीने बोलला तसे लताला अजूनच भरून आले.
" कर रं लेकरा. लई शिक, मोठा व्हय. बघ. मी अजून चार नवीन घरी कामं धरलं माझे धुण्या, भांडायचं, फरशी, झाडायचं पन तु शिक बाबा. तुला नाय कमी पडू द्यायची. मी निघते कामाला बया माझ्या नावाने ओरडत असतीन आज जरा उशीर झाला. खाय अनं कर अभ्यास. " लता सार्थकच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.
"हो... छोटया, चिंगळी गेले ना शाळेत त्यांची दुपारी प्रार्थना सूरू झाली. मला दिसले नाही. " सार्थकने त्याच्या भावंडाविषयी विचारले.
" हा मग शाळा बुडवूच देत नाय मी तिघांना. अरं मला लय हौस पर माझ्या बापानं लवकर लग्न करून टाकलं माझं. मी नाय तर नाय. माझ्या लेकरास्नी लय शिकवन तुझी दहावी हाय तु कर बाबा लई अभ्यास कर. तुला काय पाहिजे मला सांग. मी आज दोन कामं धरले मला यायला उशीर होईन. तु खा, अभ्यास कर रं जाते मी." एवढे बोलून लता बाहेर पडली.
लता तिच्या घरातन कामाला धावतच निघते.तेव्हा तिची धावपळ पाहून सार्थक मनातच म्हणतो "आपल्या साठी आपली आई लोकांची धुणं, भांडी, फरशी, झाडून काय पण करते. आपण अभ्यास करून चांगले मार्क पाडलेच पाहिजे. जेवतो, लगेच अभ्यासाला बसतो."
लता कामावर जाताच तिला मालकीण विचारते,
"काय गं लता आज उशीर झाला? "
"काय गं लता आज उशीर झाला? "
लता म्हणते,"हाऊ न करते समदं बाई लगेच."
मालकीण म्हणते "घे पुसून घे आधी बघं कसे झाले आहे सगळेच."
लता "व्हय घेते." म्हणून कामाला लागते.
"घे तिथून घे जरा.. जरा जोर लाव.. घे सगळे."
आज माझ्या किट्टी पार्टीच्या मैत्रीणी येणार आहे स्वच्छ घे बघ सगळे. आवर लवकर, हात उरकता घे जोर लाव आणि.. " मालकीण तिला बोलते.
आज माझ्या किट्टी पार्टीच्या मैत्रीणी येणार आहे स्वच्छ घे बघ सगळे. आवर लवकर, हात उरकता घे जोर लाव आणि.. " मालकीण तिला बोलते.
लता " व्हय बाई. " म्हणतं सगळी कामे करते.
"संध्याकाळी परत चक्कर मार आज.. त्या गेल्या की स्वच्छ कर परत एकदा तुला काही देईन पोरांना खाऊ राहिलेला. कायं लता?" मालकीण तिला सांगते.
"व्हय.. पर म्या दोन नवीन कामं धरली यायला उशीर व्हईन." लता बोलते.
" किती वाजता येशील? लवकरच ये बघ."
"येतो म्या बाई. " मालकीणीच्या बोलण्यावर लता उत्तर देत सगळे कामं आवरून घेते. दुसऱ्या घरी जाते. कामं सगळी आवरून. परत याच घरची किट्टी पार्टी चालू असताना लता पोहचते. लताचा कामाचा उरक, स्वच्छता पाहून पार्टीतली मालकीणीची जवळची मैत्रीण म्हणते
"माझे घर इथून दीड किलोमीटर असेल माझ्या बंगल्यातले बाथरूम, कमोड पाच आहेत ते रोज स्वच्छ करशील का? वाटल्यास दोन हजार ऍडव्हान्स देईन."
लता म्हणते, "लांब हाय कसं जमल? कसं येऊ. नाही बाई. "
मालकीणीची मैत्रीण मालकीणीला म्हणते 'शहाणीच दिसते. मला नाही म्हणते. एडव्हान्स देते म्हंटल तरी. गरज दिसत नाही हिला." तशी लता म्हणते, "तसं नाय बघते बाई" ती कामं उरकून घरी जाते.
दुसऱ्या दिवशी सार्थक शाळेतून येतो. लता घरात कामं करत असते.
सार्थक म्हणतो "आई दहावीची परीक्षा फीस भरायची हजार रूपये उद्या आणायला सांगितली सरांनी." सार्थक रडायला लागतो.
"मी हाय ना जिती? का रडतो? तुला कमी पडू नाय द्यायची काही. आणते मी रात लोक हजार तु नग फिकीर करू." लता एवढे बोलून निघते. त्या मालकीणीकडे त्यांच्या त्या मैत्रिणीच्या बंगल्याचा पत्ता घ्यायला. पत्ता घेते. धावतच पायी निघते. दीड किलोमीटर भर उन्हात. त्यात चप्पल तुटते. आता चप्पल हातात धरते आणि भर उन्हात पाय पोळत तशीच झप झप चालत कस बस बंगला गाठते ती.
मालकीणीची मैत्रीण म्हणते "आता का गं आली? नाही म्हणाली होतीस ना. जा आता. का गरज पडली."
लता बोलते "नाही बाई किरपा करा. पाय धरते. कामं द्या. ते आगाऊ देणार व्हते ते द्या लय उपकार व्होतीन."
मालकीणीची मैत्रीण म्हणते "ठीक आहे. पाय सोड, हे घे दोन हजार उद्या पासून ये यावेळी."
"लय उपकार झालं बाई.. "लता हात जोडते.. डोळ्यातलं पाणी पुसत उन्हात पाय पोळत आहे. हे काहीच तिला कळतं नव्हतं. आनंद अश्रू डोळ्यातून पाणी वाहत होते. वाट दिसत नव्हती धावत घर गाठलं.
" सरठू बाळा.. हे घे तुझे पैसे "त्याच्या हातात दिले तिचा जीव भांड्यात पडला.
"त्यातले मोजून हजार घेतले बाकी आईच्या हातात परत केले म्हणाला" हे घे तुझे. "सार्थकला आनंद गगनात मावेना.." आई तु इतक्या लवकर आणले. कुठून? काय केले? "म्हणत आईच्या पाया पडतो.
सार्थक तिच्या पायाकडे पाहतो आणि आईला बसवतो. आईचे पाय लाल झालेले. फोड आलेले, पाण्यात कामं करून चिखल्या झालेल्या. " काय झालं आये पायाला..? चप्पल घालत नाही का? " पाहतो चप्पल फारच तुटलेली. "आता जे पैसे शिल्लक आहेत त्यात तुला चप्पल घेऊच."
सार्थकला आईच्या पायावरून तिच्या कष्टाची जाणीव होते. सार्थक रात्र दिवस जागून अभ्यास करून परीक्षा देतो.
निकालाच्या दिवशी- सार्थक ऑनलाईन निकाल पाहतो. तो राज्यात पहिला आलेला असतो. रडतच घरची वाट धरतो आणि कधी आईला भेटतो असं त्याला होत.
सार्थक - ओरडतच येतो " आये.. आयेss" "
लता कामं करत असते घरात.सार्थक रडून आनंद अश्रूनीं नाहून निघतो.
" तुझ्यामुळेच मी राज्यात पहिला आलो दहावीच्या परीक्षेत. " लताच्या पाया पडतो. माय लेक गळ्यात पडून दोघे रडतात. शेवटी लताच्या आनंदाला पारावर राहत नाही. तिच्या कष्टाचे चीज होते.
समाप्त.
प्लीज कंमेंट द्या हि विनंती.
भाग्यश्री योगेश सांबरे
( सौ. भाग्यश्री चाटी सांबरे )
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा