Login

शिदोरी मैत्रीची

संबंध सेतू या विषयावर अश्विनी ओगले बद्दल काही लिहीण्याचा छोटा प्रयत्न.
शिदोरी मैत्रीची ( अश्विनी - अहाना )
----------------------
चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वाटत होते की माहित नाही कोण असणार आहेत आपल्या टीममध्ये ? पण यावेळेस जवळपास सगळेच एकमेकांसाठी अनोळखी व्यक्ती. आम्ही टीम क्रमांक पाच मध्ये आलो नेहमीप्रमाणे ती जादूची चिट्ठी आम्हा सर्व लेखकांना एकत्र घेऊन आली. एका मागोमाग एक सर्वजण ऍड होत गेले राखीच्या बोलण्यावर नाही नाही करत स्पर्धेत अश्विनी देखील आली.

तशी अश्विनी ची व माझी ओळख फक्त मैफीली वरच होती. आता मैफिलीत तितकंसं देखील आम्ही ओळखत नव्हतं.कधी वाटलं देखील नाही की गेल्या वर्षी प्रतिस्पर्धी असणारी तसेच गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये व्हिडिओ बनवायचा होता तिथून तिचा व्हिडिओ मी पाहिला होता तेव्हा फार आवडली होती. कारण ; तिचा आत्मविश्वास.

यावर्षी आम्ही दोघी एकाचं टीममध्ये. आता संबंध सेतू ही एक फेरी आली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. कोण कोण कोण कोणाबद्दल लिहिणार हेचं कळत नव्हतं. त्यात मी कोणालाही वैयक्तिक ओळखत नव्हते. आता इथून सुरू झाली खरी मज्जा, माझ्या वाटेला अश्विनी आली. यानंतर ग्रुपमध्ये कितीदातरी ' अश्विनी ये ना लिहू कशी तुझ्याविना मी राणी गं '
असे म्हणत तिला साद देऊ लागले तिने देखील प्रतिसाद दिला.

आता लिहायचं काय ? वाटलं होतं ही एक दुसरी व्यक्ती त्यात लेखणीतून ओळख झालेली. मी तिला फारसं ओळखतही नव्हते नंतर समजलं तिला देखील मेहंदी काढायला आवडते. तिचे स्टेटस पाहून हे कळत होतं की तिला डान्स देखील आवडतो. तिचे काही लेख, कथा मी वाचल्या होत्या पण आता नावचं आठवत नाहीत. अश्विनी मला बिनधास्त वाटते माझाही स्वभाव थोडाफार तसाच म्हणून ती नक्कीच आवडते मला.

शब्दांच्या भावविश्वात रमणारी तसेच स्वतःला लेखणीतून मांडणारी लेखिका अश्विनी. मॉम्सप्रेसो मधून ओळख मिळालेली साधी सरळ भाषा तसेच आपल्याकडे आकर्षित करणारे व्यक्तिमत्व. प्रकाश शोधण्यासाठी अंधारातूनच वाट काढावी लागते हे आपल्या लेखणीतून सांगणारी. तिचा हेवा मला एका गोष्टीसाठी वाटतो की तिच्या जन्मासाठी तिच्या आजीने हट्ट केला होता. जर आजीने हट्ट केला नसता तर कदाचित अश्विनी सोबत स्पर्धेत भाग घेण्याचा भाग्य लाभलचं नसतं.

कदाचित या स्पर्धेत आम्ही एकत्र यावं मी तिच्यावर लिहावं यासाठी तिच्या आजीने हट्ट केला असावा असे वाटून गेलं. खरंच मी नशीबवान. आम्ही एकमेकींना अनोळखी आहोत पण प्रेम देऊन जाते अशी ही अश्विनी. एक मैत्री अशीही , आमचं नातं प्रेमाच्या अलीकडे नसलं तरी मैत्रीच्या पलीकडे आहे नक्कीच. सासू पण सूनच होती याच्यातून तिचं आपल्या सासूवरील प्रेम तसेच तिच्या सासूचा समंजसपणा दिसून येतो.

स्त्री शक्ती रडायचं नाही लढायचं हे तिला पाहताच कळते. आईच्या मनाची घालमेल लिहिताना तिला समजलेली आई कळते. तसेच संबंध सेतूच्या सेतूमुळे दुरावा जेव्हा दूर होतो तेव्हा माणसं जवळ येतात. त्याचे माहेरपण जपणाऱ्या माझ्या मैत्रिणीला एक सुखावणारं संबध सेतूचे वाण देऊन मी निरोप घेते.