सगळा खर्च केतनला करावा लागत होता. त्याची फार ओढाताण होत होती.
स्नेहा त्याला समजून घेत होती.
स्नेहा त्याला समजून घेत होती.
ती देखील अनावश्यक खर्च टाळत होती.
नंदिनीसाठी छान छान कपडे,खेळणी घ्यावी असं तिला वाटायचे; पण तरीही केतनवर पैश्याचा ताण येईल म्हणून ती करत नव्हती.
नंदिनीसाठी छान छान कपडे,खेळणी घ्यावी असं तिला वाटायचे; पण तरीही केतनवर पैश्याचा ताण येईल म्हणून ती करत नव्हती.
मन नाराज व्हायचे; पण दुसरा पर्याय देखील नव्हता.
एक दिवस आईने केतनला फोन केला.
बाबांचा अपघात झाल्याचे सांगितले. पायाला जबर मार लागल्याचे सांगितले.
बाबांचा अपघात झाल्याचे सांगितले. पायाला जबर मार लागल्याचे सांगितले.
केतनने स्नेहाला तिच्या आईकडे सोडले आणि गावी गेला.
गावी गेल्यावर समजले की, बाबांचे ऑपरेशन करावे लागेल.
केतन एकुलता एक होता.
आई बाबांची जबाबदारी केतनवर होती.
बाबांचे ऑपरेशन झाले.
सर्व खर्च केतनने उचलला.
एक लाखाच्या आसपास खर्च आला.
आईला कल्पना आली. तिने स्वतःचे मंगळसूत्र मोडण्यास सांगितले.
केतनला आईचे मंगळसूत्र मोडायचे नव्हते.
"आई, माझ्याकडे पैसे होते. तू काळजी करू नको." तो आईला म्हणाला.
"केतन, तुला आधीच खर्च आहे. हे मंगळसूत्र मोड. तुला तितकाच आधार." आई मंगळसूत्र त्याच्या हातात देत म्हणाली.
"आई, मी म्हणालो ना तुला माझ्याकडे पैसे आहेत. तू मंगळसूत्र गळ्यात घाल."
त्या रात्री केतनला झोपच लागली नाही.
खरंतर काहीच सेविंग नव्हती. एकटाच तो कसंबसं सर्व करत होता. आता देखील त्याने त्याच्या मित्राकडून पैसे उसने घेतले होते. महिन्याला थोडी थोडी रक्कम देऊन पैसे सगळे देईल असे सांगितले.
त्याला वाईट वाटलं. पैसा खरंच किती महत्वाचा आहे ही त्याला जाणीव झाली होती. इतकं असून देखील तो घरच्यांना काहीच खबर लागू देत नव्हता.
आपण आपल्या कुटूंबासाठी इतकही करू शकत नाही. आईला जर खरी परिस्थिती सांगितली तर तिला वाईट वाटेल. तो काहीच बोलला नाही.
आपण आपल्या कुटूंबासाठी इतकही करू शकत नाही. आईला जर खरी परिस्थिती सांगितली तर तिला वाईट वाटेल. तो काहीच बोलला नाही.
केतन असाच होता. त्याला आपल्या जवळच्या माणसांना त्रास द्यायला आवडायचे नाही.
आई,बाबा,स्नेहा आणि नंदिनी चौघावर त्याचा फार जीव होता. हे देखील दिवस जातील. हीच काय आशा होती.
आई,बाबा,स्नेहा आणि नंदिनी चौघावर त्याचा फार जीव होता. हे देखील दिवस जातील. हीच काय आशा होती.
स्नेहा देखील सासऱ्यांची चौकशी करत होती.
पंधरा दिवसाने तो मुंबईला आला.
पंधरा दिवसाने तो मुंबईला आला.
स्नेहा आणि नंदिनी दोघींना इतक्या दिवसाने बघून तो खुश झाला.
नंदिनीसाठी बाहुली आणली होती. नंदिनीला काय आवडतं ह्याची त्याला पुरेपूर कल्पना होती.
नंदिनी पुढच्या महिन्यात एक वर्षाची होणार होती.
पहिला वाढदिवस छान थाटमाटात करावा असं स्नेहाला वाटत होतं.
कारण गेल्या महिन्यात ती तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला गेली होती.
खूप छान वाढदिवस साजरा केला होता.
कार मधून एन्ट्री केली होती. किती छान हॉटेल होते. लहान मुलांना देण्यासाठी छान गिफ्ट होते.
मैत्रिणीने किती छान गाऊन घातला होता आणि मुलाने,नवऱ्याने देखील तसेच मॅचिंग कपडे घातले होते.
कार मधून एन्ट्री केली होती. किती छान हॉटेल होते. लहान मुलांना देण्यासाठी छान गिफ्ट होते.
मैत्रिणीने किती छान गाऊन घातला होता आणि मुलाने,नवऱ्याने देखील तसेच मॅचिंग कपडे घातले होते.
स्नेहाने विषय काढला.
"केतन, नंदिनीचा वाढदिवस देखील आपण असाच साजरा करूया. आपल्या तिघांचे कपडे सेम घेऊया. छान डेकोरेशन करूया."
हे ऐकल्यावर केतन काहीच बोलला नाही.
"केतन, मी बोलतेय तुझ्याशी." ती जरा रागातच त्याच्याकडे बघत म्हणाली.
"स्नेहा, मी ऐकतोय." केतन थंड स्वरात म्हणाला.
"तू, ऐकतोय तर काही बोलत का नाही."
"स्नेहा, मला ह्यावेळेस खरंच जमणार नाही. असा वाढदिवस करायचा म्हंटलं तर भरपूर खर्च येईल. तितके पैसे नाहीयेत माझ्याकडे. जेव्हा पैसे येतील तेव्हा आपण मोठा वाढदिवस करूया. मला माहित आहे, नंदूचा पहिला वाढदिवस आहे. आई म्हणून तुझी जशी ईच्छा आहे तसेच मलाही वाटतं; पण खरंच माझ्याकडे पैसे नाही." तो तिला समजावत म्हणाला.
"स्नेहा, प्लिज समजून घे. तुला माहीत आहे आपली परिस्थिती." केतन स्नेहाचा हात पकडत म्हणाला.
स्नेहा तोंड फुगवून बसली होती.
ती काहीच बोलत नव्हती.
ती काहीच बोलत नव्हती.
"स्नेहा, मी तुझ्याशी बोलतो आहे. एकदा माझ्याकडे बघ." गहिवरलेल्या आवाजात तो बोलत होता.
स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
"तू अशी रडलेली मला आवडत नाही. प्लिज रडू नको."
केतन तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला.
केतन तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणाला.
"केतन,किती ईच्छा मारायच्या? कुठे बाहेर फिरणं नाही की नवीन कपडा नाही. माझी घुसमट होते रे आणि नंदुसाठी तू इतकं ऍडजस्ट नाही करू शकत का?."
रडक्या स्वरात ती म्हणाली.
रडक्या स्वरात ती म्हणाली.
केतनला देखील तिची बाजू समजत होती. तो तरी काय करणार. त्याचे हात जणू दगडाखाली होते. सगळं सोंग करता येतं; पण पैश्याचे सोंग करता येत नाही आणि आताच गावी देखील खूप खर्च झाला होता. स्नेहाला सांगून टेंशन द्यायचे नव्हते.
"मी काय म्हणते आपण माझ्या बाबांकडून पैसे घेऊया का? जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा देऊया." स्नेहाने मार्ग काढला.
"स्नेहा, बघ तुला माहीत आहे हे असं नातेवाईकांकडून पैसे घ्यायला मला आवडत नाही. अंथरुन पाहून पाय पसरावे अश्या मताचा मी आहे. मी तुला प्रॉमिस करतो जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा आपण नंदिनीचा वाढदिवस चांगला साजरा करूया."
"केतन, ते माझे बाबा आहेत. कोणी परके नाही."
"स्नेहा, आजपर्यंत मी नेहमी तुझं ऐकत आलो आहे. मी कधीच तुझा शब्द खाली पडू दिला नाही. मला खरंच आवडणार नाही बाबांकडून पैसे घ्यायला. प्लिज समजून घे."
स्नेहा शांत बसली मात्र तिला फार वाईट वाटले.
नंदिनीचा पहिला वाढदिवस थाटामाटात करायचे स्वप्न अधुरे राहिले होते. ती नाराज झाली होती.
क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
अश्विनी कुणाल ओगले.