नंदिनीचा वाढदिवस होता. केतनने जवळच्या लोकांना बोलावले होते. स्वतःचे आई बाबा, नंदिनीचे आई बाबा. ऑफिसमधील जवळचे सहकारी.
स्नेहाला,नंदिनीला छान कपडे घेतली होती. स्वतःच छान डेकोरेशन केलं होतं. केक आणला होता.
जेवणाची ऑर्डर दिली होती.
साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला गेला.
केतनच्या आई बाबांनी नातीला सोन्याचे कानातले आणले होते. स्नेहाच्या आई बाबांनी सोन्याची चेन आणली होती.
स्नेहाच्या आई बाबांची परिस्थिती जरा बरीच होती. स्नेहा एकुलती एक असल्याने तिचे सर्व हट्ट, लाड पुरवले गेले होते.
स्नेहाचा चेहरा उतरलाच होता. मन नाराज झाले होते.
स्नेहाच्या आईच्या नजरेतून ते काही सुटले नाही. असंही ती स्नेहासोबत बोलणारच होती.
ती केतनच्या आईशी बोलू लागली.
"केतनचे वडील बरे आहेत ना?"
"हो आता बरे आहेत." तिचा चेहरा उतरला.
"काय झालं? काही प्रॉब्लम आहे का केतनची आई?"
"माझ्या केतनवर सगळा भार आहे हो. एकट्यानेच सारा खर्च केला. लाखभर खर्च आला. मी त्याला म्हणाले मंगळसूत्र मोड पण काही त्याने ऐकलं नाही." ती केतनकडे पाहत म्हणाली.
"गुणी मुलगा आहे. स्नेहाला देखील काही कमी पडू देत नाही. समजू शकते आईच मन. घराचा लोन, घरखर्च पुन्हा गावी देखील तोच लक्ष देतो. इतकं सारं होऊन कधीच रडगाणं नाही. चेहरा नेहमीच हसरा ठेवतो. नशीबावन आहे स्नेहा की, केतनसारखा जोडीदार तिला लाभला."
केतनचं कौतुक ऐकून त्याच्या आईला फार बरं वाटलं.
जेवण आटोपलं.
केतन आणि त्याचा मित्र दोघांचे बोलणे स्नेहाच्या आईच्या कानावर पडले.
केतनचा मित्र राघव म्हणाला.
"केतन, का घाई करतो? मला विश्वास आहे तू मला माझे पैसे देशील."
"राघव, तू मला वेळेवर मदत केली अगदी देवासारखा धावून आलास; पण प्लिज हे पैसे घे."
"केतन, तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणालास,मग आता?."
"राघव, मी माझं ब्रेसलेट मोडलं." ,
राघवला हे ऐकून वाईट वाटलं.
राघवला हे ऐकून वाईट वाटलं.
"का असं केलं? तुझ्या आई बाबांनी किती प्रेमाने केलं होतं."
"राघव, दडपण येतं मला. खरंच रात्रभर झोप लागत नाही ह्या विचाराने की, डोक्यावर इतकं कर्ज आहे. घराचा हफ्ता चालू आहे. तो पगारातून ऍडजस्ट होतो; पण बाकीचे कर्ज नको वाटते. हे पैसे घे म्हणजे मला शांत झोप लागेल."
हे ऐकून स्नेहाच्या आईला वाईट वाटलं.
तिला कल्पना आली की, केतन कोणत्या परिस्थितीतून जात आहे.
तिला कल्पना आली की, केतन कोणत्या परिस्थितीतून जात आहे.
ती स्नेहाच्या बाबांशी बोलली.
ते केतनशी बोलायला गेले.
"केतन, तुम्हाला काही पैश्याची गरज लागली तर सांगा."
"नाही बाबा. माझं सगळं व्यवस्थित भागतं. मला पैसे नको."
स्नेहाच्या आईला आश्चर्य वाटलं. केतनची इतकी ओढताना होत असताना देखील त्याने पैसे नाकारले.
खरंच स्नेहाने नशीब काढलं होतं. केतनच्या ठिकाणी कोणी दुसरं असतं तर लगेच पैसे मागितले असते; पण त्याने तसे केले नाही.
केतन खरतरं स्वाभिमानी होता. म्हणूनच तर त्याने मित्राकडून घेतलेले पैसे देखील स्वतःचं ब्रेसलेट मोडून पुन्हा दिले होते. सासऱ्याने स्वतःहुन मदत देऊ केली ती देखील नाकारली. हे सारं काही स्नेहाची आई जवळून पाहत होती.
सगळे घरी गेले.
रात्री केतन स्नेहाशी बोलू लागला.
"स्नेहा, मला माहित आहे नंदिनीचा वाढदिवस तुला पाहिजे होता तसा साजरा झाला नाही. खरंच प्रॉमिस मी आपल्याकडे पैसे आले की तुला हवा तसा वाढदिवस साजरा करेन."
"ठीक आहे केतन. वाढदिवस साजरा झाला हे महत्वाचे." स्नेहाच्या बोलण्यात नाराजी स्पष्ट दिसत होती.
"केतन,यंदा गणपतीत मी आईकडे जाणार आहे."
"हो चालेल."
केतनच्या डोक्यावरचे ओझे नाहीसे झाले होते.
वाईट इतकंच वाटत होतं की, नंदिनीचा वाढदिवस पाहिजे तसा साजरा करता आला नाही. स्नेहा देखील नाराज होती.
स्नेहा झोपी गेली.
तिचा चेहरा न्याहाळत तो मनामध्ये बोलू लागला.
"स्नेहा, सॉरी मी तुझी ईच्छा पूर्ण करू शकलो नाही. आई म्हणून नंदिनीसाठी ज्या ईच्छा आहेत त्या मी समजतो. खरंच मला जमलं नाही. वाढत जाणारा खर्च त्यातून मार्ग काढणं मला कठीण होऊन बसलं आहे. जमेल तसं मी प्रयत्न करतो आहे. तू आणि नंदिनी खुश राहावी बस इतकंच काय ते मला वाटतं. आपल्या डोक्यावर राहायला छप्पर आहे. दोन वेळचं जेवण सुखा समाधानाने खाता यावं हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे. तू म्हणाली होती तुझ्या बाबांकडून पैसे घेऊन वाढदिवस साजरा करूया; पण माझ्या मनाला पटलं नाही. बाबा, म्हणून मी सक्षम आहे. माझ्या अयपतीप्रमाणे मी माझ्या लेकीला आणि बायकोला खुश ठेवणार. मी कधीच कोणाकडे हात पसरणार नाही. मेहनत करीन पण खरंच मी कोणाकडेही हात पसरणार नाही, अगदी आई बाबांना देखील मी कसलीच झळ पोहोचू दिली नाही. माझी माणसं, त्यांचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. ह्या क्षणाला त्रास होतोय; पण ठीक आहे सगळे दिवस सारखे नसतात. मी मार्ग काढत राहणार. तुला, नंदिनीला आणि आई बाबांना काहीच कमी पडू देणार नाही."
क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले
अश्विनी कुणाल ओगले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा